गुरुवार, २३ जुलै, २०२०

सातारा : 42 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू 462 जणांचे नमुने तपासणीला

42 नागरिकांना दिला  डिस्चार्ज; 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू
462 जणांचे नमुने तपासणीला

सातारा दि. 23 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 42 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील आनेवाडी पोलीसस्टेशन येथील 20 वर्षीय युवक, सायगाव येथील वय 20,19,19 वर्षीय युवक व 22, 46 वर्षीय महिला, तेटली येथील 56, 22 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, 

सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 47, 14 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, जिहे येथील 15, 65 वर्षीय पुरुष व 60, 33  वर्षीय महिला.,

कराड तालुक्यातील  धावरवाडी येथील 14 वर्षीय युवक व 34 वर्षीय महिला, तारुख येथील  31 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 24 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 33 वर्षीय महिला, रेठरे येथील 25 वर्षीय महिला, शेणोली येथील 26 वर्षीय पुरुष,  मलकापुर येथील 51 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, बनपुरी येथील 53 वर्षीय पुरुष.,

वाई तालुक्यातील नवेचीवाडी वाई येथील 35 वर्षीय पुरुष.,

खटाव तालुक्यातील  निमसोड येथील 33 वर्षीय महिला.,

कोरेगाव तालुक्यातील  चिलेवाडी भाडळे येथील 30 वर्षीय पुरुष.,

खंडाळा तालुक्यातील  शिरवळ येथील 82 वर्षीय पुरुष व 65, 23, 45 वर्षीय महिला.,

पाटण तालुक्यातील  मल्हारपेठ येथील 16, 14 वर्षीय युवती व 18 वर्षीय युवक,  मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 36 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील  43 वर्षीय महिला, कासाणी येथील 42 वर्षीय पुरुष व 52, 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

462 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 30, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 33, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 34, वाई येथील 33, शिरवळ येथील 69, रायगाव येथील 44, पानमळेवाडी येथील 48, मायणी येथील 31, महाबळेश्वर येथे 8,  खावली येथील 54 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 47 असे एकूण 462 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 

3 कोरोनाबाधितांचा मृत्यू

कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या रेठरे बु.ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, व क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोर्टी ता.कराड येथील 65 वर्षीय पुरुष व निगडी ता.पाटण येथील 75 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

घेतलेले एकूण नमुने 23677
एकूण बाधित 2760
घरी सोडण्यात आलेले 1538
मृत्यू 98
उपचारार्थ रुग्ण 1124

संवेदनशील मनाचे साहेब....

संवेदनशील मनाचे साहेब....
वार - बुधवार दि.22 जुलै, 2020 रोजी
वेळ - सायंकाळी 6.35 वाजता
स्थळ: सागांव ता.पाटण

पाटणच्या घाटातून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे लाल दिव्याच्या गाडीतून आगमन होते. नियोजित सांत्वनपर भेटीसाठी सागाव मध्ये ते येणार असतात.  सोशल डिस्टन्स ठेवून शासनाच्या नियमांचे पालन करत काही साहेबप्रेमी या वेळी उपस्थित असतात. आपला निष्ठावान कार्यकर्ता हरपल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी साहेब त्या ठिकाणी आलेले असतात. थोडावेळ त्या कुटंबियांच्या घरी थांबल्यावर मा.नामदारसाहेब पुढील नियोजित कामासाठी निघतात. जमलेेल्या लोकांना नमस्कार करतात. इतक्या घाईतही कुणाच्या काही समस्या आहेत का याची आवर्जून विचारपूस करतात.
अशातच एक कार्यकर्ता साहेबांना म्हणतो, ‘‘साहेब आबांची तब्बेत बरी नाही.’’
त्यावर साहेब म्हणतात, ‘‘कुठे आहेत आता’.

कार्यकर्ता: ‘‘ घरी आहेत’’..

साहेब: चल, जावूया घरी.....

साहेबांच्या या अनपेक्षित उत्तराने कार्यकर्ता गोंधळून जातो. याचवेळी साहेब त्याला प्रेमाने दरडावतात. अरे आता सांगितलयस ना, मग बस की गाडीत. साहेब त्याला स्वतःच्या गाडीतून घेवून थेट त्याच्या ढेबेवाडीतील घरी जातात. तेथे आवर्जून त्यांच्या वडिलांच्या तब्बेतीची चैकशी करतात. आणि थेट पुढे निघून जातात.
खरंतर साहेबांची नियोजित कामे अनेक असतात. परंतू अशा आपुलकीच्या भेटीमुळे कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्यामध्ये नवा उत्साह येतो. सध्या कोविड-19 च्या संसर्गामुळे नामदार शंभूराज देसाई संपूर्ण जिल्हयात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वासीम जिल्हयाचे पालकमंत्री असलेले ना.शंभूराज देसाई वासीम जिल्हयातदेखील नेहमी संपर्क ठेवून असतात. नामदार साहेबांच्या या जनसंपर्काचे कौतुक करावेच लागेल.
केवळ तोंडदेखले विचारपूस करण्याऐवजी मनापासून आपल्या मतदारसंघात नेहमी कार्यरत असलेल्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या या कृतीची ढेबेवाडीत बराच काळ चर्चा रंगली होती.

