बुधवार, २ जून, २०२१

आयुष्य यशाने प्रकाशित करायचे असेल तर जीवनात कष्ट हेच एकमेव पर्याय आहे युवकांनो उद्योग - व्यवसायात प्रगती करा; मी सोबत आहे - सारंग पाटील.

आयुष्य यशाने प्रकाशित करायचे असेल तर जीवनात कष्ट हेच एकमेव पर्याय आहे युवकांनो उद्योग - व्यवसायात प्रगती करा; मी सोबत आहे - सारंग पाटील.

ढेबेवाडी ता.पाटण : ढेबेवाडी विभागातील किरण ज्ञानदेव पाटील यांनी रविवारी दि.30 मे ऐवजी युवकांसाठी Zoom द्वारे "संवाद सत्र" हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मार्गदर्शनपर ते बोलत होते.या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक सादर केले आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री. सारंग श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थी तसेच युवकांना व्यवसायाच्या प्रगतीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. सातारा जिल्हा हा सर्व गुणसंपन्न आहे, सातारा म्हणजे शुरवीरांची भूमी, कष्टकरी,शेतकरी आणि सर्वच क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या महापूरुषांची भूमी आहे. युवा पिढीने त्यांच्या आदर्शाला नजरेसमोर ठेवून स्वतःची प्रगती केली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व काही बदलत आहे सर्व काही प्रगती पथावर आहे. या बदलत्या काळात युवा वर्गाने स्वतःला विकसित केले पाहिजे असेही सारंगबाबा म्हणाले.

श्री.सारंग श्रीनिवास पाटील हे उत्तम प्रशिक्षित, उत्तम व्यवसायिक आहेत. सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात काम करत असताना युवकांनी स्वतःच्या पायावर सक्षम झाले पाहिजे हे त्यांचे धोरण असून युवकांच्या प्रगतीसाठी ते मार्गदर्शन करत असतात. किरण पाटील ढेबेवाडी विभागातील समस्या, निवेदने देत असतात आणि सारंगबाबांच्या माध्यमातून जे करता येईल ते समाजासाठी करत असतात. येणाऱ्या काळात सारंगबाबांच्या माध्यमातून ढेबेवाडी भागातील जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे शेवटी  किरण पाटील यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...