रविवार, २७ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 977 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 15 बाधितांचा मृत्यू* *241 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 977  संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 15 बाधितांचा मृत्यू* *241 जणांना दिला आज डिस्चार्ज*
  सातारा दि.27 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 977 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 15 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 25 (8490),  कराड 255 (27159), खंडाळा 38 (11723), खटाव 95 (19384), कोरेगांव 97(16656), माण 48(13107),  महाबळेश्वर 18(4263), पाटण 53(8371), फलटण 91 (28283), सातारा 217 (40106), वाई 25 (12588) व इतर 15 (1305) असे आज अखेर एकूण 191435 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 4(798), खंडाळा 0 (149), खटाव 2 (481), कोरेगांव 2 (382), माण 3(259), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (195), फलटण 0 (280), सातारा 2 (1224), वाई 1(331) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4336 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                           
 *241 जणांना दिला आज डिस्चार्ज*
    : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 241 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

                            

*कुंभारगाव : जिल्हा परिषद शाळा वरेकरवाडी , येथे शैक्षणिक साहित्य वाटप*

*कुंभारगाव : जिल्हा परिषद शाळा वरेकरवाडी , येथे शैक्षणिक साहित्य वाटप*
कुंभारगाव: सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी ( कुंभारगाव ता.पाटण) या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद वरेकरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी हा सामाजिक ग्रुप अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक आजपर्यंत उपक्रम राबवले आहेत. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री विजय लोकरे सर, अंगणवाडी सेविका सौ.रंगूताई हनुमंत वरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अनिल वायचळ, संतोष धडम, विक्रम वरेकर(फौजी), प्रमोद मोरे, रवींद्र माटेकर, अरुण मोरे (फौजी), किशोर मोरे, मंगेश माटेकर, जालिंदर यादव, संदीप चिखले(फौजी) यांनी परिश्रम घेतले.

शनिवार, २६ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 1005 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 1005 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 18 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.26 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1005 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 25 (8465),  कराड 246 (26904), खंडाळा 38 (11685), खटाव 158 (19289), कोरेगांव 73(16559), माण 56(13059),  महाबळेश्वर 20(4245), पाटण 37(8318), फलटण 69 (28192), सातारा 224 (39893), वाई 44 (12563) व इतर 5 (1290) असे आज अखेर एकूण 190462नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (192), कराड 8(794), खंडाळा 0 (149), खटाव 1 (479), कोरेगांव 0 (380), माण 1(256), महाबळेश्वर 1 (45), पाटण 1 (194), फलटण 0 (280), सातारा 4 (1222), वाई 1(330) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4321कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                           

शुक्रवार, २५ जून, २०२१

*सातारा : कोरोना उपाययोजनांच्या उल्लंघन केल्यास हॉटेल, रेस्टारंट व इतर दुकाने आस्थापंनावर होणार कारवाई**जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारीत आदेश जारी*

*कोरोना उपाययोजनांच्या उल्लंघन केल्यास हॉटेल, रेस्टारंट व इतर दुकाने आस्थापंनावर होणार कारवाई*
*जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारीत आदेश जारी*
सातारा दि. 25: कोविड बाधित रुग्णांच्या पॉझिटीव्हीटी रेट निकषानुसार सातारा जिल्हा अद्यापही तिसऱ्या स्तरामध्ये आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी  18 जून अन्वये लागू असलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवून पुढीलप्रमाणे सुधारणा केल्या आहेत. 
 ज्या हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे. अशा हॉटेल रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने हॉटेल व रेस्टॉरंट चालू ठेवणेस परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजल्यानंतर व शनिवार व रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या 50 टक्के  क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल. परंतु हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी  लॉजिंगसाठी अगोदर बुकींग करणे बंधनकारक आहे. याबाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रत्येकी 1000/- रु. दंड आकारणेत येणार आहे.  तसेच या आस्थापनेकडूनही रु.10,000/- इतका दंड आकाराला जाणार आहे.  या कारवाईनंतरही दुसऱ्यांदाही नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील एक महिन्यापर्यंत आस्थापना बंद केली जाईल.   त्यानंतर ही वांरवार नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी संबंधित आस्थापना-दुकान बंद केले जाईल.
तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहकांनी कोरोनाच्या उपाययोजनांच्या नियमाचे पालन न केल्यास त्यांच्यावर 500 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.  जर एखाद्या ग्राहकाकडून कोव्हीड-19 विषयक नियमांचे पालन होत नसेल आणि अशा दुकानातून जर या ग्राहकास सेवा दिली जात असेल तर संबंधित दुकानाला 1000 रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. कारवाईनंतरही दुसऱ्यांदा  नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी संबंधित आस्थापना अथवा दुकान बंद केले जाईल. 
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इन्सीडंट कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी,  तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,  गटविकास अधिकारी,  नगरपालिका/नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली  व भारतीय दंड संहितानुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

तळमावले : गॅस गळतीमुळे घरात स्फोट गुढेतील घटना 2 जण जखमी

तळमावले : गॅस गळतीमुळे घरात स्फोट गुढेतील घटना 2 जण जखमी
प्रतिनिधी / मनोज सावंत
 तळमावले : गुढे, ता. पाटण येथे गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरच्या पाईपला गळती लागली. यामुळे घरभर गॅस पसरून अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घराच्या स्वयंपाकगृहाची भिंत कोसळली. तसेच मुख्य दरवाजा तुटून जाऊन समोरच्या घरावर जाऊन आदळला. घरातील इतर साहित्यही फुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कृष्णत रामचंद्र पाटील व त्यांची पत्नी संगीता हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुढे येथील सेवानिवृत्त सैनिक कृष्णत पाटील यांचे माडीचे दुमजली घर आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक सिलिंडरच्या टाकीला असलेल्या पाईपला गळती लागून घरभर गॅस पसरला.सकाळच्या वेळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद होत्या. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. यावेळी घरात कृष्णत पाटील यांच्यासह त्यांची पत्नी संगीता तसेच त्यांची दोन मुले, सुन आणि नातू असे सर्वजण घरातच होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सर्वजण घाबरले. स्वयंपाकगृहात असणाऱ्ता संगीता यांनी गॅसवर चहा ठेवला होता.

स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यामध्ये संगीता यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. मुलगा संदीप याने समय सुचकता दाखवित आग विझविली. मात्र, तोपर्यंत संगीता या भाजून जखमी झाल्या. तर कृष्णत यांच्या डोक्यालाही मार लागला. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्या दोघांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले.

घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनीही तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कृष्णत पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.

*पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी 30 पदे मंजूर**वसाहतीलमध्ये 56 निवासस्थाने बांधली जाणार.**मल्हार पेठ पोलीस ठाणे व वसाहतीसाठी 19.24 कोटींची तरतुद*

*पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी 30 पदे मंजूर*
*वसाहतीलमध्ये 56 निवासस्थाने बांधली जाणार.*
*मल्हार पेठ पोलीस ठाणे व वसाहतीसाठी 19.24 कोटींची तरतुद*
*महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या हिताचे संरक्षणकर्ते,संकटात रस्त्यावर उतरणारे ;  त्यांच्यावरला ताण कमी करण्यासाठी भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर*
- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

सातारा दि.24: महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात.  तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलीस हे रस्त्यांवर उतरून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करुन घेतात. पोलीसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस ठाणे व वसाहतीचे ई-भूमीपुजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या ई-भूमीपुजन समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार(ऑनलाईन), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (ऑनलाईन), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री  सतेज पाटील (शहरे) (ऑनलाईन), पोलीस महासंचालक संजय पांडे (ऑनलाईन), पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर (ऑनलाईन), विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (ऑनलाईन), पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.
पोलीसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची घरे  असणे खूप महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पोलीसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलीसांचे शारीरिक क्षमता व मनोबल वाढण्यास चांगली मदत होते. अशा प्रशिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहे ती जागात सर्वोत्तम होईल असा विश्वास व्यक्त केला. कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे  सादरीकरण करण्यात यावे.
कोरोनाचा मुकाबला करताना अनेक पोलीसांचे मृत्यु झाले, बरेच बाधीत झाले. जे बाधीत होवून बरे झाले त्यांनी तात्काळ हजर होवून आपले कर्तव्य बजावले.  पोलीस विभागाला दिलासा व मनोर्धय वाढविण्याचे राज्य शासन काम करीत आहे. पोलीस विभाग अहोरात्र काम करीत आहे शासन आपल्या पाठीशी खंबरीपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मल्हारपेठ हे बाजारपेठेचे महत्वाचे गाव आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी राज्य शासनाने इथे पोलीस ठाणे वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्याबरोबरच वसाहतीचेही काम वेळेत आणि दर्जेदार करा. पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे राज्यात चांगले काम सुरु आहे त्यात सातत्य ठेवा. कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यु व बाधीत झालेल्या पोलीसांसाठी  50 लाखाचे संरक्षण तसेच 55 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्डवर्क न देता कार्यालयातील काम देण्याचा चांगला निर्णय घेतला. पोलीस मित्र म्हणून समाजात काम करीत आहे. चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा भर आहे. कोरोना संकट काळात सातारा पोलीस दलाने रस्त्यावर उतरुन उत्कृष्ट असे काम केले. सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करुन  मल्हारपेठतील पोलीस ठाणे व वसाहतीला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिले.
 मल्हारपेठ हे मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याने मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे अशी सर्वांची अपेक्षा होती. ठाण्याबरोबरच येथील कर्मचाऱ्यांसाठी वसाहती होत आहे.  कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागाबरोबर पोलीस विभागाने पुढाकार घेऊन काम केले. जनतेची संवाद ठेवून कायदा व सुव्यवस्था राखली.  जिल्ह्याच्या विकास कामांना नेहमीच राज्य शासनाचे सहकार्य राहिले. येत्या 18 महिन्यात पोलीस ठाणे व वसाहत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याच्या भौगोलिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये पोलीस विभागाचा मोठा वाटा आहे. पोलीसांच्या वसाहतीचा प्रश्न शासनाने हाती घेतला आहे. पोलीस विभागासाठी  भविष्यात आणखीन चांगले उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
 मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे यासाठी 1995 पासून प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने याला मान्यता देवून पोलीस ठाणे व वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला.   कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे या प्रस्तावालाही मान्यता द्यावी. राज्य शासन पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास्थानासाठी 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांची अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली  असल्याचे प्रास्ताविकात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई सांगितले.

*सातारा : खाजगी लॅबनी त्यांच्याकडे रॅपिड ऍन्टीजन टेस्ट रिपोर्ट आय सी एम आर पोर्टलवर भरणे बंधनकारक**जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी*

*सातारा : खाजगी लॅबनी त्यांच्याकडे रॅपिड ऍन्टीजन टेस्ट रिपोर्ट आय सी एम आर  पोर्टलवर भरणे बंधनकारक*
*जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी*
सातारा दि.24 : सातारा जिल्ह्यात शासकीय व  खाजगी कोविड रॅपीड अँटीजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत.  या तपासणी केंद्रामध्ये तपासणीसाठी आलेल्या संशयित रुग्णांचे नमुने घेतले जातात. या सर्व रुग्णांची शासकीय पोर्टलवर दैनंदिन ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक असताना बऱ्याच ठिकाणी संशयित रुग्णांना तोंडी किंवा त्यांच्या लेटरहेडवर लेखी स्वरुपात रॅपीड अँटीजन टेस्ट रिपोर्ट दिले जात असल्याचे आढळून आले आहे.  या रुग्णांची ऑनलाईन पोर्टलवर विहित मुदतीत नोंद केली जात नसल्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद येथे रिपोर्टिंग करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.  या बाबी प्रशासकीय दृष्ट्या गंभीर स्वरुपाच्या असल्याने सर्व खाजगी लॅब संस्थांनी त्यांचेकडे होणाऱ्या रॅपीड टेस्टचे रिपोर्ट देताना रुग्णांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर आयडी तयार केल्याशिवाय संबंधितांना रिपोर्ट देण्यात येऊ नयेत. जे खाजगी लॅबधारक रॅपीड टेस्टचे रिपोर्ट आयसीएमआरच्या पोर्टलवरुन डाऊनलोड करुन न देता त्यांचे स्वत:च्या लॅबच्या लेटरपॅडवर अथवा अन्य मार्गाने रिपोर्ट संबंधितांना दिल्याचे आढळल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग कायदा 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येऊन  संबंधित लॅब सिल करुन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  दिले आहेत.  

बुधवार, २३ जून, २०२१

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ*- *आरोग्यमंत्री राजेश टोपे**मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा*

*आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ*

- *आरोग्यमंत्री राजेश टोपे*

*मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा*

 मुंबई, दि. 23 : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी यावेळी केली. उद्यापासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असेही त्यांनी सांगितले.

            सुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्याचा राज्यातील 68 हजार 297 आशा सेविका आणि 3 हजार 570 गट प्रवर्तक यांना लाभ होणार आहे.

            आज आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी, सहआयुक्त डॉ.सतीश पवार, कृती समितीचे शुभा शमीम, राजू देसले, शंकर पुजारी, आशा सेविकांच्या प्रतिनिधी सुमन कांबळे आदी उपस्थित होते.

            बैठकीत झालेल्या चर्चेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, आशा सेविकांच्या संपाबाबत तीन बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेअंती आशा सेविकांना 1 जुलै 2021 पासून अचूक संकलन व सादरीकरणासाठी एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 1 जुलैपासून आशा सेविकांना 1500 रुपयांची वाढ मिळणार आहे. तर गट प्रवर्तकांना 1200 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे एकूण 1700 रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष 202 कोटी रुपये खर्च करणार आहे.

