सातारा दि.17. जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातले असताना या आपत्ती च्या काळात संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य केंद्रात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर भरती केलेल्या आणि आत्ता ग्रामीण तसेच शहरी भागातील या आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत अल्प वेतन(४००००) आणि नियमित नोकरीची कसलीही शाश्वती नसताना तसेच अहोरात्र काम करत असलेले बी ए एम एस कंत्राटी डॉक्टर मागील 3 महिन्यांपासून हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करण्यासाठी प्रशासनाने वारंवार जाहिराती काढून सुद्धा एम बी बी एस डॉक्टरांनी त्याकडे पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तदर्थ वैद्यकीय अधिकारी हे पद तयार करून महाराष्ट्र सरकार च्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने बी ए एम एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया केली. सध्या कोविड काळात हे अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असून आपापली जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहेत, वर्ग एक च्या कर्मचाऱ्यांना मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षा कमी मानधन ते पण भरती झाल्यापासून अनियमित होत आहे. प्रत्येक वेळी या कोरोना योद्ध्यांना प्रशासनाला साकडे घालावे लागत आहे तरीही गेल्या मे महिन्यापासून जिल्ह्यात कार्यरत सर्व कंत्राटी बी ए एम एस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
*समान काम समान वेतन* या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना वेतन पद्धती नाहीच तसेच कंत्राटी एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५५००० या त्यांच्या पहिल्या वेतनात २०००० ची भरगोस वाढ करून दुर्गम भागात सेवा देणाऱ्या एम बी बी एस उमेदवारास ८०००० तर इतर ठिकाणी ७५००० प्रति महिना द्यायचा निर्णय घेतला पण बी ए एम एस पदवीधारकाला समान काम असून सुद्धा वेतनात मात्र दुप्पट तफावत ठेऊन त्यांच्यावर मोठा अन्याय केला. अशा परिस्थितीत त्यांच्या गट अ च्या पदावर नियुक्त असलेले बी ए एम एस वैद्यकीय अधिकारी यांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर राबवून घेतले जात आहे, त्यांना ना प्रोत्साहन भत्ता ना वेतनवाढ मिळाली, मिळाली ती फक्त्त आणि फक्त्त उपेक्षा तरी एवढे अल्प वेतन ते पण ३-३ महिने प्रलंबित असून हे अधिकारी आपले काम अजून नियमित पणे आणि उत्कृष्टपणे करून या आपत्तीत समाजाची सेवा करत आहेत त्यांना या कामाचा अतिरिक्त भत्ता सोडाच आहे ते तुटपुंजे वेतन पण प्रशासन वेळेवर करत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक वेळी होणाऱ्या त्यांच्या परवडीचं एकदाच सोक्ष मोक्ष लावून आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांचे वेतन लवकर करावे व इथून पुढे नियमित करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा