शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

धक्कादायक नवी मुंबई : "इथे मराठी माणसाला नोकरी दिली जाणार नाही" अशी वर्तमानपत्रात दिली जाहिरात

नवी मुंबई : बेलापूर येथे जलवाहतूक करणाऱ्या एका कंपनीने कर्मचारी भरतीकरिता दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रीयन तरुणांना मनाई केल्याची घटना घडली आहे. या घटनेची दखल घेत मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकांना जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांनी या कंपनीला धारेवर धरल्यानंतर संबंधित कंपनी व्यवस्थापनाने माफीनामा लिहून देत, जाहिरात मागे घेण्याचे आश्‍वासन दिले.
सीबीडी-बेलापूर सेक्‍टर 11 येथे एका वाणिज्य संकुलात सेफ सेस या जलवाहतूक करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कंपनीला प्रशासकीय कामांसाठी काही तरुणांची गरज होती.त्याकरिता कंपनीने एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती; मात्र जाहिरात देताना महाराष्ट्रीयन नसलेल्या तरुणांना पहिले प्राधान्य देण्यात येईल, असे ठळक अक्षरात नमूद केले होते. ही जाहिरात वर्तमानपत्रात येण्याआधीच समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे मराठी तरुणांकडून या जाहिरातीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना मराठी तरुणांनाच प्राधान्य न देणाऱ्या या कंपनीचा समाजमाध्यमांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

याबाबत मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी तत्काळ दखल घेत कार्यकर्त्यांना कंपनीच्या कार्यालयात पाठवले. या कंपनीच्या व्यवस्थापकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठणकावल्यानंतर व्यवस्थापकांनी चुकून झाल्याचे सांगितले. तसेच यापुढे कंपनीत मराठी मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच घडल्या प्रकाराबाबत कंपनीने मनसेच्या नावाने माफीनामा लिहून दिला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*

तळमावले/प्रतिनिधी : माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्...