लेखन: डाॅ.संदीप डाकवे

सातारा ; सोशल मिडीयावर पसरवलेल्या खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा- जिल्हाधिकारी

सोशल मिडीयावर पसरवलेल्या खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा- जिल्हाधिकारी
सातारा दि. 23  : सोशल मीडियावर फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. "आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश या मथळ्याखाली  सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश, आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते ४ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा इत्यादी "  अशा आशयाचे खोटे संदेश सोशल मिडीयावरुन प्रसारीत होत आहेत. या प्रकारचे कोणतेही आदेश सद्यस्थितीत सातारा प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत सतर्क न राहता त्याला बळी पडू नये असे, आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

*सातारा : जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित;**एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यु*

*जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित;*
*एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यु*

सातारा दि. 23 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 97 आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 5 असे एकूण 102 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.

*कराड तालुक्यातील* कराड शहरातील बुधवार पेठ येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 45, 60 वर्षीय महिला, शारदा क्लिनीक येथील 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 26, 50 वर्षीय महिला, कालवडे येथील 29, 58, 50 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 52, 17, 26 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, येळगांव येथील 41, 31, 20, 68 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 12, 14, 48 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, वहागांव येथील 65, 21 वर्षीय महिला, 3 वर्षीय पुरुष, पाटोळे येथील 3, 25 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, चिखली येथील 55 वर्षीय महिला, कवठे येथील 26 वर्षीय पुरुष. 

*पाटण तालुक्यातील* कासणी येथील 38 वर्षीय महिला, नेरले येथील 58 वर्षीय पुरुष, 

*जावळी तालुक्यातील* रायगांव येथील 33, 24, 22, 31, 34, वर्षीय पुरुष, 25, 25, 45, 21 वर्षीय महिला, मेढा येथील 31 वर्षीय महिला, 11 वर्षीय पुरुष, सायगाव येथील पुरुष, मोरघर येथील महिला

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वरमधील 52 वर्षीय पुरुष, भुत्तेघर येथील 49 वर्षीय पुरुष, 

*वाई तालुक्यातील* बावधन येथील 59 वर्षीय महिला, धर्मपुरी येथील 10, 46 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 15, 53, 51 वर्षीय पुरुष, 35, 11 वर्षीय महिला, शेंदुरजने येथील 80 वर्षीय महिला, 73, 45, 14 वर्षीय पुरुष, पाचपुते येथील 25 वर्षीय पुरुष, 

*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील बुधवार पेठ येथील 53, 49, 16 वर्षीय पुरुष, मंगलानी काॅलनी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65, 18, 40, 05, 72 वर्षीय पुरुष, 50, 20, 27, 65, 01, 24 वर्षीय महिला, शेळकेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51, 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 33 वर्षीय पुरुष, 

*फलटण तालुक्यातील* निभोरे येथील 53 वर्षीय पुरुष, रावडी येथील 1 पुरुष, 

*खंडाळा तालुक्यातील* अहिरे येथील 40 वर्षीय महिला, 77 वर्षीय पुरुष, 

*कोरेगांव तालुक्यातील* शिवाजीनगर येथील येथील 30 वर्षीय पुरुष, शिरंबे येथील 39, 39 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 3, 32, 60 वर्षीय महिला, 9 वर्षीय पुरुष, 

*खटाव तालुक्यातील* वडूज येथील 19, 69 वर्षीय पुरुष, 

*अँटिजन टेस्ट्सनुसार* - महाबळेश्वर तालुक्याती गोडवली येथील 45, 80 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला. 
कराड तालुक्यातील कराड येथील 37 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 

*एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यु*

जिल्हा रुग्णालय सातारा येथे कोडोली ता. सातारा येथील ७५ वर्षीय पुरुष बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. 
तसेच कोटी ता.कराड ६५ वर्षी पुरुष, निगडी ता.पाटण येथील ७५ वर्षीय महिला, तसेच नायगांव ता. कोरेगांव येथील ६८ वर्षीय पुरुष या तिघांचा उपचार चालु असताना मृत्यु झाला असुन कोरोना संशयित म्हणुन त्यांचा स्वॉब घेण्यात आलेला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सेवानिवृत्तीच्या दिवशीच अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम देण्याची व्यवस्था करा ! मंत्री यशोमती ठाकूर

▪ प्रलंबित प्रकरणांसाठी नोडल अधिकारी; महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश

मुंबई, दि. २२ : अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी; तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते.मात्र, ही रक्कमदेखील सेवानिवृत्तीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री ॲड. ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या. त्यांनी याची तात्काळ दखल घेतली आणि आज भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अधिकाऱ्यांना या संदर्भात मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून बोलावून घेतले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या.

