बुधवार, १ जुलै, २०२०

नोंदणीकृत वर्तमानपत्रांना पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत द्या ; खा.राहुल शेवाळे

नोंदणीकृत वर्तमानपत्रांना पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत द्या
मुंबई ; लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र व्यवसायावरही आर्थिक संकट ओढवले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने वृत्तपत्रांना 1 ते 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेवर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, देशभरातील सर्व भाषांमधील नोंदणीकृत दैनिके, पाक्षिके, नियतकालिके, अनियातकालिके, साप्ताहिके, मासिके यांना आर्थिक मदत करावी. त्यामुळे या वृत्तपत्र व्यावसायिकांचे मनोबल वाढून
 भविष्यात पुन्हा उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...