बुधवार, १ जुलै, २०२०

कुंभारगाव ;- "शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो" ;मुख्याध्यापिका सौ.मंगल मधुकर यादव

कुंभारगाव,(ता.पाटण) शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अखंड ज्ञानावर माझी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षक म्हणजे ज्ञानाची विहीर व विद्यार्थी म्हणजे विहिरीबाहेर असलेला पोहरा आहे. ज्ञानाने विहीर भरलेली असेल तरच विद्यार्थ्यांच्या पोहऱ्यात ज्ञान मिळू शकेल, असे मत सेवानिवृत्त होताना श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव ता पाटण मुख्याधिपिका सौ मंगल मधुकर यादव मँडम यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री.घोरपडे सर ,श्री. महाबळ सर, सौ. सावित्रा लोखंडे मँडम ,श्री.प्रा.सचिन पुजारी सर (के सी कॉलेज,तळमावले) , मा श्री विलास देसाई  (आरेवाडी ता कराड केंद्रप्रमुख ) या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रा. सचिन पुजारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे ते म्हणाले.

यावेळी श्री मधुकर यादव सर (भवानी विदयामंदिर व ज्यु.कॉलेज,सातारा व मँडमचे पती), मा श्री शिवाजीराव यादव  (आरेवाडी माजी सरपंच),  मा.श्री.बसाप्पा पुजारी आप्पा (माजी नाईक, श्री वा.वि.तळमावले व मु पो कुंभारगाव ) कार्यक्रमास उपस्थित होते..  

कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील शिक्षक श्री वसंत पवार सरांनी मानले.आदरणीय गुरुवर्य यादव उभयतांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...