छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसचे बडे नेते असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमध्ये ही भेट घेतली. जिल्हा बँकेत दोन दिवसात अर्ज माघार चा दिवस असल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या व्यक्तींच्या भेटींनी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिवसभर जिल्हा बँकेचे अनुषंगाने या भेटी सुरू असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी सुरज विला या निवासस्थानी तर सायंकाळी कराड येथील पाटण कॉलनीत काँग्रेसचे बडे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत जिल्हा बँकेवर चर्चा केली यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शरद काटकर, इंद्रजीत चव्हाण हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा