संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, १३ जुलै, २०२५
राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा ची जिल्हास्तरीय सहविचार सभा उत्साहात संपन्न..
गुरुवार, १० जुलै, २०२५
पाटण - मनसे आक्रमक! 'पाटणला मनसेचे उपोषण सुरूच'; दुसऱ्या दिवशी अनेकांची भेट, कराड - चिपळूण रस्त्याचा प्रश्न.
पाटण : कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व लेखी आश्वासन देऊनही केलेल्या टोलवाटोलवीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी कालपासून येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.उपोषण आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.
वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे करूनही राष्ट्रीय महामार्ग व संबंधित प्रशासन कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. कऱ्हाड- चिपळूण रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी होऊन वारंवार बैठका देखील झाल्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. उपोषणादरम्यान केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही.
उपोषण ठिकाणी येऊन गोड बोलण्याला भाळणार नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करमणूक कार्यक्रमाला गेल्यासारखे आंदोलन पाहायला येतात. त्यांना आंदोलनाचे गांभीर्य नाही. संबंधित कंपनी व ठेकेदाराविरोधात कारवाई केल्यावरच मनसेचे आंदोलन स्थगित होईल, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा नारकर व मनसे पदाधिकारी यांनी आज दिला.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी भेट दिली. दरम्यान, दयानंद नलावडे, राहुल संकपाळ, भाजप समन्वयक विक्रमबाबा पाटणकर, अक्षय देसाई, संपत देसाई, बापू टोळे, संजय पवार, बळीराम गायकवाड, चंद्रकांत देसाई यांनी आज आंदोलनाला पाठिंबा दिला.
पाटणमध्ये उलटा धबधबा पाहायला गेले, कार ३०० फूट दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.
पाटण - धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.
पाटण तालुक्यातील सडा वाघापूर रस्त्यावर गुजरवाडीनजीक टेबल पॉईंटवरत कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात साहिल अनिल जाधव (वय २० रा. गोळेश्वर, ता. कराड) गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी कराडच्या सह्याद्री हाँस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
हा अपघात बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान झाला.
– कार गवतावरून घसरून थेट दरीत
सडा वाघापूरला उलटा धबधबा पाहायला जात असताना टेबल पॉईंटवरती अनेक पर्यटक फोटोशूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान साहिल अनिल जाधव आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी आला होता. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान, गाडीमध्ये साहिल जाधव हा एकटाच होता. गाडीला हॅंण्ड ब्रेक लागला नसल्याने गाडी गवतावरुन खोल दरीत कोसळली.
शेळ्या चारणाऱ्या युवकाचे प्रसंगावधान.
म्हावशी येथील बकरी चारण्यासाठी गेलेल्या मंगेश तुकाराम जाधव या युवकास अपघाताचा आवाज आल्याने तो घटनास्थळी पोहचला. दरीतील कोसळलेल्या गाडीचा दरवाजा तोडून त्याने अडकलेल्या अनिलला बाहेर काढले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला. उपस्थितांनी प्रसंगावधान राखत जखमीस तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. नशीब बलवत्तर म्हणून साहिलचे प्राण वाचले. जखमी साहिलची तब्येत बरी असल्याचे दवाखाना प्रशासनाने सांगितले.
बुधवार, ९ जुलै, २०२५
मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली
पाटण पंचायत समितीला 8 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत ई-मेलमुळे मुख्यालयी राहणे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाटण पंचायत समितीला मंगळवारी प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये मुख्यालयी नियमित उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी शासकीय आदेश धुडकावून मुख्यालयी राहत नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
शिस्तभंगाची कारवाई सुरू होणार
या ई-मेलनंतर पंचायत समितीच्या प्रशासकीय कामांना वेग आला असून, मुख्यालयी अनुपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, शासनाचे आदेश झुगारणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
शनिवार, ५ जुलै, २०२५
पाटण तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न; वाचा तुमच्या गावात कोणते आरक्षण ?
पाटण तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न; वाचा तुमच्या गावात कोणते आरक्षण ?
पाटण तालुक्यातील 235 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत झाली. सुमारे 119 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी महिलांना संधी मिळाली आहे. या महिला सरपंचांमध्ये अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जाती 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग 32 तर सर्वसाधारण 75 अशा एकूण 119 ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.
सन 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी हा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे.
शुक्रवारी कै. वत्सलादेवी देसाई कृषी संकुल काळोली येथे पाटण तालुक्यातील 235 ग्रामपंचायतींचे आरक्षण उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या आरक्षणामध्ये अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी महिला आरक्षण निश्चित झाले आहे. तर अनुसूचित जातीच्या 21 पैकी 11 ठिकाणी महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गच्या 64 पैकी 32 गावात महिला, सर्वसाधारणच्या 149 पैकी 75 महिला अशा एकूण 119 ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे.
अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी
वांझोळे, दिवशी खुर्द, साखरी, रासाटी, बनपुरी, रूवले, मरळोशी, उमरकांचन, मणदुरे, घाणबी, अडुळपेठ गावे आरक्षित झाली आहेत. अनुसूचित जातीसाठी चोपदारवाडी, नुने, सावरघर पुर्नवसन, बिबी, ढेबेवाडी, मंद्रूळ हवेली, नाडोली, माजगाव, शिरळ, मालोशी गावे आरक्षित झाली आहेत. तर अनुसूचित जमाती महिलासाठी मुरूड गाव आरक्षित झाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी झाकडे, गोकूळ तर्फ हेळवाक, मंद्रुळकोळे, भोसगाव, आंबवडे खुर्द, उधवणे, पाबळवाडी, नाणेगाव बुद्रुक, टोळेवाडी, महिंद, मोरगिरी, दुसाळे, गमेवाडी पवारवाडी, मस्करवाडी, माथणेवाडी, नहिंबे-चिरंबे, बांधवट, घोट, मेंढोशी, शिवंदेश्वर, अडुळ गावठाण, हुंबरळी, धायटी, हुंबरवाडी, मत्रेवाडी, ढाणकल, धसगाव, चौगुलेवाडी (सांगवड), साबळेवाडी, येरफळे, सोनाईचीवाडी ही गावे आरक्षित झाली आहेत.
आंबळे, आंबवणे, आंबेघर तर्फ मरळी, आबदारवाडी, कडवे बुद्रुक, करपेवाडी, कराटे, कळकेवाडी, कवडेवाडी, कवरवाडी, कसणी, काडोली, काढणे, कातवडी, काळोली, किल्ले मोरगिरी, कुंभारगाव, कुठरे, कुसवडे, केरळ, केळोली, कोकिसरे, कोदळ पुर्नवसन, कोळेकरवाडी, गारवडे, गावडेवाडी, गिरेवाडी, गुढे, गोवारे, गोषटवाडी, चव्हाणवाडी (धामणी), चव्हाणवाडी (नाणेगाव), चाफोली, चिखलेवाडी, चौगुलेवाडी (काळगाव), जमदाडवाडी, जरेवाडी, जळव, जानुगडेवाडी, ठोमसे, तारळे, दाढोली, धावडे, नवसरवाडी, नारळवाडी, निवकणे, निसरे, नेचल, पाचुपतेवाडी, पाळशी, बाचोली, बेलवडे खुर्द, भिलारवाडी, भुडकेवाडी, मल्हारपेठ, मानेवाडी, मारूल तर्फ पाटण, मुळगाव, मोरेवाडी, येराडवाडी, वजरोशी, वाडीकोतावडे, विरेवाडी, शिंगणवाडी, शिंदेवाडी, शितपवाडी, शेडगेवाडी (विहे), सडावाघापूर, सणबूर, सुतारवाडी, सुपूगडेवाडी, सुरूल, सोनवडे, मणेरी, काळगाव ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.
आंब्रग, आंब्रुळे, आटोली, आडदेव, असवलेवाडी, कडवे खुर्द, कळंबे, काठी, कुसरूंड, कोंजवडे, कोरिवळे, खराडवाडी, खळे, खिवशी, खोनोली, गलमेवाडी, गव्हाणवाडी, गाढवखोप, गुंजाळी, गोठणे, घाणव, घोटील, जाधववाडी, जाळगेवाडी, जिंती, डांगिष्टेवाडी, डावरी, डिगेवाडी, डेरवण, डोंगळेवाडी, तामकडे, तामिणे, तोंडोशी, त्रिपुडी, दिवशी बुद्रुक, धडामवाडी, धामणी, नाटोशी, नाडे, नाणेल, नाणेगाव खुर्द, नावडी, निवडे पुर्नवसन, निवी, पाचगणी, पाठवडे, पाडळोशी, पेठशिवापूर, बनपेठवाडी, बांबवडे, बोंद्री, बोडकेवाडी, मंद्रुळकोळे खुर्द, मरळी, मराठवाडी, मान्याचीवाडी, मारूल हवेली, मालदन, मेंढेघर, म्हावशी, येराड, रामिष्टेवाडी, राहुडे, लेंढोरी, वाघजाईवाडी, वाझोली, वाटोळे, विहे, वेताळवाडी, संभाजीनगर (वेखंडवाडी), सळवे, सांगवड, साईकडे, सुळेवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंच पदासाठी काहीर, पापर्डे, शिद्रकवाडी, केर, उरूल, भारसाखळे, निगडे, चिटेघर, ढोरोशी, कारवट, पिंपळोशी, सातर, हेळवाक, कोचरेवाडी, टेळेवाडी, पाणेरी, बहुले, कारळे, कामरगाव, नाव, चाळकेवाडी, ताईगडेवाडी, नेरळे, गोकूळ तर्फ पाटण, चोपडी, आवर्डे, डाकेवाडी, काळगाव, हावळेवाडी, शेडगेवाडी, लुगडेवाडी, चाफळ, मेंढ ही गावे आरक्षित झाली आहेत.
या गावच्या सरपंच पदांचा समावेश झालेला आहे. 2025 ते 2030 या पुढील पाच वर्षांसाठी 235 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीवेळी नायब तहसीलदार पंडित पाटील, रवी सावंत, विनायक पाटील, संतोष गरुड, शकील मुल्ला, मंडलाधिकारी असवले तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवार, ४ जुलै, २०२५
कुंभारगाव ग्रामपंचायतीत सरपंच सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण.
सातारा जिल्ह्यात सरपंचपदासाठी तालुकानिहाय आरक्षण सोडत सर्व तालुक्यांत आज दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात आली आहे.
जनतेतून थेट सरपंच निवड असल्यामुळे आपल्या गावचे सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार, याची गावोगावी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही सोडत अत्यंत महत्त्वाची असून राजकीय समीकरणांना कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे या सरपंच आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते .
पाटण तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या कुंभारगाव ग्रामपंचायतीत सन 2025 - 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग असे आरक्षण आले आहे.
काळगाव - मरणानंतरही यातना... गावाला स्मशानभूमी नाही, तुफान बरसणाऱ्या पावसात प्रेताला अग्नि कसा द्यायचा?
![]() |
| संग्रहित चित्र |
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

