रविवार, २० जून, २०२१

काळगाव :"मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे. लोहरवाडीत स्मशानभूमीच नाही

काळगाव :"मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे. लोहरवाडीत स्मशानभूमीच नाही

प्रतिनिधी /मनोज सावंत 

काळगाव ता.पाटण : "मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते" या ओळी कोणाच्याही मृत्यूनंतर सहज सुचतात पण काळगाव लोहरवाडी येथिल स्मशानभूमीची दुरवस्था बघीतली की "मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे.." अशीच काहीशी प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकाकडून व्यक्त केल्या जात आहेत.
काळगाव लोहरवाडी गावासाठी स्मशानभूमीच नाही 2017 साली झालेल्या वादळाने स्मशानभूमीच उडून गेल्याने आज पर्यंत गाव स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर  स्मशानभूमी मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.ही स्मशानभूमी कधी मंजुरी मीळते याकडे काळगावकरांचे लक्ष लागले आहे. 

लोहारवाडी परिसरात एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधीदरम्यान पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने उघड्यावर अंत्यविधी उरकून घ्यावा लागतो आहे.काळगाव परिसरात गेले काही दिवस पावसाची संततधार चालू आहे दरम्यान लोहारवाडीतील एका 53 वार्षिय महिलेचा हृदयविकाराने निधन झाले यावेळी ग्रामस्थांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की भर पावसात अंत्यविधी कसा करावा अखेर यावर तोडगा निघाला गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन  तात्पुरते बांबूच्या साह्याने शेड करून त्यावर पत्राची पाने टाकून अंत्यविधी उरकून घेतला पण पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाकडे मांडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात येथे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.प्रशासनाने ताबडतोब नवीन स्मशानभूमीची व्यवस्था करावी, जेणेकरून निदान अंत्यविधीदरम्यान तरी यातना सहन कराव्या लागणार नाहीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीच्या कामाचा प्रस्ताव दिला आहे थोड्याच दिवसात मंजुरी मिळेल - पंजाबराव देसाई (प.स.सदस्य काळगाव)



1 टिप्पणी:

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...