पाटण :जलजीवन मिशन योजनेत पाटण तालुक्यातील 50 गावांचा समावेश
पाटण तालुक्यांतील अनेक गावच्या नळ पाणीपुरवठा योजना कालबाह्य, नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे गावांना व वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई भासत असल्याने येथील नळ पाणीपुरवठा योजना नव्याने करण्यासंदर्भात संबंधित गावांतील ग्रामस्थांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून पाटण तालुक्यातील 50 पाणी योजनांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करून घेतला आहे.
यामध्ये पाटण तालुक्यातील काळोली, सडानिनाई(सडावाघापूर), चाफळ, जंगलवाडी (जाधववाडी- चाफळ), पाडळोशी, तावरेवाडी (पाडळोशी), मसुगडेवाडी (पाडळोशी), बोर्गेवाडी (घोट), फडतरवाडी (घोट), नुने, पांढरेपाणी (आटोली), आटोली, गव्हाणवाडी, बेंदवाडी, माळवाडी, सवारवाडी, कडवे, धामणी, रुवले, मरळोशी, लोटलेवाडी (काळगाव), काळगाव, डाकेवाडी (वाझोली), शिद्रुकवाडी (काढणे), पाळशी, लोहारवाडी (काळगाव), कामरगाव, मानाईनगर, आवसरी (काठी), पाचगणी, काहीर, कडवे खुर्द, रेडेवाडी, डोणीचावाडा (वांझोळे), नहिंबे चिरंबे, ताईगडेवाडी, तळमावले, भारसाखळे, विठ्ठलवाडी (शिरळ), करपेवाडी (काळगाव), जळव, कातवडी, येराडवाडी, सदुवर्पेवाडी, चेणगेवाडी, सळवे, चाळकेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), ठोमसे, मारुल तर्फ पाटण, आडूळ, निगडे, पाचुपतेवाडी- आंबवडे खुर्द, भिकाडी, मिसाळवाडी, धनगरवाडा (मरड), मसुगडेवाडी, दाढोली, या गावांचा समावेश आहे.या गावातील पाणीपुरवठा योजनांची अंदाजपत्रके आवश्यक त्या कागदपत्रांसह तातडीने तयार करून या नळ पाणीपुरवठा योजनांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुरीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा