तळमावले :ढेबेवाडी पोलीस ठाण्यात राजे संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळीनिमित्त मिठाई वाटप
ढेबेवाडी दि.4 राजे संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने आज "माणुसकीची" दिवाळी साजरी करत ढेबेवाडी पोलीस ठाण्यांर्गत सर्व पोलीस कर्मचारी यांना दिवाळी मिठाई भेट देण्यात आली .राजेसंघर्ष प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री योगेश पाटणकर साहेब यांच्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून आजवर तळागाळातील लोकांच्यासाठी सामाजिक प्रयत्नातून कामे केली आहेत व लोकांच्या पर्यंत राजेसंघर्ष प्रतिष्ठान ची एक सामाजिक बांधिलकी निर्माण झाले असून याच पार्श्वभूमीवर ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आजवर कोरोना सारखी महाभयंकर बिमारी असो व पावसाळ्या मध्ये पूरग्रस्तांना केलेली मदत सतत पोलीस हा स्वतःला ह्या जबाबदारी मध्ये वाहून घेत आहे या साठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याला थोडा आधार मिळावा या साठी राजेसंघर्ष प्रतिष्ठान च्या माध्यमातून दिवाळी उत्सव साजरा केला.
पोलीस नेहमीच नागरिकांची दिवाळी सुखात जावी, सणवार चांगले जावे, वाहतूकीला शिस्त रहावी हीच नेहमी पोलिसांची वर्षोनुवर्षे दिवाळी असून व पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात.
यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार साहेब दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की दीपोत्सव,प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त शुभेच्छा. तेजोमय असा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी, संपन्नता घेऊन येवो अशी शुभकामनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
समाजसेवक श्री योगेश पाटणकर यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचे संकट उभे राहिले. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतील.
या वेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार साहेब ,राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक योगेश पाटणकर प्रतिष्ठान चे खजिनदार व करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर ,संजय गुरव व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा