शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

नवी मुंबई : खारघर CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोना

नवी मुंबई - शहरातील खारघर भागात असलेल्या CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली असून नव्या रुग्णांची भर पडल्याने आता खारघर येथे तैनात असलेल्या CRPF च्या एकूण ११ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, CRPF च्या १४६ जवान व अधिकाऱ्यांना काल रात्री उशिरा महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील सहा जणांची चाचणी कोरोना पॉसिटीव्ह आली असल्याचं समजलं आहे.

दरम्यान केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसाठी प्रशासनातर्फे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दोन स्वतंत्र विंग तयार करण्यात आले असूनआवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जवानांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेत.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कराडमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

महाराष्ट्रत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आज २४२ वर पोहोचला आहे. अशातच कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ३ वर पोहोचली आहे.

दि. १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सदर कोरोना बाधित व्यक्ती मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे.

तळमावले : कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..

कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..
तळमावले/वार्ताहर
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे सर्वजण आपाआपल्या घरी आहेत. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लाॅकडाऊन केला आहे. काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे. याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. महिला आपल्या घरगुती कामात मग्न आहेत.
घरात शिलाई मशीन असणाÚया स्त्रिया मशीन वर आपला वेळ घालवत आहेत. कुंभारगाव येथील सौ.सुवर्णा अनिल देसाई या एक कुशल महिला शिलाई कारागीर आहेत. त्यांनी काही वर्षापासून आपल्या परिसरातील महिला, मुली यांना मशीन क्लास अत्यंत अल्प दरात शिकवला आहे.
अनेक मंडळे यामध्ये जावून देखील त्यांनी महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी शिलाई मशीनची शिबीरे घेतली आहेत. त्यातून अनेक महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागात अजूनही मास्क मिळत नाहीत. आणि जरी उपलब्ध असले तरी ते अत्यंत महागडे आहेत. ग्रामीण भागातील लोक ते विकत घेूव शकत नाहीत. यामुळे सदर मास्क आपल्याला करता येतील का याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. या कल्पनेला मुर्त स्वरुप शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनामुळे आले. त्यांनी यासाठी मास्कचे कापड, लेस व इतर आवश्यक साहित्य त्यांना पुरवले. सौ. सुवर्णा देसाई यांनी या कापडाच्या माध्यमातून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. मास्क हा शिलाईमधील नवीन प्रकार असला तरी सौ. देसाई यांना शिलाई कामाची आवड आणि कुटूंबियांची मिळणारी साथ यातून त्यांनी मास्क शिवायला सुरुवात केली.
घरातील दैनंदिन कामे केल्यानंतर फावल्या वेळेत त्या मास्क शिवण्याचे काम करतात. या वेळेत सुमारे 100 ते 150 मास्क त्या शिवतात. या मास्कना परिसरातून चांगली पसंतीदेखील मिळत आहे. सौ.सुवर्णा देसाई यांचे शिलाई कौशल्य यातून दिसून येते. मास्क शिवण्याच्या कामी त्यांना पती अनिल देसाई, मुलगी निशा देसाई, मुलगा शंभूराज देसाई हे मदत करत असतात. सदर मास्क हे ग्रामीण शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या वतीने मोफत वितरित करण्यात येणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

सध्याचे वातावरण पाहता शासनाचे दिलेल्या सुचनांचे पालन करुन समाजासाठी आपल्याला काही करता येईल का? अशी भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांना वापरता येतील असे अल्पदरातील मास्क आपण करावे असा निश्चय केला आािण त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे साहेब यांनी ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे.
-सौ.सुवर्णा देसाई

मुंबई : "कोरोना" मानखुर्द महाराष्ट्रनगर रामभोरोस

मानखुर्द महाराष्ट्र नगर 
कोरोना मुळे संपूर्ण जगात आहाःकार माजला असताना मुंबई मधील कोरोना ची संख्या वाढत चालली आहे झोपडपट्टी मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत असे असताना मानखुर्द महाराष्ट्र नगर मध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो अशा चाळींना या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे अशावेळी त्यावरती उपाययोजना म्हणून सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटायजरचा वापर शौचालय व त्यांचे दरवाजे कडी कोंयडे यांचे निर्जंतुकीकरण हे दररोज होणे गरजेचे असताना महाराष्ट्र नगर मध्ये कोणतीही प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आलेली नाही रहिवाशांचे जीवन रामभरोसे अशी अवस्था झाली आहे.
मुळात ही सार्वजनिक शौचालय ज्या संस्थेने चालवण्यासाठी घेतली आहेत त्याचे पदाधिकारी कोरोना च्या भीतीने नगर सोडून गावी गेले आहेत.
 लाॅक डाऊनला बारा दिवस पूर्ण झाले तरी आजतागायत महापालिकेने सुद्धा यावर  कोणताही निर्णय घेतलेला नाही 
लोकप्रतिनिधीनी सुद्धा दखल घेतलेली नाही.त्यामुळे महाराष्ट्र नगर मधील रहिवाशांचे जीवन धोकादायक ठरू शकते.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

