काले :दिवाळी किल्लेबांधणी स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी /मनोज सावंत
काले ता.कराड - दिवाळी सण आणि किल्ला यांचे नाते अतूट आणि जुने आहे. दिवाळीत बनवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपल्याला साक्ष देतात
रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किल्ले. जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. पण, दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात ओढ कमी झाली आहे.हाच धागा पकडून नवरत्न गणेश मंडळ संजय नगर काले या मंडळाने या वर्षी किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,किल्ले बांधणी स्पर्धेचे मंडळाचे हे तिसरे वर्ष असून किल्ले बांधणी स्पर्धेत या स्पर्धेला परिसरातील मुलांनी भाग घेऊन वेगवेगळे किल्ले साकारले या स्पर्धेत एकूण १५ जणांनी भाग घेतला होता त्यामध्ये प्रथाम क्रमांक सुमित चंद्रकांत साळुंखे,द्वितीय क्रमांक रोहन हणमंत साळुंखे,तृतीय क्रमांक ऋतुराज यशवंत साळुंखे यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ बक्षीस श्रीवर्धन गणेश साळुंखे, शुभम रामचंद्र साळुंखे, मयूर वैभव साळुंखे यांनां देण्यात आले विजेत्या स्पर्धेकानां बक्षीस म्हणून रोख रक्कम व ट्रॉपी दिल्या गेल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा