रविवार, ४ जानेवारी, २०२६

मानखुर्द - प्रभाग क्र. १४३ (सर्वसाधारण – महिला) : १८ उमेदवार रिंगणात, लढत चुरशीची - १८ उमेदवारांमुळे मतविभाजन अटळ, प्रमुख पक्षांसमोर कसोटी.



बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६

मानखुर्द - प्रभाग क्र. १४३ (सर्वसाधारण – महिला) : १८ उमेदवार रिंगणात, लढत चुरशीची - १८ उमेदवारांमुळे मतविभाजन अटळ, प्रमुख पक्षांसमोर कसोटी.

मुंबई : साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज- मानखुर्द 
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४३ हा सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव असून या प्रभागात यंदा तब्बल १८ महिला उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांपासून ते स्थानिक व अपक्ष उमेदवारांपर्यंत मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या प्रभागात सत्ताधारी व विरोधी पक्षांसह नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून प्रचारालाही वेग आला आहे. विविध पक्षांची वेगवेगळी चिन्हे मतदारांसमोर असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांचा कस लागणार आहे.

प्रमुख पक्षांचे उमेदवार पुढीलप्रमाणे :

  1. संगीता मोहन कांबळे
    भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
    चिन्ह : हातोडा, विळा आणि तारा

  2. रेहमत फातिमा फिरदौस खान
    नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
    चिन्ह : तुतारी वाजवणारा गाणूस

  3. रचना रविंद्र गवस
    नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
    चिन्ह : घड्याळ

  4. शोभा दिनकर जायभाये
    शिवसेना
    चिन्ह : धनुष्यबाण

  5. प्रांजल प्रशांत राणे
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    चिन्ह : रेल्वे इंजिन

  6. नाझनीन गोहम्मद हसन शाह
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
    चिन्ह : हात

  7. शबाना मोहम्मद फारुक काजी
    ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)
    चिन्ह : पतंग

  8. आयेशा रहेमतउल्ला सय्यद
    समाजवादी पार्टी
    चिन्ह : सायकल

अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या

या प्रभागात १० अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असून त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  1. तरन्नुम मोहम्मद अली – चिन्ह : दूरदर्शन संच
  2. स्वाती अनिल उंब्राटकर – चिन्ह : गॅस सिलेंडर
  3. प्रियांका भारत कांबळे – चिन्ह : ऑटो रिक्षा
  4. ऋतुजा हृदयनाथ तारी – चिन्ह : नारळ
  5. अश्विनी विराग पावसकर – चिन्ह : हिरा
  6. केशर सदाशिव बालगुडे – चिन्ह : शिटी
  7. हलिमा बी कलीमुद्दीन शेख – चिन्ह : पुस्तक
  8. शामा सिद्धार्थ सुरडकर – चिन्ह : पेनाची निब
  9. जरीना बेगम साहुल – चिन्ह : मेणबत्ती
  10. अंजुम आरा अकबर हुसैन – चिन्ह : कप व बशी

स्थानिक प्रश्नांवर होणार लढत

प्रभाग क्र. १४३ मध्ये सार्वजनिक स्वच्छता, गटार व्यवस्था, दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात होणारे पाणी साचणे, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधांवरच ही निवडणूक लढवली जाणार आहे.

एकूणच १८ उमेदवार, विविध पक्ष, वेगवेगळी चिन्हे आणि स्थानिक प्रश्नांचे राजकारण यामुळे प्रभाग क्रमांक १४३ मधील निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम विजय कुणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

१८ उमेदवारांमुळे मतविभाजन अटळ, प्रमुख पक्षांसमोर कसोटी

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक १४३ हा सर्वसाधारण (महिला) राखीव असून या प्रभागात बहुपक्षीय लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक व अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मतांचे तुकडे होण्याची दाट शक्यता असून अंतिम निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत अटीतटीचा राहण्याची चिन्हे आहेत. शब्दांकन - श्री.प्रदीप विष्णु माने,( मुख्य संपादक - साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व न्यूज )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...