गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

नोकरी इच्छुक उमेदवारांनी 31ऑगस्ट पर्यंत आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे.नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळवणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्यावत करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्तपदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.

 

उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी आधार कार्ड लिंक करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई शहर), १७५, श्रेयस चेंबर्स, पहिला मजला, डीएन रोड, सीएसएमटी, फोर्ट, मुंबई- ४००००१ या पत्यावर अथवा ईमेल asstdiremp.mumcity@ese.maharashtra.gov.in अथवा दूरध्वनी क्रमांक ०२२ – २२६२६३०३ वर संपर्क साधावा.

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न - गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न
             - गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई


सातारा दि.19 :  येत्या 22 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी  मुंबई, नवी मुंबई, उपनगरे या भागातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यासह अनेक जिल्ह्यात  गणेशभक्त येणार आहेत त्यांचा प्रवास सुखद व्हावा म्हणून पुणे- सातारा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला दिले असून यावर मॉनिटरींग करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
  टोलनाक्यावर गर्दी होऊ नये यासाठी दोन लेन फक्त गणेश भक्तांची वाहने जाण्यासाठी ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गर्दीच्या नियंत्रणासाठी व टोलनाक्यावर वादविवाद होऊ नये म्हणून टोलनाक्यावर अधिकचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  काही वाद झाल्यास तो पोलीस यंत्रणेकडून तात्काळ मिटविण्याचे आदेशही संबंधित जिल्ह्याच्या  पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. ई- पास घेतलेल्या वाहनांकडून कुठल्याही प्रकारचे टोल वसुल न करण्याचे  आदेशही शासनाने निर्गमित केले आहेत.   गणेश भक्तांचा प्रवास सुख व्हावा यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही  गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार

मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार

  सातारा दि. 19  :  खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रेवाडी व येरळवाडी येथील तलाव व सुर्याचीवाडी येथील पाझर तलाव हा स्थानिक व स्थलांतरित पक्षी यांच्याकरिता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम  ३६ (अ) अन्वये मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज,  एस. एन. फुंदे  यांनी दिली.    
  आज मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान येथे डॉ.क्लेमेंट वन मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्त कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपस्थित  लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी  यांनी हे क्षेत्र  मायणी समुह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत सहमती दर्शविली.
  या सभेस डॉ.भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा, श्री.सागर गवते विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर, श्री.संजीवन चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, सौ.शितल पुंदे वनक्षेत्रपाल वडूज, श्री.सुनिल भोईटे मानद वन्यजीवरक्षक, वनकर्मचारी तसेच मायणी परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी   उपस्थित होते.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  तर 9  नागरिकांचा मृत्यु
सातारा दि.19 :  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 346 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये  
 जावली तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 2, मोरघर 1, 
*सातारा तालुक्यातील राजेपूरा पेठ 4, शनिवार पेठ 12, निगडी 6, विलासपूर 6, गोडोली  3, फॉरेस्ट कॉलनी 3, कमानी हौद 1, बनघर 1, सातारा 11, विसावा 1, राजेवाडी निगडी 1, बोरगाव 1, दौलतनगर 2, सदरबझार 5 ,  शाहूपुरी 2,  करंजे 1, कामटी 1, विठ्ठल नगर 1, कोडोली 1, अंबेदरे 1, पाल 1,गुरुवार पेठ 3, बोरखळ 1, सातारा पोलीस 1,  वाघदेवी मंदिर 1, संगमनगर 1, 
खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव 1, बनपूरी 2, आंबवडे 1, मायणी 2, खटाव 1,  गोरेगाव 1, 
वाई तालुक्यातील फुलेनगर 1, एकसार 1, सोनगिरीवाडी 1, शेदुजेर्णे 2, कानेहर 1, दत्तनगर 2, उडतारे 6, खालची बेलमाची 3, सह्याद्रीनगर 3, गणपती आळी 3, शहाबाग 5, बावधन 6, सोनगिरीवाडी 5, रविावार पेठ 1, सुरुरु 1, धरमपुरी 9, 
पाटण तालुक्यातील पाटण 8, धामनी ब्लॉक पाटण 1, गारवडे 4, तळमावले 1, धामणी 1,  रामसितेवाडी 1, सणबूर 3, 
माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी 1, माण 1, जाधव स्ती आंधळी 1,
कराड तालुक्यातील रविवार पेठ 2, बुधवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 1, कराड 4, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 2, उंब्रज 2, वाखन रोड 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, शुक्रवार पेठ 2, मसूर 5, शनिवार पेठ 2, सोमार्डी 1, शिरवडे रेल्वे स्टेशन 1,  तांबवे 1,  मुंडे 1, गोळेश्वर 1, सुपने 1, वाठार निंबळक 1, कोयना वसाहत 2, किवळ 1, वडगाव हवेली 2, दुशेरे 1, मलकापूर 3, जाखीनवाडी 1,  कर्वे नाका 2, पोटाळे 1, बनवडी 1, कोडोली 1, किवळ 1, रेठरे बु 1, काले 2, मोपारे 3,  ओगलेवाडी 1, बनवडी 1, रुक्मिणीनगर 1,  
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 7, गुटाड 1, भेकवडी 6, नगरपालिका 1, मोहल्ला स्कूल 1, हरिजन सोसायटी 8, गवळी मोहल्ला 2, डॉ. साबणे रोड 1, 
फलटण तालुक्यातील पोलीस कॉलनी 1, चव्हाणवाडी 1, कांबळेश्वर 1, मलटण 2, राजुरी 1, निंभोरे 1, नाईकबोमवाडी 1,  फलटण 1, साखरवाडी 2.,
खंडाळा तालुक्यातील बाधे 2, शिवाजी कॉलनी शिरवळ 1,  शिंदेवाडी 9, शिरवळ 2, खंडाळा 3, झगलवाडी 1, निप्रो कंपनी 1, लोणंद 2, गोरेगाव 2, 
कोरेगाव तालुक्यातील सोळशी 1, पिंपोडे बु 3, रहिमतपूर 4, घीगेवाडी 1, गुजरवाडी 1,  चिमणगाव 1, देवूर 1, पिंपोडे 2, जाधवाडी 1, वाठार किरोली 6, नलवडेवाडी 5, शांतीनगर 4, आझाद चौक5, आरफळ कॉलनी 8, संभाजीनगीर 2,  करंजखोप 1,
इतर 6 
बाहेरली जिल्ह्यातील आढळलेले रुग्ण : चव्हाणवाडी ता. आष्टा
9 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष असे   7 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच  कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने 37430
एकूण बाधित 8275
घरी सोडण्यात आलेले 4449
मृत्यु 269
उपचारार्थ रुग्ण 3557

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

कॅप्टन अमोल यादव यांचे विमान आकाशात अधिकृतरित्या घिरट्या घालण्यास सज्ज !

मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी बनवलेल्या पहिल्या स्वदेशी विमानाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता हे विमान आकाशात अधिकृतरित्या घिरट्या घालण्यास सज्ज झाले आहे. अमोल यादव यांचा विमान बनवण्याचा संघर्ष 2009 पासून सुरु होता. विमानाच्या निर्मितीपेक्षा शासकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या विमानाच्या उड्डाणास विलंब लागला आहे. आता या विमानाला लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. (Captain Amol Yadav manufacture six-seater aircraft)

सध्या जगभरातील विमानतळाहून हवेत झेपावणारे एकही विमान भारतीय बनावटीचे नाही. भारतात होणारी प्रवासी विमान वाहतूक ही परदेशी बनावटींच्या विमानातून होते.मात्र स्वदेशी बनावटीचे विमान असावे हे स्वप्न कॅप्टन अमोल यादव नावाच्या अवलियाने बघितले आणि सत्यात देखील उतरवले.

