संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५
महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप.
महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे सर्व पक्षीय मंडळाच्या सल्लागारांच्या हस्ते उपक्रम संपन्न
मानखुर्द (प्रतिनिधी - विजय साबळे ) — समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखण्याच्या हेतूने शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील सफाई कर्मचारी बांधवांना मिठाई वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे प्रतिष्ठानने दिवाळी सणाच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आपुलकीचा संदेश दिला.
मिठाई वितरण सोहळ्यात सर्व पक्षीय मंडळाचे सल्लागार, स्थानिक मान्यवर आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करत समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा हा उपक्रम मानखुर्द परिसरात आदर्शवत ठरत असून, सामाजिक संवेदना जपणारी ही उपक्रमशीलता स्थानिकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.
या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे प्रमुख विठ्ठल जाधव आणि अध्यक्ष धीरज गाडघे यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सफाई कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा