सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

कुंभारगावत रंगली भव्य किल्ले स्पर्धा :जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थेचा उपक्रम

कुंभारगावत रंगली भव्य किल्ले स्पर्धा :जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थेचा उपक्रम

कुंभारगाव :ता।पाटण- दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा.अशा या आनंदाच्या सोहळ्यात 'दिवाळी किल्ला' बनवणे ही तर मोठी पर्वणीच.आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.........! 
अश्यातच किल्ला करायला मुलांना उत्साह मिळावा म्हणून काही संस्था दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करतात
मराठमोळी मंडळी तर आवर्जून दिवाळीत किल्ले करण्यात मागे हटत नाही, अश्यातच जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्था कुंभारगाव यांनी किल्ले बांधणी स्पर्धा घेतल्या या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत एकूण १७ जण सहभागी झाली होते.
मुलं 'ऐतिहासिक किल्ले' बनवताना आपोआप त्याची थोडी माहिती घेतील, किल्ले भ्रमण करण्याची, शिवचरित्र वाचण्याची जिज्ञासा निर्माण होईल, किल्यांच्या रूपाने ऐतिहासिक स्थाने जतन करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे असं, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम मोरे यांनी "कुमजाई पर्वशी" बोलताना सांगितलं अश्याच काही चिमुकल्यानी साकार केलेले किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करत होते.

कुंभारगावात प्रथमच जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील छोट्याशा गावखेड्यातून पहिलेच वर्ष आणि मुलांनी कल्पनेपेक्षा पलीकडे जाऊन बनवलेले किल्ले हे आपल्या संस्कार ,संस्कृतीचे एकप्रकारे छान द्योतक आहे .
त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना आपण वाव दिला पाहिजे याचं प्रांजल भावनेतून जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थेने हे टाकलेलं पाऊल आज यशस्वी ठरलं आहे.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी कराड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री.सागरदादा आमले व डॉ.श्री.प्रविण माने यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानचे कुसूर गावचे धारकरी मा.श्री.विजयदादा कराळे कोळेवाडीचे मा.श्री.गणेशदादा चोरगे पैलवान मा.श्री.प्रमोद मोरे या सर्वांनी सर्व किल्याची पाहणी करून काल अंतिम निकाल जाहीर केला यावेळी जाणता राजा युवाशक्तीचे समाजसेवक कार्यकर्ते मा.श्री.महेश वरेकर, विक्रम वरेकर फौजी, किशोर मोरे ग्रा.पं.सदस्य चिखलेवाडी,.श्री.सागर मोरे आणि श्री.सौरभ आदी मंडळी उपस्थित होते 
 किल्ल्यांचे परीक्षण यशस्वीरीत्या पार पडलेनंतर नुकतेच या स्पर्धेचे निकाल हाती आले आहेत ते पुढीलप्रमाणे
०१) प्रथम पारितोषिक :- विघ्नेश नारायण मोरे, चव्हाणवाडी (किल्ला:- सिंधुदुर्ग)
०२) द्वितीय पारितोषिक:- विघ्नेश रमेश मोरे, शेंडेवाडी (किल्ला:- रायगड)
०३) तृतीय पारितोषिक:- सिद्धार्थ दिपक मोरे, मोरे-धडमवाडी (किल्ला:-पुरंदर)
०४) चतुर्थ पारितोषिक:- यशराज शशिकांत माने, मान्याचीवाडी (किल्ला:- सिंहगड)
०५) पाचवे पारितोषिक:- सुयश शरद मोरे, चव्हाणवाडी (किल्ला:-प्रतापगड)

०६) विशेष पारितोषिक :- हर्षदा शंकर माटेकर, माटेकरवाडी 
स्पर्धेमध्ये दोन मुलींनी मिळून हा किल्ला तयार केला म्हणून विशेष पारितोषिक परीक्षकांकडून जाहीर केलं आहे.
या उपक्रमाला विशेष सहकार्य श्री.रमेश मोरे,मा.अपसभापती प.स.पाटण, रवींद्र माटेकर,संजय माटेकर,सुनील चाळके, विक्रम वरेकर फौजी यांचे लाभले.
स्पर्धेत सहभागी सर्वच स्पर्धकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे किल्ले बनवले, त्यांनीही खूप मेहनत घेतली म्हणून उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र आणि विशेष रक्कम असं बक्षीस देण्याचे आयोजकांनी घोषित केलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...