            पुढच्या वर्षी जुलैमध्ये आशांना 500 रुपयांची वाढ देण्याचा निर्णय देखील करण्यात आला असून आशांच्या कामाचा त्यांना मिळणारे मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचा प्रतिनिधी असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशांना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. आर्थिक परिस्थितीनुसार हा भत्ता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना शिफारस केली जाईल, असे सांगतानाच कोरोनावरील लसीकरणासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरिता आशांना 200 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आशांकरिता ‘निवारा केंद्र’ उपलब्ध करुन देण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

            आशांना मिळणाऱ्या मानधनाचा लेखी तपशिल देण्याकरिता लेखी चिठ्ठी देण्यात येईल. एएनएम आणि जीएनएम या संवर्गात शिक्षणाकरिता 2 टक्के आरक्षण आशांसाठी असून या पदांच्या कंत्राटी सेवेसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात आशा व त्यांच्या कुटूंबियांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            आशांनी केलेले काम उल्लेखनिय असून त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने नेहमीच कौतुक केले आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने आशा आणि गटप्रवर्तकांना 2 हजार रुपयांची वाढ केली आहे. राज्यात संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशांनी ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

            यावेळी कृती समितीच्या वतीने श्री.पाटील, डॉ.डी.एल. कराड यांनी आरोग्यमंत्री आणि शासनाचे आभार मानत संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

मंगळवार, २२ जून, २०२१

तळमावले : आरटीओ तेजस्विनीला चित्रातून सलाम; डाॅ.डाकवेंनी दिली 8000 वी कलाकृती

तळमावले : आरटीओ तेजस्विनीला चित्रातून सलाम; डाॅ.डाकवेंनी दिली 8000 वी कलाकृती

तळमावले/वार्ताहर
गलमेवाडीच्या तेजस्विनी भरत चोरगे ची पिंपरी चिंचवड पुणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) पदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचे अभिनंदन डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्राच्या माध्यमातून केले आले. तेजस्विनीच्या नावातील अक्षरगणेशा आणि सुंदर असे पोर्ट्रेट देवून तिला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षरगणेशा आणि पोट्रेट या चित्रांची फ्रेम भेट देत डाॅ.डाकवे यांनी तेजस्विनीच्या यशाचे कौतुक करुन तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून मान्यवरांना दिली गेलेली ही 8000 वी कलाकृती आहे. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी 100 वी कलाकृती पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, 500 वी पदमश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वी अभिनेते भरत जाधव, 2000 वी अभिनेते सुबोध भावे, 3000 वी अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वी सुप्रसिध्द  पार्श्वगायिका  कविता राम, 5000 वीएसपी तेजस्वी सातपुते, 6000 वी पत्रकार हरीष पाटणे, 7000 वी एसपी अयजकुमार बन्सल, तर 8000 वी कलाकृती तेजस्विनी चोरगे यांना नुकतीच दिली आहे.
प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आकाशाला गवसणी घालणाारे उत्तुग यश तेजस्विनीने मिळवले आहे. संपूर्ण परिसरातून तिचे याबद्दल कौतुक होत आहे. या तेजस्विनीचे अभिनंदन करण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांनी कलाकृती भेट देवून तिच्या आनंदात भर घातली आहे. या अनोख्या भेटीने तेजस्विनी भारावून गेली आहे. ‘‘आपल्या कलेला सॅल्युट’’ अशा शब्दात तिने संदीप चे आभार व्यक्त केले आहे. याप्रसंगी तेजस्विनीचे वडील भरत चोरगे, छायाचित्रकार अनिल देसाई, शंभूराज देसाई व चोरगे कुटूंबिय उपस्थित होते. यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने तेजस्विनीला अभिमान सन्मानपत्र दिले आहे.
चित्रकलेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ  रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. त्यांचा महाराष्ट्र शासन दरबारी 4 वेळा सन्मान झाला आहे. शिवाय विविध संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. केवळ चित्रे न रेखाटता त्यातून आर्थिक मदत देण्याचाही प्रयत्न केला आहे.
आरटीओ झालेल्या तेजस्विनीला 8000 वी कलाकृती दिल्याबद्दल परिसरातून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक होत आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवून समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे.

सोमवार, २१ जून, २०२१

कुंभारगाव : शिवसेना वर्धापनदिनी विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्याचे वाटप

कुंभारगाव : शिवसेना वर्धापनदिन वह्या व छत्र्या वाटप करून साजरा

    फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)

कुंभारगाव ता.पाटण /20 जुन :   शिवसेना 55 वा वर्धापनदिन राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून चांदीवली विधानसभा पवई येथील शिवसेना नगरसेवका सौ.आश्विनी अशोक माटेकर, उपविभाग प्रमुख श्री.अशोक माटेकर (दादा), यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारगाव,चिखलेवाडी,चाळकेवाडी येथे शिवसेना वर्धापनदिना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आज जिल्हा परिषद शाळा कुंभारगाव,जिल्हा परिषद शाळा चिखलेवाडी,चाळकेवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्या व छत्री वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी श्री.अशोकदादा माटेकर, कुंभारगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.सारिका पाटणकर,उपसरपंच श्री.राजेंद्र चव्हाण,श्री.संजय गुरव,श्री.उदयसिंह चव्हाण,श्री.संजय चव्हाण,श्री.श्रीरंग चाळके,श्री.सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.



*सावली प्रतिष्ठान जपतया सामाजिक बांधिलकी**कुंभारगाव शाळा नंबर 3 मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप*

*सावली प्रतिष्ठान जपतया सामाजिक बांधिलकी*
*कुंभारगाव शाळा नंबर 3 मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप*
कुंभारगाव ता.पाटण: येथील सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी(कुंभारगाव)  या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून कुंभारगाव शाळा नंबर 3 मध्ये जागतिक योगा दिनाचा योग साधून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी हा सामाजिक ग्रुप अनेक सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर आहे. या प्रसंगी श्री सुदाम चव्हाण, श्री उत्तम मारुती मोरे (मुकादम), किशोर वरेकर, संभाजी माटेकर, विक्रम टोळे, गणेश वरेकर व चिखलेवाडी शाळेमधील श्री एकनाथ पाटील गुरुजी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री निवास मोरे, श्री शरद किसन मोरे, पवन अशोक माटेकर, राजेश प्रकाश वरेकर, संजय निवृत्ती नाटेकर आणि संदीप तुकाराम मोरे यांनी परिश्रम घेतले.

