मंगळवार, ६ जुलै, २०२१

*नळ योजनेसाठी 29 गावांना 14 कोटीचा निधी*खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर

*नळ योजनेसाठी 29 गावांना 14 कोटीचा निधी*
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर

कराड : प्रतिनिधी 
  जलजीवन मिशन अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघातील 29 गावांना नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 14 कोटी 23 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सदर गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यांच्या शिफारशीने आणखी 148 गावांचे प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
     जलजीवन मिशन अंतर्गत सातारा तालुक्यातील बोरगाव गावासाठी 1 कोटी 15 लाख रुपये, निसराळे 45 लाख रुपये, रामकृष्णनगर  25 लाख रुपये, जैतापूर 25 लाख रुपये, जांभगाव  21 लाख 51 हजार रुपये, कौंदनी नरेवाडी 15 लाख रुपये, निगडी 12 लाख 32 हजार रुपये, गजवडी 15 लाख 45 हजार रुपये, कोरेगाव तालुक्यातील भिमनगर 28 लाख 16 हजार रूपये, खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी 41लाख 64 हजार रुपये, महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे 23 लाख 33 हजार रुपये, वाई तालुक्यातील लगडवाडी 12 लाख रुपये.
     कराड तालुक्यातील घोगाव गावाला 95 लाख 46 हजार रुपये, बेलदरे 9 लाख 45 हजार रुपये, मालखेड 79 लाख 50 हजार रुपये, वनवासमाची 70 लाख रुपये, साकुर्डी 68 लाख रुपये, वराडे 61 लाख 24 हजार रुपये, विठ्ठलवाडी 42 लाख रुपये, साळशिरंबे 37 लाख 44 हजार रुपये, तुळसण 26 लाख रुपये, वडोली निळेश्वर 24 लाख 5 हजार रुपये, महारूगडेवाडी 23 लाख 61 हजार रुपये, यादववाडी 13 लाख 87 हजार रुपये.

 पाटण तालुक्यातील नुने 78 लाख रुपये, मानेगाव 60 लाख 56 हजार रुपये, म्हावशी 3 कोटी रुपये, जिंती 29 लाख 47 हजार रुपये, कराटे 25 लाख 41 हजार रुपये अशा 29 गावांसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे 14 कोटी 23 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.  या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता दिली असून ही कामे लवकरच सुरु होणार आहेत.

 तसेच खा.श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने जल जीवन मिशन अंतर्गत आणखी 148 गावे प्रस्तावित असून ती आराखड्यात समाविष्‍ट झालेली आहेत. त्यानुसार 
पाटण तालुक्यातील लोटळेवाडी (काळगाव), कसणी, डेरवण-बोर्गेवाडी, केळोली वरची, केळोली खालची, धायटी, कोचरेवाडी, पाडळोशी (नारळवाडी), गलमेवाडी, मारुल हवेली, रुवले (पाटीलवाडी), पापर्डे बु., गुढे, कोरिवळे, दिवशी बु., कुंभारगाव, गुढे-शिबेवाडी, दिंडेवाडी, नानेगाव बु., सडावाघापूर, काळगाव (येळेवाडी), निसरे, दिवशी खु., (मराठवाडी), दिवशी खु. (जुंगटी), ताईगडेवाडी (तळमावले), नाणेगाव खुर्द, धामणी, कडवे बु., महाबळवाडी (दाढोली), टोळेवाडी (पिंपळोशी), तोंडोशी, पाचगणी, सणबूर, मालदन- सुतारवाडी, काठीटेक, आंबवडे खुर्द, ढेबेवाडी, सातर, वाघजाईवाडी, बहुले, विहे, मंद्रुळ हवेली, कसणी, बनपुरी, घोटील, झाकडे, घाणव, येराड, रामिष्‍टेवाडी-काळेवाडी, धडामवाडी, वजरोशी, गुढे- शिद्रुकवाडी, येरफळे, मानेवाडी काळगाव, चिखलेवाडी, कोंजवडे, जांभेकरवाडी (धनगरवस्‍ती), मारुल तर्फ पााटण, काहिर, ढोरोशी (शिवपुरी), ढोरोशी, सुपुगडेवाडी, घोटील, चाळकेवाडी, सावरघर, बोर्गेवाडी-घोट, चाफोली, भुडकेवाडी, धामणी-बौध्‍दवस्‍ती, आचरेवाडी (काळगाव) मातंगवस्‍ती, करपेवाडी, साईगडे, कुंभारगाव, आटोली
   कराड तालुक्यातील हनुमानवाडी, तारुख, कांबीरवाडी, वाघेश्‍वर, कोरिवळे, हेळगाव, रेठरे खु., नवीन कवठे, अंधारवाडी, शामगाव, सवादे, गोंदी, वानरवाडी, तासवडे, वनवासमाची, कामथी, बेलवडे हवेली, कळंत्रेवाडी, पाडळी केसे, चरेगाव, खालकरवाडी, म्‍हासोली, शिंदेवाडी (विंग), गोटेवाडी, गोटे, शिरगाव, घोणशी, कोणेगाव, कालवडे, बेलवडे बु., शिवडे, मांगवाडी (उंब्रज), धोंडेवाडी (मस्‍करवाडी), येरवळे
   खंडाळा तालुक्यातील कोपर्डे, खटाव तालुक्यातील रहाटणी, शिंदेवाडी, कटगुण, ललगुण, चोराडे, पुसेसावळी. कोरेगाव तालुक्यातील अंभेरी, जायगांव, न्‍हावी बु., अंबवडे, बोरगाव, काळोशी, वाठार (कि.), कोंबडवाडी, भाकरवाडी, भंडारमाची, बोबडेवाडी, शिरंबे, चोरांबे, असगाव.
   सातारा तालुक्यातील पोगरवाडी, चिंचनेर स.निंब, खोजेवाडी, करुळबाजी, कुरळोशी, धावडशी, देगाव, मांडवे, सारखळ, अंगापूर (तारगाव), आरे तर्फ परळी, करंडी, पांगारे, भाटमरळी, सोनवडी, तासगाव अंतर्गत ब्राहणवाडी व मुळीकवाडी. वाई तालुक्यातील वेळे, चांदक, शिरगाव, केंजळ ही गावे प्रस्तावित आहेत. जलजीवन मिशननुसार ग्रामिण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास केंद्र शासन कटिबद्ध असून राज्य शासनाच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. त्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघातील कामे कार्यान्वित करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...