 

 

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची एलआयसी विम्याची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबत माहिती घेतानाच ॲड. ठाकूर यांनी विमा प्रक्रियेबाबतही माहिती जाणून घेतली.  विम्याच्या दाव्यांवर सेवानिवृत्तीनंतर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन विम्याचे पैसे सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळण्याकरिता निवृत्तीपूर्वी 2 महिने आधी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस या लहान बालकांचे पोषण, गर्भवती महिला, स्तनदा मातांचे पोषण, आरोग्य यासाठी समर्पण भावनेने काम करत असताना त्यांचेच देणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे हे भूषणावह नाही. त्यामुळे सध्या असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना दिलासा द्या; प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.

 

बुधवार, २२ जुलै, २०२०

कराड तालुक्यातील 11 आणि पाटण तालुक्यातील 1 असे 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कराड तालुक्यातील 11 आणि पाटण तालुक्यातील 1 असे 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा दि. 22 :  कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील तपासणी अहवालानुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

 कोरोनाबाधित अहवालामध्ये  कराड तालुक्यातील कराड शहरातील शुक्रवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 31 वर्षीय महिला, सवादे येथील 38 वर्षीय पुरुष,  वडगाव हवेली येथील 35 वर्षीय महिला, व 49 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 42, 45 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, कोडोली येथील 31 वर्षीय महिला,

पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

4 कोरोनाबाधितांचा मृत्यू

कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या तारुख ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, व एकसळ ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष तसेच क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बापूजी साळुंखेनगर कराड येथील 37 वर्षीय पुरुष व चितली ता. खटाव येथील 28 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

घेतलेले एकूण नमुने 22620
एकूण बाधित 2644
घरी सोडण्यात आलेले 1496
मृत्यू 94
उपचारार्थ रुग्ण 1054


सातारा; जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 3 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 3 बाधितांचा मृत्यू
सातारा दि. 22 : काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 86 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
 वाई तालुक्यातील परखंडी येथील 70,57,37, वर्षीय पुरुष,व, 11 वर्षाचा युवक,  सिध्दनाथवाडी येथील 72  वर्षीय पुरुष, भुईज येथील 32 वर्षाचा पुरुष, पसरणी येथील 67 वर्षीय महिला, 11 व 14 वर्षाचा बालक, 36,76,39 वर्षीय पुरुष,वाई येथील 40 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला,
 खंडाळा तालुक्यातील खडाळा येथील 34 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक व 8 वर्षीय बालिका,विंग येथील 34,28 वर्षीय पुरुष,शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील काझी कॉलनी  39 वर्षीय महिला, शिरवळ येथील  10 वर्षीय बालिका,पाडेगाव 55 वर्षीय महिला,मावशी येथील 41,65 वर्षीय पुरुष,
 सातारा तालुक्यातील जिहे येथील 65वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 55,46 वर्षीय पुरुष, शांतीनगर सातारा येथील 52 वर्षीय पुरुष,देगावरोड, 39 वर्षीय पुरुष,सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष,
 खटाव तालुक्यातील नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 27 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, खतगुण येथील 85 वर्षीय महिला,
 माण तालुक्यातील  मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, अंथणी येथील 60 वर्षीय पुरुष, 
 कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 61,63,37,63,48,27,,37वर्षीय महिला व 63 व 39 वर्षीय पुरुष,बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष,
 फलटण तालुक्यातील  शिवाजीनगर  फलटण येथील 33 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील54 वर्षीय पुरुष,   गोळीबार मैदान, 29 व 24 वर्षीय पुरुष, कोळकी  येथील 33 व 60 वर्षीय महिला, कोळकी  येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचा बालक, 3 वर्षीय बालिका. जिंती नाका येथील 36 वर्षीय पुरुष,रविवार पेठ 33 वर्षिय महिला व  58 वर्षीय पुरुष,
 पाटण तालुक्यातील नेरले येथील35, 48 वर्षीय पुरुष, माहीद 55, 48 वर्षीय महिला खाले 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय महिला, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष, 
 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 52 वर्षीय पुरुष, गोडोवली येथील 40,23, वर्षीय पुरुष, 13 व 17 युवक 
 कराड तालुक्यातील शामगाव येथील 76 व 70 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 60, 65,40 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 45 वर्षीय महिला टेंबू येथील 40 वर्षीय महिला,कार्वे नाका  येथील 50 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुष, मासोली 24 येथील वर्षीय पुरुष,  कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय महिला, रेठरे येथील 29 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक येथील  26 व 60 वर्षीय पुरुष, 
  जावली तालुक्यातील  सायगाव येथील 22 वर्षीय तरुणी व 18वर्षीय तरुण , 34 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष,
3 बाधितांचा मृत्यू
 तसेच शारदा हॉस्पिटल कराड येथे बुधवार पेठ ता. कराड येथील 53 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे अहिरे ता. खंडाळा येथील 77 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खालगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला गुरुवार पेठ सातरा येथील 72 वर्षीय पुरुषाचा  अशा 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. 

घेतलेले एकूण नमुने एकूण बाधित घरी सोडण्यात आलेले मृत्यू उपचारार्थ रुग्ण
22620 2642 1439 90 1113

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...