*सातारा जिल्ह्यातील 461 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू**1139 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 461 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू*
*1139 जणांना दिला आज डिस्चार्ज*
 सातारा दि.21: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 461 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 18(8355),  कराड 108 (25850), खंडाळा 10(11505), खटाव 37(18816), कोरेगांव 42(16214), माण 13 (12709), महाबळेश्वर 1 (4211), पाटण 45 (8053), फलटण 22 (27887), सातारा 141 (39112), वाई 22 (12381) व इतर 2 (1243) असे आज अखेर एकूण 186336 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
  जावली 2 (187), कराड 7(763), खंडाळा 0 (147), खटाव 0(472), कोरेगांव 1(373), माण 1(251), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (189), फलटण 0 (277), सातारा 3 (1193), वाई 1(325) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4221कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*1139 जणांना दिला आज डिस्चार्ज*

  दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1139 जणांना घरी सोडण्यात आले असल्याचीमाहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


रविवार, २० जून, २०२१

कुंभारगाव : 42 जणांची केली अँटीजन टेस्ट :6 जण पॉझिटिव्ह

कुंभारगाव : 42 जणांची केली अँटीजन टेस्ट :6 जण पॉझिटिव्ह 
       फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)

कुंभारगाव ता.पाटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची आत्ता कोरोना चाचणी घेण्यात येते त्यानुसार कुंभारगाव येथे आज अँटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला यामध्ये 42 नागरिकांची टेस्ट करण्यात आली यातील 6 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे गावच्या चिंतेत भर पडली आहे. या कॅम्पसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय  अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व केतकी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीआरोग्य सेविका  ए. एम. कांबळे, ,आरोग्य सेवक रोहित भोकरे CHO डॉ.सुप्रिया यादव ,आशासेविका सुनीता सुतार,पोलीस पाटील अमित शिंदे,यांनी भाग घेतला.यावेळी येथील ग्रामस्थांना मास्क घालने, सॅनिटायझर चा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवने आशा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ.सुप्रिया यादव म्हणाल्या ज्या गावात टेस्टिंग कॅम्प घेण्यात येईल त्या ठिकाणी लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने न भिता कोरोना चाचणी करून घ्यावी व उपचार घ्यावेत. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ.


  

काळगाव :"मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे. लोहरवाडीत स्मशानभूमीच नाही

काळगाव :"मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे. लोहरवाडीत स्मशानभूमीच नाही

प्रतिनिधी /मनोज सावंत 

काळगाव ता.पाटण : "मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते" या ओळी कोणाच्याही मृत्यूनंतर सहज सुचतात पण काळगाव लोहरवाडी येथिल स्मशानभूमीची दुरवस्था बघीतली की "मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे.." अशीच काहीशी प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकाकडून व्यक्त केल्या जात आहेत.
काळगाव लोहरवाडी गावासाठी स्मशानभूमीच नाही 2017 साली झालेल्या वादळाने स्मशानभूमीच उडून गेल्याने आज पर्यंत गाव स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर  स्मशानभूमी मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.ही स्मशानभूमी कधी मंजुरी मीळते याकडे काळगावकरांचे लक्ष लागले आहे. 

लोहारवाडी परिसरात एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधीदरम्यान पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने उघड्यावर अंत्यविधी उरकून घ्यावा लागतो आहे.काळगाव परिसरात गेले काही दिवस पावसाची संततधार चालू आहे दरम्यान लोहारवाडीतील एका 53 वार्षिय महिलेचा हृदयविकाराने निधन झाले यावेळी ग्रामस्थांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की भर पावसात अंत्यविधी कसा करावा अखेर यावर तोडगा निघाला गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन  तात्पुरते बांबूच्या साह्याने शेड करून त्यावर पत्राची पाने टाकून अंत्यविधी उरकून घेतला पण पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाकडे मांडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात येथे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.प्रशासनाने ताबडतोब नवीन स्मशानभूमीची व्यवस्था करावी, जेणेकरून निदान अंत्यविधीदरम्यान तरी यातना सहन कराव्या लागणार नाहीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीच्या कामाचा प्रस्ताव दिला आहे थोड्याच दिवसात मंजुरी मिळेल - पंजाबराव देसाई (प.स.सदस्य काळगाव)



शनिवार, १९ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 895 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू* *756 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 895 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू* *756 जणांना दिला आज डिस्चार्ज*
 
  सातारा दि.19 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
 तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 42 (8309),  कराड 231 (25598), खंडाळा 38 (11461), खटाव 46 (18630), कोरेगांव 84 (16129), माण 37 (12654), महाबळेश्वर 3 (4209), पाटण 65 (7964), फलटण 68 (27831), सातारा 226 (38915), वाई 43 (12338) व इतर 12 (1232) असे आज अखेर एकूण 185270 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 0 (185), कराड 6 (748), खंडाळा 1 (147), खटाव 4 (469), कोरेगांव 2 (371), माण 0(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (185), फलटण 0 (276), सातारा 2 (1185), वाई 0(323) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*756 जणांना दिला आज डिस्चार्ज*

 जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 756 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 971490*
*एकूण बाधित – 185270*
*घरी सोडण्यात आलेले – 173080*
*मृत्यू -4182*
*उपचारार्थ रुग्ण-8549*

कराड : आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचा,जपा व जगा : प्रा.नवनीत यशवंतराव.श्री संतकृपा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन.

कराड : आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचा,जपा व जगा : प्रा.नवनीत यशवंतराव.
श्री संतकृपा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन.

कराड : छत्रपती शिवरायांच्या दृष्टीतून साकारलेले शेकडो गडकिल्ले त्याचे वास्तव आपण आजही पाहतो. त्यांच्या नजरेतून साकारलेल्या अनेक पैलूतून त्यांची इंजिनीअरिंग दृष्टी दिसते म्हणून छत्रपती शिवराय एक अभियंता सुद्धा होते असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, लेखक प्रा.कु.नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या "एनएसएस" विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. "छत्रपति शिवराय एक अभियंता" या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी राजमाता जिजाऊ यांचे वडील लाखोजीराजे जाधवराव यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत अमरसिंहराजे जाधवराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमंत अमरसिंहराजे जाधवराव यांनी ही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व व्याख्याना करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसून जोहरी,  श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 250 च्या वर विद्यार्थी या ऑनलाईन व्याख्यानास उपस्थित होते. तसेच झूम व फेसबुक लाईव्ह द्वारे अनेक विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.कु.नवनीत नंदकुमार  यशवंतराव म्हणाले शिवरायांनी बांधलेले गड किल्ल्यातून त्यांचे स्थापत्य शास्त्र दिसते, व्यवस्थापन शास्त्र दिसते.

स्वराज्यात महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे शेतकरी होय. हा शेतकऱी  सक्षम करण्यासाठी छत्रपती सदैव   प्रयत्नशील असत. तिथे त्यांचे सोशल इंजिनिअरिंग दिसते. चारशे पन्नास वर्षांपूर्वी "पाणी अडवा पाणी जिरवा योजना" ही महत्वकांक्षी योजना राबवून शेतकऱ्यांना आधार दिला व त्यातून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण केली यातून त्यांचे जलव्यवस्थापन पहावयास मिळते. सर्व गडकिल्ले मजबूत बांधले. रायगडावर तर शत्रूला रोखण्यासाठी भव्य महाद्वार, दोन मोठे बुरुज, बुलंद दरवाजा, दोन पायऱ्या मधील अंतर अशा अनेक गोष्टीतून छत्रपतींचे सर्व शास्त्र येथे पाहावयास मिळते.

छत्रपतींचे व्यापारशास्त्र प्रगल्भ होते. व्यापार, उद्योग व लोकांच्या हाताला काम देण्यासाठी जहाजबांधणी महत्त्वाची होती म्हणून त्यांनी पोर्तुगीज मधून जहाज बांधणी कारागीर बोलावून त्यांच्याकडून आपली लोक शिकवून घेतली व त्यातून कुशल कारागीर तयार झाले त्यांच्याकडून जहाजबांधणी करून व्यापार वाढवून आपल्या मालाला भाव मिळवून दिला यातून त्यांचे मार्केटिंग व  व्यापारशास्त्र नजरेस दिसते. या तयार झालेल्या कारागिरांकडून पुढे सक्षम अशी इतर देशांपेक्षा ही प्रभावी अशी लढाऊ जहाजे तयार केली त्यातून त्यांचे युद्धशास्त्र, युद्धनीती पहावयास मिळते. त्या काळातही राजे कामगारांना वेळेवर पगार देत असत कामगार खुश तर काम उत्तम होते असा त्यांचा अनुभव होता. हा त्यांच्या व्यवस्थापनाचा एक भाग होता. यातून ही त्यांचे व्यवस्थापनशास्त्र दृष्टीस पडते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना व पर्यटकांना संदेश देताना प्रा.कु.नवनीत नंदकुमार  यशवंतराव म्हणाले विद्यार्थ्यांनी गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करावे. दोन दिवस रहावे. गड किल्ल्यांचा अभ्यास करावा. आपण शिक्षण घेत असलेल्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून इतिहासाकडे इंजिनिअरिंग म्हणून पहावे. इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा.

आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचा, जपा व जगा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. माझे लवकरच "छत्रपती शिवराय समजून घ्या" हे पुस्तक  ऑडिओ व प्रत स्वरूपात उपलब्ध होणार आहे ते पुस्तक आपण निश्चित वाचा, अभ्यासा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

श्री संतकृपा इंजिनिअरिंगच्या आणि एन एस एस च्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच चे विभागप्रमुख प्रा. भरतराज भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रज्ञा कुलकर्णी व त्यांच्या एनएसएस कमिटीतील प्राध्यापकांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भरतराज भोसले यांनी केले तर प्रा.सुधीर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*सातारा : डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान, तीन दिवसात प्रस्ताव करा गृहराज्यमंत्री यांच्या तालुका प्रशासनाला सूचना*

*सातारा : डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान, तीन दिवसात प्रस्ताव करा गृहराज्यमंत्री यांच्या तालुका प्रशासनाला सूचना*

सातारा दि. 18  : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्यातातील  डोंगरी भागातील गावांमध्ये  अतिवृष्टी  झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शुभूराज देसाई यांनी केल्या.
  पाटण तालुक्यातील अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पहाणी गृह राज्यमंत्री श्री .देसई यांनी केली. यावेळी त्यांनी सुचना केल्या. या पहाणी प्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्याचे पंचनामे कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामसेवक यांनी तात्काळ पंचनामे करुन एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावा.  प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणला जाईल. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी  व अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही प्रयत्न श्री. शंभूराज देसाई यांनी पहाणी दरम्यान सांगितले. 

शुक्रवार, १८ जून, २०२१

*सातारा : अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी* *जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी*

*सातारा : अत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी*
 *जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी*

सातारा दि. 18  : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत असलेने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 19/06/2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 आर्थिक, सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करण्यात येत आहेत.
  सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
  सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.  
  अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्रौ 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल,  सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.
  सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्रौ 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00  या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.
   सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय/निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे.  खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे जागेच्या इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करणेस परवानगी असेल. 
  सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल, कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 02/03/2021 च्या आदेशा मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही. तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील. 
  जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल. 
  बैठका/निवडणुक - स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेणेस परवानगी असेल. 
  सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल त्यांनी बांधकाम करणेस हरकत नाही तथापि, ज्या मजूरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल अशा मजूरांनी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बांधकाम ठिकाण सोडावे. 
   शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवडयाचे सर्व दिवशी सायं. 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करणेची सेवा करणेस आठवडयाचे सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल.  
  ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. व्यायामशाळा, केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे, स्पा, वेलनेस सेंटर ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने फक्त अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी सायंकाळी 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील.
  सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 100 टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करणेची परवानगी नसेल. मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक, मदतनीस, क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस,  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. 
  उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल.  जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग.  डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल.
  उत्पादन -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील. 
  शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना - 
   ज्या आस्थापनांना सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देणेत आली आहे., त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 05.00 वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी असेल.  स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हयामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.
अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल - 
   रुग्णालये,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.  व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स. वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज.  किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.  कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा. 
  सार्वजनिक वाहतूक - विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.  राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्हयाचे पश्चिम  भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा.  भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा.  शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड  निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि त्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात.  ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी),  अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने;  गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस/आयटी सेवा सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स ,परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस ,   जीवनरक्षक औषधे , फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत. कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक. व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी, ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा.
सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)
  केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये, विमा, वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन, वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ, सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था. न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये.
वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके
  वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.
    'आयसोलेशन बबल' म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्यांकची हालचाल.
दंड-
  सार्वजनिक ठिकाणी / सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारणेत यावा.  रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  र.रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांचेकडील आदेश क्रमांक नैआ/कावि/1358/2021 दिनांक 12/05/2021 नुसार रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत यावा. 
 CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
  
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशाम नमुद केले आहे. 

तळमावले : तेजस्विनी चोरगे चा ‘स्पंदन’ कडून सन्मान

तळमावले : तेजस्विनी चोरगे चा ‘स्पंदन’ कडून सन्मान

तळमावले/वार्ताहर
पिंपरी चिंचवड पुणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल तेजस्विनी भरत चोरगे हिचा ‘स्पंदन’ च्यावतीने ‘अभिमान सन्मानपत्र’ देवून गौरव करण्यात आला. मुळच्या गलमेवाडी येथील असलेल्या तेजस्विनी ने उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा अनोखा सन्मान त्यांच्या निवासस्थानी केला. याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, भरत चोरगे, दिलीप बोत्रे, अजय बोर्गे आणि चोरगे कुटूंबीय उपस्थित होते. दरम्यान, तेजस्विनी चोरगे यांना डाॅ.संदीप डाकवे यांनी नावात रेखाटलेला अक्षरगणेशा आणि स्पंदन दिनदर्शिका दिली.
प्रतिकूल परिस्थितीत तेजस्विनीने मिळवलेले यश ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी प्रेरणादायी आहे. अभिमानास्पद यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी तेजस्विनीला सदर सन्मानपत्र दिल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.डाकवे यांनी सांगितले. स्पंदन ट्रस्टने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपणारे 90 पेक्षा अधिक उपक्रम राबवत समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे. 

