मंगळवार, १ जून, २०२१

कुंभारगाव: सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल- श्री सारंग पाटील


 कुंभारगाव: सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल- श्री सारंग पाटील 
फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
कुंभारगाव  : कुमजाई पर्व वृत्तसेवा
 चिखलेवाडी,कुंभारगाव (ता.पाटण) येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या 10 बेडच्या विलगीकरण कक्षाचे आज मंगळवार दि.1 जून रोजी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री सत्यजितसिह पाटणकर, प.स.पाटण मा.उपसभापती श्री.रमेश मोरे,समाजसेवक श्री योगेश पाटणकर,करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर,श्री मारुती मोळावडे पोलीस पाटील श्री.प्रविण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी श्री.सत्यजितसिह पाटणकर म्हणाले, घरातील विलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांचे विलगीकरण कक्ष उभारावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच इतर अनेक गावामध्ये देखील ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारत असलेले असे विलगीकरण कक्ष गावच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी व शासनाच्या प्रयत्नांना यश यावे यासाठी गावपातळीवर विलगीकरण कक्षात रुग्णांनी स्वतःहून दाखल व्हावे, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या विलगीकरण कक्षामुळे चिखलेवाडी व परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी तोडण्यास मदत होईल. वाढती रुग्णसंख्या असणार्‍या गावातील संख्या मर्यादित आणण्यासाठी ग्रामदक्षता समितीला कठोर भुमिका घ्यावी लागेल.
    श्री.सारंग पाटील म्हणाले, कोरोना काळात स्वयंशिस्त, बंधने, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे असे विलगीकरण कक्ष उभाराण्याची वेळ येऊ लागली आहे. मात्र हे दुर्दैवी असून असे कक्ष उभे करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. त्यासाठी दक्षता पाळावी. लोकसहभागतून हे सुसज्ज कक्ष सुरू करण्यात आले असून त्यामध्ये शुध्द पाणी, वाचनालय, प्राथमिक उपचार अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
श्री.रमेश मोरे म्हणाले,चिखलेवाडी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह  रूग्णांचे प्रमाण कमी येण्यासाठी असे कक्ष महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना विरोधातील लढाईत एकजूट दाखवावा हे कक्ष केवळ चिखलेवाडी ग्रामपंचायतीसाठी मर्यादित नसून परिसरातील सर्व नागरिकाना याचा उपयोग करता येईल.डॉ. मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नागरिकांची देखभाल होणार आहे
यावेळी, चिखलेवाडी गावचे सरपंच श्री.दिलीप मोरे,उपसरपंच, सुदाम चव्हाण,वृषाली सपकाळ मॅडम (तलाठी )ग्रामसेवक श्री.प्रसाद यादव .श्री. विक्रम वरेकर,प्रा. सुरेश यादव सर,आबासो बोत्रे, श्रीरंग चाळके,किशोर मोरे,सागर मोरे दादासो यादव,बाबू मोरे,योगेश यादव,
सौ.पूनम धडम,सौ.हेमलता यादव,सौ.प्रमिला माटेकर,सौ.पल्लवी वरेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते प्रारंभी स्वागत प्रा. सुरेश यादव सर यांनी केले. आभार एकनाथ पाटील सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...