मात्र रानडुकरांनी ऊस पिकाला लक्ष्य केले जात आहे. हे प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आधीच अडचणीत असलेले शेतकरी हताश झाले आहेत. वन्यप्राणी शेतात येऊ नयेत, यासाठी शेतकरी अनेक उपाययोजनांचा अवलंब करीत आहेत. शेतात पाण्याच्या, झाडाला काचेच्या रिकाम्या बाटल्या बांधून त्याचा आवाज करणे आदी उपाय योजना केल्या जात आहेत. शेतीभोवती तारेचे कुंपण केले, तरी त्याला न जुमानता रानडुकरांचे कळप शेतात मुसंडी मारतात. सुरवातीला फटाक्याच्या आवाजाने वन्यप्राणी पळ काढायचे. मात्र हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाला असून रानडुकरे सरळ शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट शेतकऱ्यांवरच हल्ला करतात.
मान्याचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र माने यांच्या 22 गुंठे शेतातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी नुकसान केले आहे.त्याचबरोबर तानाजी कुसळे,शशिकांत माने,सुभाष मोरे,शिवाजी माने,दत्ता माने,यांच्या उसाच्या शिवारात रानडुकरांनी नासधूस केली आहे.
त्यामुळे वनक्षेत्राला ताराचे कंपाऊंड करावे अथवा या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे
आधीच कोरोना चे संकट आणि त्यात रानडूकरांनी वैताग दिला आहे. दिवस-रात्र या पिकांची राखण करावी लागते. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांची पिके वाचवावी.अशी मागणी वनविभागाकडे करण्यात येणार आहे
-राजेंद्र माने,प्रगतशील शेतकरी मान्याचीवाडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा