बुधवार, २ जून, २०२१

आयुष्य यशाने प्रकाशित करायचे असेल तर जीवनात कष्ट हेच एकमेव पर्याय आहे युवकांनो उद्योग - व्यवसायात प्रगती करा; मी सोबत आहे - सारंग पाटील.

आयुष्य यशाने प्रकाशित करायचे असेल तर जीवनात कष्ट हेच एकमेव पर्याय आहे युवकांनो उद्योग - व्यवसायात प्रगती करा; मी सोबत आहे - सारंग पाटील.

ढेबेवाडी ता.पाटण : ढेबेवाडी विभागातील किरण ज्ञानदेव पाटील यांनी रविवारी दि.30 मे ऐवजी युवकांसाठी Zoom द्वारे "संवाद सत्र" हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मार्गदर्शनपर ते बोलत होते.या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक सादर केले आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री. सारंग श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थी तसेच युवकांना व्यवसायाच्या प्रगतीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. सातारा जिल्हा हा सर्व गुणसंपन्न आहे, सातारा म्हणजे शुरवीरांची भूमी, कष्टकरी,शेतकरी आणि सर्वच क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या महापूरुषांची भूमी आहे. युवा पिढीने त्यांच्या आदर्शाला नजरेसमोर ठेवून स्वतःची प्रगती केली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व काही बदलत आहे सर्व काही प्रगती पथावर आहे. या बदलत्या काळात युवा वर्गाने स्वतःला विकसित केले पाहिजे असेही सारंगबाबा म्हणाले.

श्री.सारंग श्रीनिवास पाटील हे उत्तम प्रशिक्षित, उत्तम व्यवसायिक आहेत. सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात काम करत असताना युवकांनी स्वतःच्या पायावर सक्षम झाले पाहिजे हे त्यांचे धोरण असून युवकांच्या प्रगतीसाठी ते मार्गदर्शन करत असतात. किरण पाटील ढेबेवाडी विभागातील समस्या, निवेदने देत असतात आणि सारंगबाबांच्या माध्यमातून जे करता येईल ते समाजासाठी करत असतात. येणाऱ्या काळात सारंगबाबांच्या माध्यमातून ढेबेवाडी भागातील जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे शेवटी  किरण पाटील यांनी सांगितले

*सातारा:शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन*

*सातारा:शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन* 

सातारा दि.1 :  2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना,  विजांच्या कडकडाटासह   पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते ,कृषी हवामान शास्त्र विभाग ,पुणे यांनी वर्तवली आहे.   
 सोयाबीन, बाजरी,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.
   भात पिकासाठी रोपवाटिका ची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत.
  सोयाबीन,बाजरी,उडीद 
,मूग ,मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
   जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी  किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई  करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्या मुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये असे अहवान महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे.

मंगळवार, १ जून, २०२१

*सातारा:कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे गृह राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना*

*सातारा:कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे गृह राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना* 
सातारा दि.1:-  जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई यांनी केल्या .
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
लसीकरण केंद्रावर नागरिकांना टोकन दिल्या नंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जो नागरिक कोरोना बाधित झाला आहे त्याच्या संपर्कात जे-जे आले आहेत त्या सर्वांचा शोध घ्यावा. 
तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी. त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारती ताब्यात घ्यावत, अशा सूचना गृह राज्य मंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.

‘स्पंदन कवी मनांचं’ या काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

  ‘स्पंदन कवी मनांचं’ या काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

तळमावले/वार्ताहर
‘स्पंदन कवी मनांचं’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. प्रथम नाव नोंदवलेल्या 51 कवींना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. कवितेसोबत कविचे पूर्ण नांव, पत्ता, आयडेंटी फोटो, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये स्वतःबद्दलची माहिती पाठवावी. कवितेचा विषय शेतकरी, शेती यासंबंधी असावा. इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे आडनावातील पहिल्या अक्षरानुसार कवितेंचा क्रम असेल. प्रत्येक कविला सदर काव्यसंग्रहाच्या 10 प्रती व आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी रु.500/- मुल्य असणार आहे. हे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक शाखा कुंभारगांव, खाते क्रमांक. 0625104000046844 या खात्यावर किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे वरती पाठवावे.
विषेश म्हणजे या उपक्रमातून जमलेल्या रकमेपैकी काही रक्कम शेतकरी बांधवांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण पाठवलेल्या कविता प्रसिध्द तर होतीलच परंतू गरजूंना मिळालेल्या मदतीमुळे त्याचे मुल्य देखील वाढणार आहे. तरी या उपक्रमांसाठी कविंनी आपल्या किमान 30 ओळीपर्यंतच्या 2 कविता डाॅ.संदीप डाकवे मो. 9764061633., प्रा.ए.बी.कणसे मो. 9822230212 या मोबाईल क्रमांकावर व्हाॅटसअप कराव्यात किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल वरती सोमवार दि.21 जून, 2021 अखेर पाठवाव्यात.
सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र कृषी दिनी गुरुवार दि.1 जुलै, 2021 रोजी शेतकरी बांधवांच्या हस्ते शेताच्या बांधावर करण्याचे नियोजन केले आहे. हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त कविंनी सहभाग व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

