शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

*ग्रामीण भागातील सभासदांची हित जपणारी "जन सहकार निधी लि." तळमावले.*तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

*ग्रामीण भागातील सभासदांची हित जपणारी "जन सहकार निधी लि." तळमावले.*

तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

तळमावले :"सुजीवन - अर्थसाधनम् - समृद्धी…" या वाक्‍याचा बोध घेऊन जन सहकार निधीचे संस्थापक/अध्यक्ष मारुतीराव मोळावडे यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करण्यात आली.आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संस्थेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

“ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्‍वास असेल तर अशक्‍य असे काहीच नाही’, हे तत्त्व आत्मसात करून कार्यरत असलेल्या “जन सहकार निधी" म्हणजेच पाटण तालुका सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था. अर्थव्यवस्थेतील चढउतार, नोटबंदी, अशी अनेक आर्थिक आव्हाने समोर असतानाही ही संस्था तालुक्‍यातील सहकार क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार आणि हितचिंतक यांचा सार्थ विश्‍वास आणि जिव्हाळा यांच्यामुळे संस्थेचा कारभार पारदर्शक व प्रगतीपथावर आहे. तत्परता, सचोटी, व्यवहार जपण्याबरोबर माणसे जपण्याचे धोरण संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्ग जपत आहेत.
सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस येणारे कायदा व निकष यांची अंमलबजावणी संस्थेच्या होणारे ऑडिटच्या माध्यमातून तंतोतंत पालन करून त्यामध्ये संस्थेला स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकी या नात्याने विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवित असताना रक्‍तदान शिबिर, दिनदर्शिका, वृक्षारोपण, पूरग्रस्त भागात जीवनआवश्यक वस्तू वाटप तसेच जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना शालेय उपयोगी वस्तू वाटप. तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप व कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबीर राबविण्यात आले आहे.आज तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या यामध्ये श्री प्रतापराव देसाई (उपसभापती प.स.पाटण) श्री रघुनाथराव जाधव (मा.सभापती प.स.पाटण),श्री योगेश पाटणकर (समाजसेवक, संस्थापक अध्यक्ष राजे संघर्ष प्रतिष्ठान),श्री.मधुकर पाटील (संचालक शिवदौलत बँक),श्री.रमेश नावडकर (सरपंच करपेवाडी),श्री त्यात्यासो डूबल (माजी सरपंच शिद्रुकवाडी),श्री अंकुश आतकरी (उपसरपंच ताईगडेवाडी),श्री भुजंगराव कचरे (माजी सरपंच खळे),श्री शांताराम मोरे (व्हा.चेअरमन विकास सोसायटी कुठरे),श्री संदीप पाटील (सरपंच पोतले),श्री दिलीप शामराव पाटील (मुख्यध्यापक ढेबेवाडी),श्री बाजीराव सावंत (मा.सरपंच धामणी),ज्ञानदेव आचरे (मा.सरपंच आचरेवाडी) श्री.संदीप डाकवे (पत्रकार,अध्यक्ष स्पंदनं चॅरिटेबल ट्रस्ट),श्री.राहुल मोरे (मुंबई पोलीस)
श्री.शांताराम ताईगडे (मा.सरपंच ताईगडेवाडी)
श्री .मिलिंद शेठ लखापती ( उद्योगपती कराड),श्री.इकबालभाई सुतार (संचालक इशा हार्डवेअर),श्री.राजुभाई पटेल (व्यापारी कराड)
श्री .तांबोळी (तांबोळी पोहा मिल),त्याचबरोबर ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी वृदं, विविध पक्षाचे कार्यकर्ते, प्रतिनिधी, अनेक ग्रामपंचायतिचे सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी,व्यापारी उद्योजक,पतसंस्था बँकेचे संचालक व्यवस्थापक,सहकारी संस्थाचे पदाधिकारी, वर्तमानपत्राचे वितरक ,वार्ताहर ,प्रतिनिधी,सभासद ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...