मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

सातारा ;- जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांसाठी ४६ कोटींचा प्रस्ताव श्री क्षेत्र नाईकबा बनपूरी येथे 5 कोटी निधी

पाटण प्रतिनिधी ;- 
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंअंतर्गत शिखर शिंगणापूर, औंध, पुसेगाव, पाल, बनपुरी, मोर्वे, मांढरदेव येथील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुमारे 46 कोटी 50 लाख 66 हजार रूपयांचा प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात या तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध झाल्यास विकास होण्यास मदत होणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020 व 21 च्या प्रारूप आराखड्यासंबंधी बैठक झाली होती.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने श्री क्षेत्र शंभू महादेव शिखर शिंगणापूर येथे काँक्रीटीकरण व चौक सुधारणा व सुशोभीकरण, मुंगी घाट पायरी मार्गास दोन्ही बाजूस लोखंडी गेट, अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, मुख्य पाणी पुरवठा पंप, घराची दुरूस्ती आदी कामासाठी 4 कोटी 58 लाख 49 हजार रूपये. श्री क्षेत्र यमाई देवी औंध येथे डोंगरावर जाणारा मुळपीठ रस्ता सुधारणा, क्राँक्रीटीकरण व बंदिस्त गटर, तळ्यास संरक्षक भिंत, सांडपाणी गटर व्यवस्थापन आदी कामासाठी 9 कोटी 68 लाख 15 हजार रुपये. श्री क्षेत्र सेवागिरी पुसेगाव येथे भक्त निवास, रथ मार्ग काँक्रीटीकरण, घाट, गटर सार्वजनिक शौचालय इमारत व अंतर्गत रस्त्यासाठी 7 कोटी 7 लाख 74 हजार रूपये.

श्री क्षेत्र नाईकबा बनपूरी येथे बंदिस्त गटर, ग्रामसचिवालय, अंतर्गत रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, जलशुध्दीकरण प्लॅन्ट, यात्रा स्थळावर हायमॉस्ट पोल, पाण्याची व्यवस्था व पाईपलाईन, भक्तनिवास, पोहोच रस्ता सुधारणा आदी कामासाठी 5 कोटी रूपये, श्री दत्त मंदिर मोर्वे येथे भोजन कक्ष इमारत, भक्त निवास इमारत, संरक्षक भिंत, सिमेंट क्राँक्रीट रस्ता आदी कामासाठी 9 कोटी 67 लाख 67 हजार रूपये. मांढरदेव येथे वाहनतळ विकसित करणे, यात्रा परिसर खडीकरण, डांबरीकरण, बाह्यवळण रस्ता, धर्मशाळा, रस्ता काँक्रिटीकरण, संरक्षक भिंत, पाणी पुरवठा योजना आदी कामासाठी 3 कोटी 78 लाख 61 हजार रूपये असे मिळून सुमारे 46 कोटी 50 लाख 66 हजार रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे सातारा दौर्‍यावर आले असताना त्यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी हा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे जिल्ह्यातील ब वर्ग तीर्थस्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अगामी अर्थसंकल्पात भरपूर निधी मिळण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...