कुंभारगाव: सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल- श्री सारंग पाटील


 कुंभारगाव: सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल- श्री सारंग पाटील 
फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
कुंभारगाव  : कुमजाई पर्व वृत्तसेवा
 चिखलेवाडी,कुंभारगाव (ता.पाटण) येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या 10 बेडच्या विलगीकरण कक्षाचे आज मंगळवार दि.1 जून रोजी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री सत्यजितसिह पाटणकर, प.स.पाटण मा.उपसभापती श्री.रमेश मोरे,समाजसेवक श्री योगेश पाटणकर,करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर,श्री मारुती मोळावडे पोलीस पाटील श्री.प्रविण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी श्री.सत्यजितसिह पाटणकर म्हणाले, घरातील विलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांचे विलगीकरण कक्ष उभारावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच इतर अनेक गावामध्ये देखील ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारत असलेले असे विलगीकरण कक्ष गावच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व शासनाच्या प्रयत्नांना यश यावे यासाठी गावपातळीवर विलगीकरण कक्षात रुग्णांनी स्वतःहून दाखल व्हावे, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या विलगीकरण कक्षामुळे चिखलेवाडी व परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी तोडण्यास मदत होईल. वाढती रुग्णसंख्या असणार्‍या गावातील संख्या मर्यादित आणण्यासाठी ग्रामदक्षता समितीला कठोर भुमिका घ्यावी लागेल.
    श्री.सारंग पाटील म्हणाले, कोरोना काळात स्वयंशिस्त, बंधने, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे असे विलगीकरण कक्ष उभाराण्याची वेळ येऊ लागली आहे. मात्र हे दुर्दैवी असून असे कक्ष उभे करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. त्यासाठी दक्षता पाळावी. लोकसहभागतून हे सुसज्ज कक्ष सुरू करण्यात आले असून त्यामध्ये शुध्द पाणी, वाचनालय, प्राथमिक उपचार अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
श्री.रमेश मोरे म्हणाले,चिखलेवाडी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह  रूग्णांचे प्रमाण कमी येण्यासाठी असे कक्ष महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना विरोधातील लढाईत एकजूट दाखवावा हे कक्ष केवळ चिखलेवाडी ग्रामपंचायतीसाठी मर्यादित नसून परिसरातील सर्व नागरिकाना याचा उपयोग करता येईल.डॉ. मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नागरिकांची देखभाल होणार आहे
यावेळी, चिखलेवाडी गावचे सरपंच श्री.दिलीप मोरे,उपसरपंच, सुदाम चव्हाण,वृषाली सपकाळ मॅडम (तलाठी )ग्रामसेवक श्री.प्रसाद यादव .श्री. विक्रम वरेकर,प्रा. सुरेश यादव सर,आबासो बोत्रे, श्रीरंग चाळके,किशोर मोरे,सागर मोरे दादासो यादव,बाबू मोरे,योगेश यादव,
सौ.पूनम धडम,सौ.हेमलता यादव,सौ.प्रमिला माटेकर,सौ.पल्लवी वरेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते प्रारंभी स्वागत प्रा. सुरेश यादव सर यांनी केले. आभार एकनाथ पाटील सर यांनी मानले.

*सातारा जिल्ह्यातील1667 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 21 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील1667 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 21 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 1 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1667 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 21 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 109 (7632), कराड 206 (22399), खंडाळा 79 (10443), खटाव 189 (15977), कोरेगांव 114 (14338),माण 92 (11511), महाबळेश्वर 14 (4030), पाटण 106 (6981), फलटण 339 (26360), सातारा 345 (35466), वाई 67 (11593 ) व इतर 7 (1062) असे आज अखेर  एकूण 167792 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(168), कराड 4 (647), खंडाळा 0 (135), खटाव 1 (414), कोरेगांव 2 (317), माण 1 (214), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 2 (253), सातारा 11 (1044), वाई 0 (305) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3698 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*सातारा जिल्ह्यातील बँकांची वेळासाठी सुधारित आदेश जारी ; सकाळी 11 ते 2 या वेळात फक्त अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील*

*सातारा जिल्ह्यातील बँकांची वेळासाठी सुधारित आदेश जारी ; सकाळी 11 ते 2 या वेळात फक्त अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील*

सातारा दि. 1 :  कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .31 मे च्या आदेशानुसार  दिनांक 8 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU व खाजगी बँका  व सहकारी बँका यांच्याशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे, खते, बी-बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार  इ. कामकाज, एटीएम मध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंट ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत चालू राहील. तसेच या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कारोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. ”

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...