कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !
चिखलेवाडी (ता.पाटण) येथील एका कोरोना बाधित महिलेचा घरातच मृत्यू झाला असता नातेवाईकानीं आरोग्य विभागाला अंधारात ठेऊन अंत्यसंस्कार उरकल्याने खळबळ उडाली होती
अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच उडाली होती प्रतिबंध म्हणून प्रशासनाने आज गुरूवार दि.27 एप्रिल तळमावले प्राथमीक केंद्राअंतर्गत अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये 25 जणांची टेस्ट केली.यातील 1 व्यक्तीचा अहवाल बाधित आल्याने चिखलेवाडी ग्रामस्थांनी व आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला
तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणी कॅम्प मध्ये डॉ.सुप्रिया यादव तसेच आरोग्य सेविका ए, एम कांबळे, आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा व चिखलेवाडी पोलीस पाटील प्रवीण मोरे, अमित शिंदे सहभागी झाले होते.
Bams dr वर सतत अन्याई भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी शासनाचा तीव्र निषेध
उत्तर द्याहटवा