याबाबत सविस्तर माहिती अशी की शेळकेवाडी येथील शेतकरी आनंदा शेवाळे रा. शेवाळेवाडी(म्हासोली) ता. कराड
यांची पाच मीटर मोटरची कॉपर वायर
किंमत अंदाजे पाचशे रुपये मारुती बाबुराव चोरगे रा. शेळकेवाडी(म्हासोली) ता. कराड
यांच्या मोटरची 50 मीटर लांब कॉपर वायर किंमत अंदाजे पाच हजार रुपये व मोबाईल ऑटो त्याची किंमत अंदाजे पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे आणि राजाराम लक्ष्मण शेळके रा. शेळकेवाडी(येवती) तालुका कराड यांच्या मोटरची कॉपर वायर लांबी 20 मीटर किंमत अंदाजे दोन हजार रुपये याची चोरी बुधवार दि.12 किंवा गुरुवारी दि.13 रात्री झालेली असावी असे संबंधित शेकऱ्यांनी सांगितले सदर घटनेची कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आता बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वरील सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नवीन २० हजार रूपयांच्या वायरी आणल्या व त्या लावून पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली.
आधीच शेतीत पुरेसे उत्पंन्न येईल की नाही याची खात्री नसतांना अशी केबल वायरींची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्या शिवाय राहणार नाही. यवती म्हासोली परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन चोरांना पोलिसांचा धाक वाटत नाही की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरी दिवसरात्र शेतीत मेहनत करून एक एक रूपया जमा करतो आणि चोर मात्र हजारो रूपयांच्या शेतीपंपाच्या केबल वायरी चोरून नेतात म्हणून येवती म्हासोलीसह परीसरातील या भुरट्या चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त राबवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा