गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

मान्याचीवाडी कुंभारगाव : येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी

दि.१९.फेब्रुवारी मान्याचीवाडी कुंभारगाव येथे मोठ्या उत्सवात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंती नव्या पद्धतीत म्हणजेच शिव चरित्र पारायण  शिवरायांच्या शिवचरित्राचे वचन करून करण्यात आली हा उपक्रम गेली सात वर्षांपासून चालू आहे, शिवरायांचे संस्कार आणि विचार जनमानसात व येणाऱ्या पिढीला समजवावे या हेतुनि हा दिवस मोठया उत्सहात साजरा केला, 
 छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र्याचा महामंत्र आहेत. त्यांच्या चरित्रातून प्रखर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि अन्याविरुध्द लढा देण्याची उर्जा आपल्या सर्वांना मिळते.त्यांनी निर्माण केलेली युध्दनीती,परराष्ट्र धोरण, न्याय पध्दतीची गरज आजही आपल्या देशाला आहे.
 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपुर्ण देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, याचा आपणांस सार्थ अभिमान आहे.
याच दिवशी आपण सर्व भारतीयांनी पुन्हा एकदा शिवरायांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे. 
शिव स्वराज्य संघटना व श्री कुमजाई देवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने संयुक्तपणे हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला असून हा उपक्रम सर्वप्रथम महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये सर्वप्रथम राबविला जाणारा उपक्रम म्हणून याची नोंद केली आहे देव देश आणि धर्म जपणारे जिव्हाळ्याची माणसं या घोष वाक्यानी प्रेरित होऊं या तत्त्वाचे महत्त्व राखून कार्य करणारी संघटना म्हणून नावारुपास आलेली आहे ही भागातील सर्वप्रथम संघटना आहे अस म्हणले तरी हरकत नाही,  सर्व भरतीयांनी आणि शिवप्रेमीनी आशा पध्दतीने   शिवजयंती घरा घरात साजरी करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...