विमानाची निर्मिती करणं हे कॅप्टन अमोल यांच्यासाठी सोप्प नव्हतं. एकीकडे मोठ्ठी आर्थिक तजवीज करावी लागणार होती. आईच्या मंगळसुत्रापासून, भावाचे घर गहाण ठेवून त्यांनी विमान बनवले. तर दुसरीकडे देशातील बाबूगिरीला सामोरं जावं लागणार होतं. विमानाच्या कायदेशीर प्रक्रियांना साधारण वर्षभराचा कालावधी अपेक्षित होता. मात्र लालफीतशाही आडवी आली. त्यामुळे अमोल यादव यांची कित्येक वर्ष खर्ची गेली.

विमाननिर्मिती लालफीतशाही अडकली होती. विमानाचे उड्डाण परवानग्यामध्ये, तर निर्मितीसाठी मंजूर करण्यात आलेली जमीन कायद्याच्या वादात अडकली होती. मेटाकुटीस आलेल्या अमोल यादव यांना हा प्रकल्प अमेरिकेत हलवावा अशी ऑफर अमेरिका सरकारने दिली होती. मात्र देशाप्रती असलेल्या निष्ठेपोटी त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.

पहिल्या विमानाची निर्मिती पूर्ण झाली आहे. प्रवाशांना घेऊन उडण्यास हे विमान सज्ज आहे. सगळ्या परवानग्या मिळालेले या विमानाला अद्याप डीजीसीएच्या हिरव्या क़ंदीलाची अपेक्षा आहे.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील 222 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 7 बाधित नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यातील 222 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 7 बाधित नागरिकांचा मृत्यू
सातारा दि. 17  : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 222  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
कोरोनाबाधित अहवालामध्ये फलटण तालुक्यातील  फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 3,  लोहार गल्ली 2, रविवार पेठ 1, मारवाड पेठ 1,  निंभोरे 1,  साखरवाडी 2, विडणी 1., 

वाई तालुक्यातील वाई शहरामध्ये रविवार पेठेतील न्हावी आळी  1,  सुरुर 1, बेलमाची 3, जेधेवस्ती वारागडेवाडी भूईज 2, धर्मपूरी 1, कोंढवली 4., 

सातारा तालुक्यातील   सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, आकाशवाणी झोपडपट्टी 1, शाहूनगर 1, गुरुवार पेठ 9, सातारा 7, दुर्गापेठ 3,  शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, गुरुवार परज शनिवार पेठ 1, मल्हारपेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, जानाई कॉलनी 1, फडतरवाडी 2, खेड 2,  गोखलेनगर 1,  भादवडे 1, धनगरवाडी 1, भरतगाववाडी 1, पाटखळ 1, खोदड 1, पिरवाडी 1, नागठाणे 5, धावडशी 3, विकासनगर 9, कोडोली 1, गोडोली 1,  संगमनगर 1, आरफळ 1, कण्हेर 1, समर्थनगर 1,  अतित 1,  ब्राम्हणवाडी (तासगाव) 1, चिंचणेर निंब 2., 

कराड तालुक्यातील  कराड शहरातील आझाद चौक 1, कापील 2, रेठरे बुद्रुक 1, कराड 4, गोटे 1, मलकापूर 1, प्रकाशनगर 1, शिरवडे 1, होळ 2, बनपूरी 1, उंब्रंज 1,  जखीणवाडी 2, सैदापूर 1., 

पाटण तालुक्यातील  ढेबेवाडी 14, पाटण 2, धामणी 1, कडवे बुद्रूक 1, बनपूरी 1, मोरेवाडी-मालदन 1.,

महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 5, गोगवे 27, नगरपालिका 8, डॉ. साबणे रोड 2, देवळी मुरा 3, तालदेव 4., 

कोरेगाव  तालुक्यातील  गोगावलेवाडी 1,  आसनगाव 4, कोरेगाव 4,  कुमठे 1, पिंपोड बुद्रुक 1., 

खटाव तालुक्यातील   तडवळे 1., 

माण तालुक्यातील  म्हसवड 1., 

जावळी तालुक्यातील मोरघर 8,  मेढा 4 , एरणकरवाडी 2, रिटकरवाडी 1, दापवडी 1.,

खंडाळा तालुक्यातील   वडवाडी 3, पारगाव खंडाळा 2, शिरवळ 1, पाडळी 1, धावडवाडी 1, गोटमाळ लोणंद 2 पळशी 2 जणांचा समावेश आहे.   