*अभिनेते तन्मय पाटेकर यांनी सांगितला आपला जीवनप्रवास.*

*अभिनेता ऑडीयन्स स्टार "तन्मय पाटेकर* 

सध्या मनोरंजन क्षेत्राकडे तरुण खुप मोठ्या प्रमाणावरती दिसते आहे.इन्स्टाग्राम हे तर मनोरंजन क्षेत्रातील प्रभावी माध्यम ठरले आहे.इथे बरेचसे छोटेमोठे कलाकार आपल्या छोट्याछोट्या व्हीडीओ मार्फत मनोरंजनाबरोबरच प्रसिध्दी मिळवत असतात.इन्स्टाग्रामवरती आपल्या एका मिनिटाच्या व्हीडीओव्दारे आपली संपुर्ण मेहनत तसेच परिश्रमाच्या जोरावरती प्रेक्षकांसमोर नवनविन संकल्पना मांडणारे त्याचबरोबर या संकल्पनेमार्फत महत्वपुर्ण संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे अभिनेते ऑडीयन्स स्टार "तन्मय पाटेकर २४" 
चौकटीत :-
*अभिनेते तन्मय पाटेकर यांनी सांगितला आपला जीवनप्रवास.*
मुळात मी मुंबईमधेच लहानाचा मोठा झालो.लहानपणापासुन अभिनय करण्याची आवड होती.तीन वर्षाचा असल्यापासुन अभिनय आणि नृत्य क्षेत्रामध्ये काम करायला लागलो.माझे वडील "चंद्रमोहन पाटेकर" हे उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक आणि प्रसिध्द लेखक असल्यामुळे त्यांची मला नेहमी साथ लाभत असते.
सोशल मिडीयावरती साईबाबा,कृष्णा आणि ज्या संकल्पना वायरल होणारा झी मराठी महाराष्ट्राचा टीक टॉक स्टार या स्पर्धेमध्ये मला विजेता म्हणुन घोषित केले.
  सांगायला आनंद वाटतो कि आयुष्यात "गुरु"म्हणुन साथ लाभली ती म्हणजे माझे वडील त्याचबरोबर दुष्यंत इनामदार तसेच प्रसिध्द विनोदी कलाकार सतिश तरे.
Covid-19 च्या काळात ओमकार शिवतरकर व त्याचे वडील नरेश शिवतरकर यांच्या सपोर्टमुळेच लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या संकल्पना व्हीडीओ मार्फत मांडण्यात यश मिळाले.या यशामध्ये माझ्यासोबत विनया,शुभम,साहील,हर्ष,अपुर्व,अक्षय,अभिषेक यांची सुध्दा मोलाची साथ लाभली.पडद्यामागील जी काही मेहनत घ्यावी लागते याबद्दल सांगायच झाल्यास आम्ही रोज रात्री १२-२ या वेळेमध्ये जी  संकल्पना मांडणार आहे त्या विषयी विचार करत असतो.त्याच्यावरती प्लॅनिंग करत असतो त्याचबरोबर या संकल्पनेला साजेल अस गाण बसवणे हे पण फार महत्वाच असत याचा पुरेपुर अभ्यास करुन दुसर्या दिवशी शुट करत असतो.या चित्रिकरणासाठी २:१५-२.३० मिनिट या वेळेमध्ये पुर्ण करत  असतो.त्याचबरोबर १ तास हा एडीटींगसाठी लागत असतो.सख्खी बहीण २ वर्ष हॉस्पीटलमध्ये ॲडमीट असुन स्वत:च दुख: मनामध्ये ठेऊन दुसर्याच दुख: जगासमोर १ मिनिटामध्ये व्हीडीओव्दारे मांडण्याचा माझा प्रयत्न असतो.कारण मला अस सांगायच आहे कि एक दुखी: माणुसच दुसर्या माणसाच दुख: समजु शकतो.
    झी युवा - अंजली तसेच "सांग ना रे मना" 'बेधुंद किनारा', "नाद भक्तीचा" या अल्बम साँगच्या यशानंतर मला एका मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी भेटतेय आणि लवकरच तुम्हाला मी एका नव्या भुमिकेत पहायला भेटेल.

गुरुवार, १७ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील :820 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील :820 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.17: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 820 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 54 (8228),  कराड 205 (25197), खंडाळा 37 (11373), खटाव 61 (18541), कोरेगांव 84 (15970), माण 56 (12554), महाबळेश्वर 8 (4205), पाटण 39 (7852), फलटण 43 (27707), सातारा 188 (38549), वाई 43 (12262) व इतर 2 (1212) असे आज अखेर एकूण 183655 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 0 (185), कराड 2 (739), खंडाळा 0 (146), खटाव 5 (462), कोरेगांव 1 (366), माण 2(249), महाबळेश्वर 0 (44), पाटण 4 (180), फलटण 2 (276), सातारा 11 (1178), वाई 0(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4147 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

*टिप : सकाळी दिलेल्या आकडेवारीत पोर्टलवर काही आकडे डब्बल असल्यामुळे 9 बाधित कमी झाले आहेत*

*सातारा : जिल्ह्यात सरासरी 46.8 मि.मी. पाऊस*पाटण तालुक्यात सरासरी 82.3 मि. मी पाऊस *आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी.पावसाची नोंद*

*सातारा : जिल्ह्यात सरासरी 46.8 मि.मी. पाऊस*
पाटण तालुक्यात सरासरी 82.3 मि. मी पाऊस 
*आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी.पावसाची नोंद*

 सातारा, दि. 17 : जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 46.8 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
 जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 40 (146.6) मि. मी., जावळी- 80.1 (230.9) मि.मी., पाटण-82.3 (170.3) मि.मी., कराड-98.9 (203.7) मि.मी., कोरेगाव-20.4 (104.4) मि.मी., खटाव-15.1 (78.0) मि.मी., माण- 4.6 (57.2) मि.मी., फलटण- 2.8 (64.1) मि.मी., खंडाळा- 6.8 (77.5) मि.मी., वाई-18.7 (128.4) मि.मी., महाबळेश्वर-143 (389) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 
  कोयना धरणाची धरणात आजअखेर 26.54 टीएमसी  (26.51टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 251 (443) मि.मी. आहे. 

बुधवार, १६ जून, २०२१

*सातारा : ग्रामपंचायत शिपायाने गावाच्या विहिरीत ओतलं टीसीएल पावडरचं संपूर्ण पोतं ;गावकरी जुलाब उलट्यानी हैराण*

*सातारा : ग्रामपंचायत शिपायाने गावाच्या विहिरीत ओतलं टीसीएल पावडरचं संपूर्ण पोतं  ;गावकरी जुलाब उलट्यानी हैराण*

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळे येथे ग्रामपंचायत शिपायाने गावाच्या विहिरीत टीसीएल पावडरचं संपूर्ण पोतं रिकामं केलं. यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो सदृश्य उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली. या बाधितांवर वाई, पाचवड, सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सरपंचासह सरताळे ग्रामपंचायतीतील सदस्यास देखील दूषित पाणी पिल्याने बाधा झाली आहे. तर, या ग्रामपंचायत शिपायाने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं बोललं जात असून, त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून करवाई करण्यात आली आहे.

