गुरुवार, २७ मे, २०२१

कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !

कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !
तळमावले/प्रतिनिधी
चिखलेवाडी (ता.पाटण) येथील एका कोरोना बाधित महिलेचा घरातच मृत्यू झाला असता नातेवाईकानीं आरोग्य विभागाला अंधारात ठेऊन अंत्यसंस्कार उरकल्याने खळबळ उडाली होती 
अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच  उडाली होती प्रतिबंध म्हणून प्रशासनाने आज गुरूवार दि.27 एप्रिल तळमावले प्राथमीक केंद्राअंतर्गत अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये 25 जणांची टेस्ट केली.यातील 1 व्यक्तीचा अहवाल बाधित आल्याने चिखलेवाडी ग्रामस्थांनी व आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला 
तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणी कॅम्प मध्ये डॉ.सुप्रिया यादव तसेच आरोग्य सेविका ए, एम कांबळे, आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा व चिखलेवाडी पोलीस पाटील प्रवीण मोरे, अमित शिंदे सहभागी झाले होते. 


"वापर आणि काढून टाका!"बी ए एम एस. डॉक्टरांसाठीचे धोरण कायमस्वरूपी बदलून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय करण्याची शासनाला मागणी.

 "वापर आणि काढून टाका!"बी ए एम एस. डॉक्टरांसाठीचे धोरण कायमस्वरूपी बदलून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय करण्याची शासनाला मागणी.

अनेक वेळा भरतीसाठी जाहिरात देऊन सुद्धा शासनाला एमबीबीएस(MBBS) धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नव्हते. एमबीबीएस (MBBS) डॉक्टर शासन सेवा करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कमजोर झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी शासनाकडे वारंवार रिक्त असलेल्या पद भरण्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी शासनाने बीएएमएस (BAMS) अर्हता धारकामधून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळ स्थापून त्याव्दारे निवड प्रक्रिया घेवून मुलाखतीद्वारे १३०० याच्यावर तदर्थ वैद्यकीय अधिकारी या पदांवर कंत्राटी पद्धतीने नेमणुका दिल्या.

या तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांच्या नेमणुका झाल्यानंतर लगेचच कोरोना साथीने संपूर्ण महाराष्ट्रसह देशात आपले हातपाय पसरले. या पहिल्या लाटेच्या काळात कोणतेही विमा संरक्षण नसताना , तुटपुंजे  मानधन तेही अनियमित मिळत असताना, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणे रजा व भत्ते मिळत नसताना, वैयक्तिक  संरक्षण साधने अपुरी असताना याबाबत शासनास वेठीस न धरता वैद्यकीय कर्तव्याची जाण ठेवून व ' सेवा हेच व्रत'या उक्तीप्रमाणे स्वतःच्या जीवाची परवा न करता मुख्यालयी राहून 24 तास काम करून कोरोना साथ नियंत्रणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. 

दुसऱ्या लाटे च्या काळातही संपूर्ण क्षमतेने व पहिल्या लाटेच्या अनुभवाच्या जोरावर या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने ग्रामीण भागामधील जनतेला आरोग्यसेवा दिली आहे व देत आहेत.
अशातच शासनाकडून अननुभवी व नवीनच पदवी प्राप्त केलेले  एमबीबीएस अर्हताधारक यांना  वैद्यकीय अधिकारी म्हणून आरोग्य केंद्राची ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत व महाराष्ट्रभर कोरोनाच्या कठीण काळामध्ये शासनाला साथ देणाऱ्या तदर्थ  वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा शासनाने सपाटा लावला आहे. हा निर्णय          लोककल्याणकारक व ग्रामीण भागातील जनतेच्या हिताचा नाही .  तसेच या निर्णयामुळे तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे . या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  दोन वर्षांपासून नियुक्ती आदेशातील जाचक अटी व शर्ती मुळे स्वतःचा खासगी वैद्यकीय व्यवसाय बंद करून 24 तास शासनास सेवा दिली आहे. आत्ता महाराष्ट्रभर जवळ जवळ ८५० तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे . त्यामुळे  नोकरीही नाही व व्यवसाय बंद केल्याने  त्यांच्यावर  बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गहन प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे.
शासनाने गरज सरो वैद्य मरो! 
वापरा आणि काढून टाका! 

हे धोरण बदलणे आवश्यक आहे. कारण एमबीबीएस अर्हताधारक बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी हे दीर्घकाळ शासन सेवा देण्यासाठी उत्सुक नाहीत. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला पात्र होण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये एक वर्षासाठी आरोग्य सेवा देणे सक्तीचे केले असल्याने एमबीबीएस धारक वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत.. जुलै महिन्यामध्ये प्रवेश परीक्षा झाल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी शासन सेवा अर्ध्यात सोडून पदव्युत्तर शिक्षणासाठी निघून जातील दरम्यानच्या काळात तिसरी लाट आल्यास व  डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे .तसेच आरोग्य यंत्रणेचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या कार्यमुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेतल्यास तिसरी लाट व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थेला सोपे जाईल.

