रविवार, १३ जून, २०२१

तळमावले :बाहेर फिरणाऱ्या 25 जणांची कोरोना चाचणी : 2 जण पॉझिटिव्ह

तळमावले :बाहेर फिरणाऱ्या 25 जणांची कोरोना चाचणी : 2 जण पॉझिटिव्ह
        फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
       मनोज सावंत / प्रतिनिधी
तळमावले ता.पाटण :दि.13 जून सातारा जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना तळमावले येथे ढेबेवाडी पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कोरोना चाचणीत 25 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.जिल्हयात कोरोना बाधित आकडा कमी आला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार ९ ते २ आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दूध, मेडिकल, खते, बी-बियाणे या दुकानांव्यतिरित इतर दुकाने बंद आहेत.मात्र, या-ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत आहेत.

ढेबेवाडी पोलिसांनी तळमावले येथे आज रविवारी दि.13 जुन सकाळी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना (अँटिजेन) टेस्ट घेण्याची धडक मोहीम राबवली. याकामी तळमावले आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली.

पुढे कोरोना चाचणी सुरु असल्याने अनेकांनी त्याठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले . विनाकारण बाहेर फिरू नका असे पोलिस वारंवार सांगत आहेत मात्र तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळुन येत आहेत.त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक. संतोष पवार साहेब यांनी "कुमजाई पर्व"शी बोलताना दिली. यावेळी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा, आरोग्य सेवक रोहित भोकरे, स्वप्नील कांबळे, पोलीस कर्मचारी अजय माने, एम ए पवार पोलीस पाटील अमित शिंदे, विशाल पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...