सरताळे (जावली) येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडर ऐवजी संपूर्ण पोतंच विहिरीमध्ये रिकामी केली.आज सकाळी नियमितपणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. मात्र हे पाणी पिल्याने गावातील ५० पेक्षा जास्त ग्रामस्थांना गॅस्ट्रो सदृश्य उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली.

या संदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, हा सर्व प्रकार ग्रामसेवकाच्या बेजबाबदारवृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.

याबाबत जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर गावाच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठा करताना हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना उलट्या जुलाबाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती चांगली असून केवळ एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.. विहिरीतील सर्व पाणी उपसा करून बाहेर काढण्यात आले आहे. गावामध्ये प्रत्येक घरी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. आणखी कुणाला त्रास उद्भवू नये याची दक्षता घेत आहोत. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच, ग्रामपंचायतीच्या शिपायावर कारवाई करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची केली कोरोना चाचणी 3 जण पॉझिटिव्ह

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची केली कोरोना चाचणी 3 जण पॉझिटिव्ह
फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
प्रतिनिधी / मनोज सावंत

ढेबेवाडी दि.15 : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असताना बहुतांशी नागरिकांना मात्र आरोग्याची फारशी काळजी नसल्याचे दुर्दैवी चित्र काल मंगळवारी दि.15 ढेबेवाडी येथे दिसून आले.
लॉकडाऊन मध्ये शासनाने थोडी शिथिलता दिल्या नंतर ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थ विनाकारण बाजारपेठ व रस्त्यावर फिरत असल्याचे ढेबेवाडी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य  केंद्र सणबुरच्या मदतीने ढेबेवाडी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर कोरोना चाचणी कॅम्प आयोजित केला व विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडून त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यामध्ये.एकूण 83 विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली  यामध्ये 43 नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली यामध्ये सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 40 जणांची RTPCR टेस्ट करण्यात आली यातील 3 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ग्रामीण विभागात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, काल मंगळवार ढेबेवाडीचा बाजार अनेक दिवसापासून बंद आहे परंतु काही वेळा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बाजार भरवण्याचा प्रयत्न होत होता, परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाने कारवाई करून हा बाजार पूर्णपणे बंद केला. तरीसुद्धाअनेक नागरिक बेपर्वाई पणे विनाकारण बाजार पेठेत फिरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्र व ढेबेवाडी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विध्यमाने बाजरपेठेच्या मुख्य रस्त्यावर टेस्टिंग कॅम्प घेण्यात आला व कोरोना रोखण्याची ही मोहीम राबवण्यात आली.   

यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल नवनाथ कुंभार, पोलीस कर्मचारी अजय माने, संदेश लादे, एम ए पवार, पोलीस नाईक प्रशांत नाईक, अशोक खवले, होमगार्ड तसेच आरोग्य विभागाकडून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. एस.डी.जाधव, आरोग्य सेवक दत्तात्रय शिंदे, टेक्निशियन एस एस चोपडे, NPW, संदीप साळुंखे, CHO डॉ कोमल लोकरे, नर्स मेघा शिंदे, करवते बी एस, असिस्टंट कांता बर्डे, शंतनू पाटील, गटप्रवर्तक अदिती थोरात आदींनी या कॅम्प मध्ये सहभाग घेतला.           

*सातारा जिल्ह्यातील : 972 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 972 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.16: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 972 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 40 (8174),  कराड 154 (25035), खंडाळा 67 (11341), खटाव 139 (18480), कोरेगांव 98 (15886), माण 53 (12498), महाबळेश्वर 15 (4197), पाटण 42 (7813), फलटण 80 (27664), सातारा 224 (38411), वाई 46 (12219) व इतर 14 (1210) असे आज अखेर एकूण 182928 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 0 (185), कराड 7 (737), खंडाळा 0 (146), खटाव 2 (457), कोरेगांव 3 (365), माण 2(247), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (176), फलटण 1 (274), सातारा 7 (1167), वाई 2(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4120 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवार, १५ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 832 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 29 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 832 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 29 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.15 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 832 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 29 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 25 (8134),  कराड 204 (24929), खंडाळा 33 (11274), खटाव 97 (18341), कोरेगांव 54 (15788), माण 66 (12445), महाबळेश्वर 2 (4182), पाटण 42 (7771), फलटण 76 (27584), सातारा 192 (38183), वाई 29 (12173) व इतर 12 (1196) असे आज अखेर एकूण 182000 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 1(185), कराड 4 (730), खंडाळा 2(146), खटाव 3 (455), कोरेगांव 5 (362), माण 0(245), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (174), फलटण 0 (273), सातारा 12 (1160), वाई 0(320) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4094 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सोमवार, १४ जून, २०२१

ठाणे : भारतीय मराठा संघाचा छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांच्या "मराठा आरक्षण" लढ्याला जाहीर पाठिंबा.

ठाणे : भारतीय मराठा संघाचा छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांच्या "मराठा आरक्षण" लढ्याला जाहीर पाठिंबा.             

 ठाणे, ता १४, : ठाणे येथे सकल मराठा फाउंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा आज दि.१४ रोजी संपन्न झाली या सभेत सकल मराठा समाजाच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्यासाठी छत्रपती मा.श्री.संभाजीराजे  आणि छत्रपती मा.श्री.उदयनराजे हे नेतृत्व करत आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांचे मावळे म्हणून भारतीय मराठा संघाचे पदाधिकारी, सभासद, आणि समस्त भारतीय मराठा संघ परिवार या सर्वांचा भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश पवार यानी पाठिंबा जाहीर केला.

    याप्रसंगी भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस श्री.राजेंद्र पालांडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.दीपक पालांडे, श्री.आनंदा सकपाळ, श्री.सचिन चव्हाण,  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. संपदा ब्रीद आणि अनघा जाधव,      महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. एस. डी. पाटील (आर्किटेक्ट),  महेश महापदी, सदाशिव गारगोटे,   ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश पाटील  सर, आणि विद्या कदम, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. योगेश पवार , ठाणे जिल्हा सचिव अनिल काळकूते, मराठवाडा प्रमुख दीपक कंजे पाटील, ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले, पुणे जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री मोरे,  उल्हासनगर शहराध्यक्ष सुनीता गव्हाणे, मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख श्री . प्रकाश रघुनाथ पाटील, ठाणे महानगर संपर्क प्रमुख श्री. अरुण फणसे असे मान्यवर उपस्थित होते त्यावेळी

 छत्रपती संभाजीराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है !!

छत्रपती उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है !!

एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पाठिंबा जाहीर करण्यात आला

*सातारा : एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमध्ये गहू व तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध*

*सातारा : एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमध्ये गहू व तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध*
सातारा दि.14 :  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपेय प्रतिकिलो या सवलतीच्या दराने प्रति सदस्य 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्याने देणे या तत्वावर वितरीत केले जाणार आहे. तरी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी अन्नधान्याचे ऑफलाईन वाटप करुन त्याच्या नोंदी नोंदवहीमध्ये करणे अनिवार्य आहे.  तसेच धान्य वितरीत करतेवेळी सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.

*सातारा जिल्ह्यातील 623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू* *2064 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू* *2064 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.14 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 623 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 25 (8109), कराड 93 (24725), खंडाळा 21 (11241), खटाव 122 (18244), कोरेगांव 47 (15734), माण 33 (12372), महाबळेश्वर 9 (4180), पाटण 47 (7729), फलटण 36 (27508), सातारा 164 (37991), वाई 20 (12144) व इतर 6 (1184) असे आज अखेर एकूण 181161 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 1(184), कराड 4 (726), खंडाळा 1(144), खटाव 6 (452), कोरेगांव 0 (357), माण 2(245), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (172), फलटण 1 (273), सातारा 1 (1148), वाई 1(320) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4065 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

*2064 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2064नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण बाधित - 181161
घरी सोडण्यात आलेले - 168009
मृत्यू -4065
उपचारार्थ रुग्ण-9267

कुंभारगाव :सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्याकडून ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन

कुंभारगाव :सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्याकडून ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन 



पाटण:  येथील सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी (कुंभारगाव) या ग्रुपच्या वतीने दि.12 जून ते 30 जूनच्या दरम्यान  निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद आहेत त्यामुळे मुले अभ्यास कसा करायचा हेच विसरून गेले आहेत की काय आशा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे, हाच धागा पकडून सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी (ता.पाटण) यांनी कुंभारगाव विभाग मर्यादित ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

यामध्ये गट नंबर 1 मध्ये - 5 ते 7 वी पर्यंत विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांना निबंधासाठी खालील विषय दिले आहेत.

१) स्वच्छतेचे महत्व २) माझी आई ३) माझा आवडता सण ४) झाडे लावा, पर्यावरण वाचवा.  

( निबंध ५० ते ६० ओळीत असावा)

गट नंबर 2 मध्ये - 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना विषय आहेत.

१) जागतिक पर्यावरण समस्या २) प्रदूषण एक समस्या ३) कोरोना व लॉकडाऊन ४) ऑनलाईन शिक्षण पद्धती, संधी व समस्या. 

(निबंध ७० ते ९० ओळींचा असावा )

!! "स्पर्धेतील बक्षिसे" !! 

गट नंबर 1 -5 ते  7 वी 

प्रथम बक्षीस - ५०१ रुपये व प्रमाणपत्र. 

द्वितीय बक्षीस - ३०१ रुपये व प्रमाणपत्र. 

तृतीय बक्षीस* - २०१ रुपये व प्रमाणपत्र. 


या गटातील सर्व स्पर्धकांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण लिहलेल्या निबंधाचा फोटो काढून पाठवावा.

 श्री. शंकर सिताराम मोरे.९३२४२४२४७०

 श्री. लक्ष्मण परशराम वरेकर ८६५२७७९०६३

 श्री. उत्तम शिवाजी मोरे ९७६९१२१४८४   

श्री. रवींद्र बंडू काटे ७०२१११८७४७ 

 श्री. विश्वास बबन चिखले.९९६७९४०३५५

गट नंबर 2 - ८ ते १० वी


प्रथम बक्षीस- ७०१ रुपये व प्रमाणपत्र.

द्वितीय बक्षीस - ५०१ रुपये व प्रमाणपत्र. 

तृतीय बक्षीस - ३०१ रुपये व प्रमाणपत्र


या गटातील सर्व स्पर्धकांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण लिहलेल्या निबंधाचा फोटो काढून पाठवावा.


श्री. सुरेश रामचंद्र चिखले. (गुरुजी) ९३०९१३५०३८

 श्री. युवराज रघुनाथ धोत्रे.८१०८८३३७७८

 श्री. ऋषिकेश तात्यासो बोत्रे.९९२०६९५८२८ 

श्री. विश्वनाथ राजाराम चिखले.७०२०५४०१२७

श्री.अभिजीत भानुदास मोरे  ९८१९०९८३७२

 (टीप : विद्यार्थ्यांनी आपले निबंध 12 जून ते 30 जून यादरम्यान पाठवायचे आहेत)


स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांनी संपूर्ण नांव, पत्ता, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो व शाळाचे नांव आपल्या प्रवेशिके सोबत द्यायचे आहे. अंतिम तारखे नंतर तज्ञ शिक्षकांकडून निबंधाचे परीक्षण करुन निकाल जाहीर केला जाणार आहे. व विजेत्या स्पर्धकांचे सत्कार व अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घ्यावा अशी विनंती सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्यातर्फे प्रा. सुरेश यादव यांनी केले आहे.

रविवार, १३ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 856 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 856 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू*

  सातारा दि.13 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 856 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
           तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 41(8084), कराड166(24632), खंडाळा30(11220), खटाव 151(18122),कोरेगांव 60(15687), माण 54 (12339), महाबळेश्वर 13 (4171), पाटण 58 (7682), फलटण 73 (27541), सातारा 174 (37827), वाई 26 (12124) व इतर 10(1178) असे आज अखेर एकूण 180607 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 0(183), कराड 5 (722), खंडाळा 0(143), खटाव 1 (446), कोरेगांव 3 (357), माण 0(243), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (172), फलटण 0 (272), सातारा 6 (1147), वाई 0(319) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4048 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तळमावले :बाहेर फिरणाऱ्या 25 जणांची कोरोना चाचणी : 2 जण पॉझिटिव्ह

तळमावले :बाहेर फिरणाऱ्या 25 जणांची कोरोना चाचणी : 2 जण पॉझिटिव्ह
        फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
       मनोज सावंत / प्रतिनिधी
तळमावले ता.पाटण :दि.13 जून सातारा जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना तळमावले येथे ढेबेवाडी पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कोरोना चाचणीत 25 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.जिल्हयात कोरोना बाधित आकडा कमी आला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार ९ ते २ आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दूध, मेडिकल, खते, बी-बियाणे या दुकानांव्यतिरित इतर दुकाने बंद आहेत.मात्र, या-ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत आहेत.

ढेबेवाडी पोलिसांनी तळमावले येथे आज रविवारी दि.13 जुन सकाळी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना (अँटिजेन) टेस्ट घेण्याची धडक मोहीम राबवली. याकामी तळमावले आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली.

पुढे कोरोना चाचणी सुरु असल्याने अनेकांनी त्याठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले . विनाकारण बाहेर फिरू नका असे पोलिस वारंवार सांगत आहेत मात्र तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळुन येत आहेत.त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक. संतोष पवार साहेब यांनी "कुमजाई पर्व"शी बोलताना दिली. यावेळी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा, आरोग्य सेवक रोहित भोकरे, स्वप्नील कांबळे, पोलीस कर्मचारी अजय माने, एम ए पवार पोलीस पाटील अमित शिंदे, विशाल पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला


*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...