पारनेरमध्ये एक हजारजण होम क्वॉरंटाईन

पारनेर - तालुक्यात परदेशवारी करून आले 21, राज्याच्या बाहेरून 197 तर जिल्ह्याच्या बाहेरून 16 हजार 249 जण आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाने तब्बल सुमारे तीन हजार 967 लोकांना होमक्वॉरोंटईन केले आहे. या लोकांनी आपआपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण कक्षात थांबावे, असा सल्ला त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यात एक मार्च ते 28 मार्च अखेर सुमारे 17 हजार 93 लोक तालुका , जिल्हा , राज्य तर काही परदेश वारी करूण आले आहेत. यात तालुक्याच्या बाहेरून आलेल्यांची संख्या अवघी 542 आहे तर जिल्हयाबाहेरून तसेच राज्य व परदेश वारी केलेल्यांची संख्या त्या मानाने मोठी आहे.या आकडेवारीत अजूनही भर पडणार आहे कारण अजूनही काही गावातील हा सर्वे करणे बाकी आहे.

तालुक्यातील अळकुटी, भाळवणी, निघोज, पळवे खुर्द, कान्हूर पठार, रूई छत्रपती व खडकवाडी अशी सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या मदतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. आज अखेर तालुक्यातील तीन हजार 967 लोकांना होमकोरोंटाईन केले आहे. त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर पडू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. मात्र, यातील कोही लोक घराबाहेर पडताना दिसत आहे मला काहीच झाले नाही.

या भावनेतून अनेक ठिकाणी ही मंडळी जाताना आढळतात. मात्र जर कदाचित यातील एखादा व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली तर त्याचा तालुक्ाला मोठा धोका आहे. तालुक्यातील ज्या लोकांना होमकोरोंटाईन केले आहे त्यांनी 14 दिवस आपली स्वताःची काळजी घ्यावी घराबाहेर पडू नये घरातही वेगळे थांबावे, स्वताःचे, कुटुंबाचे व समाजाचेही रक्षण करावे.

- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी.

साताऱ्यातील 11 तर कराडमधील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

करोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल झालेले साताऱ्यातील 11 व कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील 4 अशा पंधरा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात करोनाचे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील अनुमानित अकरा जणांचा ररिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अनुमानित रुग्ण म्हणूनत्यांना दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील 'एनआयव्ही'कडे तपासणीकरीता पाठविण्यात आले होतो. परदेशातून प्रवास करुन आलेले सात प्रवाशी, इस्लामपूर येथील करोना रुग्णाच्या संपर्कात आलेले दोन व इतर दोन असे एकूण 11 जणांचे आणि कराड - येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोना अनुमानित म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या चारही रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

पाटण : माजी सरपंचाच्या घरातच शिरला बिबट्या

मारुलहवेली, ता. पाटण :

येथील माजी सरपंच नितीन शिंदे यांच्या घरात सोमवारी रात्री बिबट्या शिरल्याची माहिती सारंग पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी याची माहिती वन विभागाला आणि रोहन भाटे यांना दिली. भाटे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना माहिती दिली.

हाडा यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जायला सांगितल्यावर ते शिंदे यांच्या घराच्या परिसरात दाखल झाले. त्यावेळी घराच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसलेला दिसला. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, त्यात न सापडता बिबट्या पसार झाला.

रोहन भाटे, परिक्षेत्र वनाधिकारी काळे, वनरक्षक रमेश जाधवर, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.बिबट्या सापळ्यात येत नसल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडील प्राण्यांना बेशुद्ध करण्याची बंदूक मागवण्यात आली. कोल्हापूर येथून वन विभागाचे डॉ. वाळवेकर व पथक बोलाविण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता डॉ. वाळवेकर यांनी बिबट्याला इंजेक्‍शन मारले. मात्र, तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर अनेक प्रयत्न करण्यात आले.

एक इंजेक्‍शन बिबट्याच्या उजव्या पायाच्या मांडीत लागले. पुन्हा दीड तासाने तेथेच इंजेक्‍शन लागले. मात्र, तरीही बिबट्या बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वाघर कौलावर अंथरुन त्या खालची कौले काढण्यात आली. त्याच वेळी बिबट्याने कौले काढलेल्या ठिकाणावरून पत्र्यावर आणि तेथून शेतात उडी मारून तो पसार झाला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भागात पिंजरे लावण्यात आले आहेत. नितीन शिंदे, प्रकाश पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. वाळवेकर व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...