कराड : छ.शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल दिला जाणारा "गुणवंत प्राचार्य पुरस्कार" हा २०२१ साला करीता कराड येथील संत गाडगे महाराज काॅलेजचे विद्यमान प्राचार्य डाॅ.मोहन राजमाने यांना मिळाला आहे. त्याबद्दल शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आणि त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. राजमाने यांनी काॅलेज मध्ये सदगुरू पॅटर्न राबवून दर्जेदार शिक्षणावर भर दिला आहे. तसेच काॅलेज परिसराचे सुशोभीकरण करून अत्याधुनिक सोयी - सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ,सर्वात कमी शुल्कामध्ये लहान मुलांसाठी इंग्लिश मिडियम स्कूल चालू केले आहे तसेच शाळेमध्ये व काॅलेज मध्ये जास्तीत जास्त गरजू व गरीब विद्यार्थींना प्रवेश देऊन खऱ्या अर्थांने शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशा विविध कामांचा विचार करून छ. शिवाजी महाराज विद्यापीठांने त्यांच्या कार्याचा पुरस्काराच्या रूपाने योग्य सन्मान केला आहे असेच प्रोत्साहन त्यांना यापुढेही मिळावे म्हणून शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करत आहोत असे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी यावेळी सांगितले .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व मा. नगरसेवक रामभाऊ रैनाक ,उप तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव , शंकर विर , द.स.सदस्य व ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र माने , शिव सामर्थ्य सेनेचे जिल्हाप्रमुख व मा. नगरसेवक प्रमोद वेर्णेकर , शिवसेना कराड शहर प्रमुख शशिराज करपे , शाखाप्रमुख अमोल कणसे तसेच शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा