मंगळवार, १ जून, २०२१

*सातारा:कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे गृह राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना*

*सातारा:कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे गृह राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना* 
सातारा दि.1:-  जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई यांनी केल्या .
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
लसीकरण केंद्रावर नागरिकांना टोकन दिल्या नंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जो नागरिक कोरोना बाधित झाला आहे त्याच्या संपर्कात जे-जे आले आहेत त्या सर्वांचा शोध घ्यावा. 
तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी. त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारती ताब्यात घ्यावत, अशा सूचना गृह राज्य मंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...