7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सातारा येथील केसरकर कॉलनी सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कराडातील शनिवार पेठेतील 55 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष,  धामणी, ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष तसेच साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात ओंड ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष व पाटखळ ता. सातारा येथील 66 वर्षीय महिला, अशा एकूण 7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
घेतलेले एकूण नमुने                              -- 36015
एकूण बाधित                                       --   7593
घरी सोडण्यात आलेले                           --   3940
मृत्यू                                                   --     249
उपचारार्थ रुग्ण                                     --  3404

*जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ३ महिने पगारच नाही*

*जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ३ महिने पगारच नाही* 

सातारा दि.17. जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातले असताना या आपत्ती च्या काळात संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य केंद्रात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर भरती केलेल्या आणि आत्ता ग्रामीण तसेच शहरी भागातील या आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत अल्प वेतन(४००००) आणि नियमित नोकरीची कसलीही शाश्वती नसताना तसेच अहोरात्र काम करत असलेले बी ए एम एस कंत्राटी डॉक्टर मागील 3 महिन्यांपासून हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत. 
            प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करण्यासाठी प्रशासनाने वारंवार जाहिराती काढून सुद्धा  एम बी बी एस डॉक्टरांनी त्याकडे पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तदर्थ वैद्यकीय अधिकारी हे पद तयार करून महाराष्ट्र सरकार च्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने बी ए एम एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया केली. सध्या कोविड काळात हे अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असून आपापली जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहेत, वर्ग एक च्या कर्मचाऱ्यांना मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षा कमी मानधन ते पण भरती झाल्यापासून अनियमित होत आहे. प्रत्येक वेळी या कोरोना योद्ध्यांना प्रशासनाला साकडे घालावे लागत आहे तरीही गेल्या मे महिन्यापासून जिल्ह्यात कार्यरत सर्व कंत्राटी बी ए एम एस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
                  *समान काम समान वेतन* या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना वेतन पद्धती नाहीच तसेच कंत्राटी एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५५००० या त्यांच्या पहिल्या वेतनात २०००० ची भरगोस वाढ करून दुर्गम भागात सेवा देणाऱ्या एम बी बी एस उमेदवारास ८०००० तर इतर ठिकाणी ७५००० प्रति महिना द्यायचा निर्णय घेतला पण बी ए एम एस पदवीधारकाला समान काम असून सुद्धा वेतनात मात्र दुप्पट तफावत ठेऊन त्यांच्यावर मोठा अन्याय केला. अशा परिस्थितीत त्यांच्या गट अ च्या पदावर नियुक्त असलेले बी ए एम एस वैद्यकीय अधिकारी यांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर राबवून घेतले जात आहे, त्यांना ना प्रोत्साहन भत्ता ना वेतनवाढ मिळाली, मिळाली ती फक्त्त आणि फक्त्त उपेक्षा तरी एवढे अल्प वेतन ते पण ३-३ महिने प्रलंबित असून हे अधिकारी आपले काम अजून नियमित पणे आणि उत्कृष्टपणे करून या आपत्तीत समाजाची सेवा करत आहेत त्यांना या कामाचा अतिरिक्त भत्ता सोडाच आहे ते तुटपुंजे वेतन पण प्रशासन वेळेवर करत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक वेळी होणाऱ्या त्यांच्या परवडीचं एकदाच सोक्ष मोक्ष लावून आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांचे वेतन लवकर करावे व इथून पुढे नियमित करावे.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...