सोमवार, ६ जुलै, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 32 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा ; जिल्ह्यातील 32 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 6  : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 29, प्रवास करुन आलेले 1, आय.एल.आय (ILI) 2 असे एकूण  32 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 10 ते 65 वर्षे वयोगटातील 14 पुरुष व 18 महिलांचा समावेश असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
यामध्ये  सातारा तालुक्यातील  जिहे येथील 17 वर्षीय युवक, कोडोली येथील 58 वर्षीय महिला, नागठाणे येथील 46 वर्षीय महिला, रेल्वे कॉलनी माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, अश्विनी पार्क संगमनगर येथील 49 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 21 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ येथील 23 वर्षीय महिला, जुना मोटार स्टँड शिरवळ येथील 58 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील तळबीड येथील 65 वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील 63 वर्षीय महिला, तारुख येथील 35 व 70 वर्षीय महिला 10 वर्षाची युवती तसेच 12,14,15 वर्षीय युवक.
फलटण तालुक्यातील कोळकी येथील 23 व 45 वर्षीय महिला, गुणवरे येथील 49 वर्षीय महिला, आंदरुड येथील 14 वर्षीय युवक.
वाई तालुक्यातील पसरणी येथील 31,32,52 वर्षीय पुरुष, वाई शहरातील 35 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, धर्मपूरी येथील 35 व 52 वर्षीय महिला.
जावळी तालुक्यतील मुनावळे येथील 28 व 56  वर्षीय महिला तसेच 36,65,12 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

घेतलेले एकुण नमुने
14842
एकूण बाधित 1336
घरी सोडण्यात आलेले 791
मृत्यु 55
उपचारार्थ रुग्ण 490
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...