संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिनांक २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आदोलन
*जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी बांधवांचे थकीत असणारे आणि नेहमी उशिरा होणारे वेतन वेळेवर होण्यासाठी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा मार्फत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी एक दिवसाची किरकोळ रजा टाकून जिल्हा परिषद सातारा समोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी साहेब निवेदन दिले काल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, मा.जिल्हाधिकारी,सातारा, मा पोलिस अधीक्षक सातारा, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांना देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून पगार थकल्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाला ऑनलाईन रिपोर्टीगचे काम बंद केले आहे. महिना अखेरपर्यंत थकीत पगार जमा न झाल्यास २ सप्टेंबरपासून काम बंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
कराड तालुका आरोग्य अधिकारी साहेब व सातारा जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देताना आरोग्य कर्मचारी.
याबाबत राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कराड तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र माळी साहेब निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे
जिल्हा उपाध्यक्ष संदीप साळुंखे, भुंजगराव पाटील, शरद काबळे, अरविंद काळे आरोग्य सहायक तसेच
शेखर पन्हाळे, रोहित भोकरे पंकज यादव, किरण पाटील, स्वप्नील सुतार, रविंद्र सुतार, दत्तात्रय गायकवाड, हेमंत कुसनाके, विनायक आरेकर आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.
📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६ तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चि...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा