गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न - गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश,
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न
             - गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई


सातारा दि.19 :  येत्या 22 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी  मुंबई, नवी मुंबई, उपनगरे या भागातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यासह अनेक जिल्ह्यात  गणेशभक्त येणार आहेत त्यांचा प्रवास सुखद व्हावा म्हणून पुणे- सातारा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला दिले असून यावर मॉनिटरींग करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
  टोलनाक्यावर गर्दी होऊ नये यासाठी दोन लेन फक्त गणेश भक्तांची वाहने जाण्यासाठी ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गर्दीच्या नियंत्रणासाठी व टोलनाक्यावर वादविवाद होऊ नये म्हणून टोलनाक्यावर अधिकचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  काही वाद झाल्यास तो पोलीस यंत्रणेकडून तात्काळ मिटविण्याचे आदेशही संबंधित जिल्ह्याच्या  पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. ई- पास घेतलेल्या वाहनांकडून कुठल्याही प्रकारचे टोल वसुल न करण्याचे  आदेशही शासनाने निर्गमित केले आहेत.   गणेश भक्तांचा प्रवास सुख व्हावा यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही  गृह (ग्रामीण) राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...