मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२६

*पाटण तालुक्यातील आठ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना १६ लाखांचे अनुदान मंजूर* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या आठ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार; तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती.

*पाटण तालुक्यातील आठ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना १६ लाखांचे अनुदान मंजूर*

 गोपीनाथ मुंडे  शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत पाटण  तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या आठ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार; तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती.
 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपये, असे एकूण १६ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.

महसूल विभाग आणि शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करून पाटण प्रशासनाने ही प्रकरणे मार्गी लावली आहेत. शेतात काम करताना किंवा अन्य अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या आठ शेतकऱ्यांच्या वारसांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांची आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून प्रशासनाने शासनाकडून मंजुरी मिळवली.

अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची नावे व गावे पुढीलप्रमाणे :- तुकाराम आनंदा सत्रे (डावरी), उमेश उत्तम लाड (मेंढेघर), नितीन आत्माराम पाटील (माजगाव), सयाजी गणपती लोटळे (लोटळेवाडी, काळगाव), आशा श्रीरंग कवर (कवरवाडी, पिंपळगाव), किसन दाजी वरेकर (नाटोशी), प्रकाश खाशाबा चोपदार (कुसरुंड, कोळेकरवाडी) आणि कृष्णात निवृत्ती शेजवळ (सुळेवाडी).

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. कुटुंबातील कर्त्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या या योजनेतून मिळणारे आर्थिक सहाय्य संबंधित कुटुंबांना मोठा आधार ठरते.

तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण महसूल विभागाने संवेदनशीलतेने पाठपुरावा करून ही प्रकरणे मार्गी लावली. मंजूर अनुदानामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा