“पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमास मान्याचीवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
पाटण तालुक्यात शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “पालकमंत्री कार्यालय आपले दारी” या उपक्रमास मान्याचीवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पाहायला मिळाले.
राज्याचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली तसेच आपल्या अडचणी मांडल्या.
मान्याचीवाडी येथील श्री कुमजाई देवी मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजना, कागदपत्रे, दाखले, तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार जावे लागण्याची गरज कमी होत असून, शासन सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी युवा नेते श्री. स्वप्नील भरत माने, शिवसेना शाखा प्रमुख श्री. पांडुरंग आबासो माने, उपशाखा प्रमुख श्री. कुणाल पोपट माने, कुमजाई देवी चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. संजय बापूराव माने, श्री. तानाजी खाशाबा कुसळे, श्री. रोहित नारायण माने श्री,उमेश बबन माने,श्री.दिलीप आनंदा माने,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात येत असून, अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा