सध्या मनोरंजन क्षेत्राकडे तरुण खुप मोठ्या प्रमाणावरती दिसते आहे.इन्स्टाग्राम हे तर मनोरंजन क्षेत्रातील प्रभावी माध्यम ठरले आहे.इथे बरेचसे छोटेमोठे कलाकार आपल्या छोट्याछोट्या व्हीडीओ मार्फत मनोरंजनाबरोबरच प्रसिध्दी मिळवत असतात.इन्स्टाग्रामवरती आपल्या एका मिनिटाच्या व्हीडीओव्दारे आपली संपुर्ण मेहनत तसेच परिश्रमाच्या जोरावरती प्रेक्षकांसमोर नवनविन संकल्पना मांडणारे त्याचबरोबर या संकल्पनेमार्फत महत्वपुर्ण संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे अभिनेते ऑडीयन्स स्टार "तन्मय पाटेकर २४"
चौकटीत :-
*अभिनेते तन्मय पाटेकर यांनी सांगितला आपला जीवनप्रवास.*
मुळात मी मुंबईमधेच लहानाचा मोठा झालो.लहानपणापासुन अभिनय करण्याची आवड होती.तीन वर्षाचा असल्यापासुन अभिनय आणि नृत्य क्षेत्रामध्ये काम करायला लागलो.माझे वडील "चंद्रमोहन पाटेकर" हे उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक आणि प्रसिध्द लेखक असल्यामुळे त्यांची मला नेहमी साथ लाभत असते.
सोशल मिडीयावरती साईबाबा,कृष्णा आणि ज्या संकल्पना वायरल होणारा झी मराठी महाराष्ट्राचा टीक टॉक स्टार या स्पर्धेमध्ये मला विजेता म्हणुन घोषित केले.
सांगायला आनंद वाटतो कि आयुष्यात "गुरु"म्हणुन साथ लाभली ती म्हणजे माझे वडील त्याचबरोबर दुष्यंत इनामदार तसेच प्रसिध्द विनोदी कलाकार सतिश तरे.
Covid-19 च्या काळात ओमकार शिवतरकर व त्याचे वडील नरेश शिवतरकर यांच्या सपोर्टमुळेच लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या संकल्पना व्हीडीओ मार्फत मांडण्यात यश मिळाले.या यशामध्ये माझ्यासोबत विनया,शुभम,साहील,हर्ष,अपुर्व,अक्षय,अभिषेक यांची सुध्दा मोलाची साथ लाभली.पडद्यामागील जी काही मेहनत घ्यावी लागते याबद्दल सांगायच झाल्यास आम्ही रोज रात्री १२-२ या वेळेमध्ये जी संकल्पना मांडणार आहे त्या विषयी विचार करत असतो.त्याच्यावरती प्लॅनिंग करत असतो त्याचबरोबर या संकल्पनेला साजेल अस गाण बसवणे हे पण फार महत्वाच असत याचा पुरेपुर अभ्यास करुन दुसर्या दिवशी शुट करत असतो.या चित्रिकरणासाठी २:१५-२.३० मिनिट या वेळेमध्ये पुर्ण करत असतो.त्याचबरोबर १ तास हा एडीटींगसाठी लागत असतो.सख्खी बहीण २ वर्ष हॉस्पीटलमध्ये ॲडमीट असुन स्वत:च दुख: मनामध्ये ठेऊन दुसर्याच दुख: जगासमोर १ मिनिटामध्ये व्हीडीओव्दारे मांडण्याचा माझा प्रयत्न असतो.कारण मला अस सांगायच आहे कि एक दुखी: माणुसच दुसर्या माणसाच दुख: समजु शकतो.
झी युवा - अंजली तसेच "सांग ना रे मना" 'बेधुंद किनारा', "नाद भक्तीचा" या अल्बम साँगच्या यशानंतर मला एका मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी भेटतेय आणि लवकरच तुम्हाला मी एका नव्या भुमिकेत पहायला भेटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा