ठाणे : भारतीय मराठा संघाचा छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांच्या "मराठा आरक्षण" लढ्याला जाहीर पाठिंबा.
ठाणे, ता १४, : ठाणे येथे सकल मराठा फाउंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा आज दि.१४ रोजी संपन्न झाली या सभेत सकल मराठा समाजाच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्यासाठी छत्रपती मा.श्री.संभाजीराजे आणि छत्रपती मा.श्री.उदयनराजे हे नेतृत्व करत आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांचे मावळे म्हणून भारतीय मराठा संघाचे पदाधिकारी, सभासद, आणि समस्त भारतीय मराठा संघ परिवार या सर्वांचा भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश पवार यानी पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस श्री.राजेंद्र पालांडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.दीपक पालांडे, श्री.आनंदा सकपाळ, श्री.सचिन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. संपदा ब्रीद आणि अनघा जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. एस. डी. पाटील (आर्किटेक्ट), महेश महापदी, सदाशिव गारगोटे, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश पाटील सर, आणि विद्या कदम, मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. योगेश पवार , ठाणे जिल्हा सचिव अनिल काळकूते, मराठवाडा प्रमुख दीपक कंजे पाटील, ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले, पुणे जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री मोरे, उल्हासनगर शहराध्यक्ष सुनीता गव्हाणे, मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख श्री . प्रकाश रघुनाथ पाटील, ठाणे महानगर संपर्क प्रमुख श्री. अरुण फणसे असे मान्यवर उपस्थित होते त्यावेळी
छत्रपती संभाजीराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
छत्रपती उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पाठिंबा जाहीर करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा