सोमवार, ७ जून, २०२१

कराड : तासवडे एमआयडीसीतील समस्या सोडवणार खा.श्रीनिवास पाटील

कराड : तासवडे एमआयडीसीतील समस्या सोडवणार खा.श्रीनिवास पाटील
कराड : प्रतिनिधी 
 तासवडे, कराड येथील औद्योगिक वसाहतीला खा.श्रीनिवास पाटील यांनी भेट देऊन स्थानिक उद्योजकांना औद्योगिकदृष्ट्या येणा-या समस्या जाणून घेतल्या. उद्योजकांनी व्यक्त केलेल्या एमआयडीसीतील सदर अडचणींची सोडवणूक करण्याचे आश्वासन देऊन त्यासंदर्भात तशा सूचना संबधित अधिका-यांना त्यांनी केल्या.
    खा.श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी तासवडे एमआयडीसीला भेट दिली.  यावेळी स्थानिक उद्योजकांसोबत चर्चा करून त्यांना औद्योगिकदृष्ट्या येणा-या अडीअडचणी जाणून घेतल्या. तासवडे औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या उत्पादन व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या 150 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. मात्र एमआयडीसीमध्ये प्रामुख्याने विजेची मागणी वाढली असून त्याप्रमाणात विजेचा पुरवठा होत नसल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले. येथील कपंन्यात काम करणारे अनेक कामगार आहेत. त्यांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीकोनातून याठिकाणी इएसआयचे हॉस्पिटल असावे. तसेच औद्योगिकरणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फायर स्टेशन उभारावे. याशिवाय  असोशिएशनसाठी एखादे भवन बांधण्यात यावे यासह अन्य मागण्या सागर जोशी यांनी यावेळी केल्या. 
    खा.श्रीनिवास पाटील यांनी या समस्या समजावून घेतल्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी व वीज वितरणच्या अधिका-यांशी जागेवरूनच संपर्क साधून सदर समस्यांचे निराकारण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
     प्रारंभी स्वागत जितेंद्र जाधव यांनी केले तर आभार अभय नांगरे यांनी मानले. यावेळी संजय पिसाळ, अधिकराव डुबल, सागर जोशी, विष्णु शिंदे, निवास पवार, विशाल शिंदे, राजेंद्र पाटील, सागर शहा, मयेकर तांबोळी आदींसह अन्य उद्योजक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...