तरी शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे व कोरोना साथ उद्रेक काळातील तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आवश्यक   वैद्यकीय अधिकारी गट-ब पदे लवकरात लवकर निर्माण करणेसाठीचा  दीर्घकालीन हिताचा व दूरदृष्टीचा शासन निर्णय करणे व त्याची त्वरीत  अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
 महाराष्ट्रातून अनेक विद्यमान आमदार व खासदार यांनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मा. आरोग्य मंत्र्यांकडे बी. ए . एम. एस. डॉक्टरांसाठी नवीन पदनिर्मिती साठीचा  धोरणात्मक निर्णय होण्यासाठी  पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरी शासनाकडून त्याची दखल घेऊन   तिसरी लाट व्यवस्थापनासाठी आवश्यक बी. ए. एम. एस. अर्हता धारकांसाठी वैद्यकीय अधिकारी गट- ब पदनिर्मिती करून कार्यमुक्त केलेल्या तदर्थ वैद्यकीय अधिकरी  यांना  तात्काळ सेवेत घेणे आवश्यक आहे. बी ए एम एस डॉक्टरांच्या बाबतीत वापरा आणि काढून टाका हे धोरण कायमस्वरूपी बदलून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था स्थायी व बळकट करण्यासाठी ही नियमित पद निर्मिती करून या कार्यमुक्त तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना  दिलासादायक निर्णय करून न्याय देणे गरजेचे आहे . माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी यात जातीने लक्ष घालून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक  आहे.

-------------------------------------

आमच्या प्रतिकूल परिस्थितीत सर्व गोष्टी विरोधात असून कोणताही निर्णय आमच्यासाठी कल्याण कारी नसताना केलेल्या प्रामाणिक सेवेला शासनाने सन्मान द्यावा. आणि बळजबरीने कामाला लावलेल्या bonded mbbs लोकांसाठी कार्यमुक्त केलेल्या सर्व लोकांना पुन्हा शासनसेवेत घेऊन नियमित पदनिर्मिती करुण ऐतिहासिक निर्णय घ्यावा ज्यामुळे mbbs आणि bams यांच्यात इथूनपुढे पदासाठी कलगीतुरा लागणार नाही आणि लोक कल्याणकारी निर्णय घेतल्यामुळे आम्ही सर्व उपेक्षित लोक आपल्या कायम ऋणात राहू. :- डॉ.मंगेश खबाले

*सातारा ; कोरोनाबाधित रुग्णाकडून विविध हॉस्पिटलकडून 20 लाखापेक्षा अधिकचे बिल ; रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

*सातारा ; कोरोनाबाधित रुग्णाकडून विविध हॉस्पिटलकडून 20 लाखापेक्षा अधिकचे बिल ; रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

सातारा दि. 27 :  जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन एकूण 183 रुग्णांची  जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम रु. 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश काढण्याबात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे. 
  महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे ? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे अगर कसे ? याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 63 हॉस्पिटलसाठी  63 ऑडीटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  या पथकामार्फत एकूण 63 हॉस्पिटलमधील 4579 एवढ्या रुग्णांच्या बीलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रुग्णालयांनी  रक्कम रु. 22 कोटी 62 लाख 20 हजार 239 इतकी रक्कम आकारण्यात आली होती. 
  सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना 28 हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
 

*सातारा जिल्ह्यातील 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 27 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 125 (7264), कराड 228 (21537), खंडाळा 135 (10017), खटाव 283 (14908), कोरेगांव 158 (13641),माण 131 (10753), महाबळेश्वर 15 (3926), पाटण 111 (6435), फलटण 1071 (23058), सातारा 343 (34190), वाई 64 (11297 ) व इतर 11 (1000) असे आज अखेर  एकूण 158036 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 9 (621), खंडाळा 1 (131), खटाव 8 (402), कोरेगांव 4 (307), माण 2 (201), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (155), फलटण 0(244), सातारा 9 (997), वाई 0 (298) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3562 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवार, २६ मे, २०२१

*सातारा जिल्ह्यातील :2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील :2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
   तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 94  (7139), कराड 227 (21309), खंडाळा 161 (9882), खटाव 324 (14625), कोरेगांव 181 (13483),माण 138 (10622), महाबळेश्वर 11 (3911), पाटण 81 (6324), फलटण 408 (22087), सातारा 437 (33886), वाई 82 (11233) व इतर 12 (989) असे आज अखेर एकूण 155490 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (164), कराड 4 (612), खंडाळा 4 (130), खटाव 6 (394), कोरेगांव 3 (303), माण 2 (199), महाबळेश्वर 0(42), पाटण 4  (155), फलटण 2(244), सातारा 9 (988), वाई 4 (298) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3529 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

मंगळवार, २५ मे, २०२१

आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी

आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी 

मुंबई, दि. २५ : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. टोपे यांनी  संगितले.

मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.

ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना  करण्यात आली आहे.

म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

*सातारा : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद**सुधारीत आदेश जारी*

सातारा : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद सुधारीत आदेश जारी

  सातारा दि. 25 :  कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार  दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा लागू राहणार नाही.” 

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...