संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १ जुलै, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित ;क्षेत्र माहुली येथील 3 जणांना डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
कुंभारगाव ;- "शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो" ;मुख्याध्यापिका सौ.मंगल मधुकर यादव
यावेळी श्री.घोरपडे सर ,श्री. महाबळ सर, सौ. सावित्रा लोखंडे मँडम ,श्री.प्रा.सचिन पुजारी सर (के सी कॉलेज,तळमावले) , मा श्री विलास देसाई (आरेवाडी ता कराड केंद्रप्रमुख ) या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रा. सचिन पुजारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे ते म्हणाले.
यावेळी श्री मधुकर यादव सर (भवानी विदयामंदिर व ज्यु.कॉलेज,सातारा व मँडमचे पती), मा श्री शिवाजीराव यादव (आरेवाडी माजी सरपंच), मा.श्री.बसाप्पा पुजारी आप्पा (माजी नाईक, श्री वा.वि.तळमावले व मु पो कुंभारगाव ) कार्यक्रमास उपस्थित होते..
कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील शिक्षक श्री वसंत पवार सरांनी मानले.आदरणीय गुरुवर्य यादव उभयतांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित
नोंदणीकृत वर्तमानपत्रांना पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत द्या ; खा.राहुल शेवाळे
मुंबई ; लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र व्यवसायावरही आर्थिक संकट ओढवले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने वृत्तपत्रांना 1 ते 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेवर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, देशभरातील सर्व भाषांमधील नोंदणीकृत दैनिके, पाक्षिके, नियतकालिके, अनियातकालिके, साप्ताहिके, मासिके यांना आर्थिक मदत करावी. त्यामुळे या वृत्तपत्र व्यावसायिकांचे मनोबल वाढून
कोणत्या निकषांच्या आधारावर तुम्ही पत्रकारांच्या सेवा अचानक खंडित करीत आहात ;उच्च न्यायालयाचा वृत्तपत्र मालकांना सवाल
मुंबई; कोणत्या निकषांच्या आधारावर तुम्ही पत्रकारांच्या सेवा अचानक खंडित करीत आहात आणि त्यांच्या वेतनात बेकायदेशीरपणे कपात करीत आहात याचा खुलासा दोन आठवडय़ात लेखी स्वरुपात द्या, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्रातील वृत्तपत्र मालकांना विचारला आहे.
पत्रकारांच्या सेवा अवैधरित्या खंडित करण्याचा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार संघाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न विचारून वृत्तपत्र मालकांच्या वकिलांना निरुत्तर केले.
या प्रकरणात नेमके उत्तर घेऊन दोन आठवडय़ात पुढील सुनावणीसाठी उपस्थित व्हा, असे निर्देश खंडपीठाने यावेळी दिले. यावेळी युक्तिवाद करताना पत्रकार संघटनांच्या वतीने ऍड्. श्रीरंग भांडारकर यांनी वृत्तपत्र मालकांच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकला. त्यांना ऍड्. मनीष शुक्ल यांनी सहकार्य केले. यावेळी वृत्तपत्र मालकांच्या वतीने ऍड्. अनिल मार्डीकर आणि आर एम भांगडे, केंद्र सरकार च्या वतीने उल्हास औरंगाबादकर तर राज्य शासनाच्या कतीने सुमंत देवपुजारी यांनी युक्तिवाद केला.
कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाइन रोजगार मेळावे; २५ हजार ४७ उमेदवार व ११५ उद्योगांचा सहभाग, तर १ हजार २११ उमेदवारांची निवड – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
२५ हजार ४७ उमेदवार व ११५ उद्योगांचा सहभाग, तर १ हजार २११ उमेदवारांची निवड – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. 30 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या मोहीमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण 14 ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन मेळाव्यांमध्ये एकूण 115 उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली 12 हजार 322 रिक्तपदे अधिसूचित केली.
कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी 1 ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी 4 ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.
मंत्री श्री.मलिक म्हणाले की, या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये सर्व रोजगार इच्छूक व ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार संबंधित उद्योगांकडे मुलाखतींचे नियोजन करुन, संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून अवगत करण्यात येते. तसेच त्यांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, स्काईपद्वारे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचे समन्वय कौशल्य विकास कार्यालयांमार्फत केले जाते. महास्वयंम वेबसाईट यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यापुढील काळातही ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत कॅलेंडर तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्व उमेदवार व उद्योग यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री.मलिक यांनी केले आहे.
सातारा; जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आदेश
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...