रविवार, ८ नोव्हेंबर, २०२६

*दिवाळीच्या मंगलपर्वावर पवारवाडीत भगव्या ध्वजाचा दिमाखदार सोहळा!*


मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण; हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिला संदेश

पवारवाडी, धामणी ता. पाटण : दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत पवारवाडी येथे भगव्या ध्वजाचे दिमाखदार ध्वजारोहण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. भगवा ध्वज, उत्साही तरुणाई आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमात भारतीय मराठा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अविनाश पवार दादा, पवारवाडीचे सरपंच मा. श्री. अंकुश पाटील आणि मा. श्री. लालासो चव्हाण सर यांच्या शुभहस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगव्या ध्वजाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केले. हिंदू संस्कृती व परंपरांचे जतन, सामाजिक सलोखा, गावातील एकोपा आणि विकासासाठी तरुणांनी संघटित होऊन पुढाकार घेण्याचे आवाहन केले. समाजहिताच्या उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

या सोहळ्याला श्रीरंग पवार, सागर पवार, स्वयम लोहार, शिवाजी पवार, शैलेश पवार, रविराज लोहार, विशाल पवार, पंकज पवार, प्रशांत पवार, रविराज पवार, सुशांत देसाई, विक्रम सुतार, अंकित पवार, तुषार पवार, पवन लोहार, अथर्व पवार, सार्थक पवार आणि स्वराज पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या प्रकाशपर्वात पार पडलेल्या या ध्वजारोहण सोहळ्याने पवारवाडीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडविले. भगव्या ध्वजाच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा, स्वाभिमान आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*दिवाळीच्या मंगलपर्वावर पवारवाडीत भगव्या ध्वजाचा दिमाखदार सोहळा!*

मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण; हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिला संदेश पवारवाडी, धामणी ता. पाटण : दिवाळीच्या मंग...