सातारा दि. 22 : कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील तपासणी अहवालानुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड शहरातील शुक्रवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 31 वर्षीय महिला, सवादे येथील 38 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 35 वर्षीय महिला, व 49 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 42, 45 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, कोडोली येथील 31 वर्षीय महिला,
पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
4 कोरोनाबाधितांचा मृत्यू
कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या तारुख ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, व एकसळ ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष तसेच क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बापूजी साळुंखेनगर कराड येथील 37 वर्षीय पुरुष व चितली ता. खटाव येथील 28 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
घेतलेले एकूण नमुने 22620
एकूण बाधित 2644
घरी सोडण्यात आलेले 1496
मृत्यू 94
उपचारार्थ रुग्ण 1054
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा