बुधवार, १६ जून, २०२१

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची केली कोरोना चाचणी 3 जण पॉझिटिव्ह

ढेबेवाडी : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची केली कोरोना चाचणी 3 जण पॉझिटिव्ह
फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
प्रतिनिधी / मनोज सावंत

ढेबेवाडी दि.15 : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असताना बहुतांशी नागरिकांना मात्र आरोग्याची फारशी काळजी नसल्याचे दुर्दैवी चित्र काल मंगळवारी दि.15 ढेबेवाडी येथे दिसून आले.
लॉकडाऊन मध्ये शासनाने थोडी शिथिलता दिल्या नंतर ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थ विनाकारण बाजारपेठ व रस्त्यावर फिरत असल्याचे ढेबेवाडी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य  केंद्र सणबुरच्या मदतीने ढेबेवाडी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर कोरोना चाचणी कॅम्प आयोजित केला व विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडून त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यामध्ये.एकूण 83 विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली  यामध्ये 43 नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली यामध्ये सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 40 जणांची RTPCR टेस्ट करण्यात आली यातील 3 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ग्रामीण विभागात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, काल मंगळवार ढेबेवाडीचा बाजार अनेक दिवसापासून बंद आहे परंतु काही वेळा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बाजार भरवण्याचा प्रयत्न होत होता, परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाने कारवाई करून हा बाजार पूर्णपणे बंद केला. तरीसुद्धाअनेक नागरिक बेपर्वाई पणे विनाकारण बाजार पेठेत फिरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्र व ढेबेवाडी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विध्यमाने बाजरपेठेच्या मुख्य रस्त्यावर टेस्टिंग कॅम्प घेण्यात आला व कोरोना रोखण्याची ही मोहीम राबवण्यात आली.   

यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल नवनाथ कुंभार, पोलीस कर्मचारी अजय माने, संदेश लादे, एम ए पवार, पोलीस नाईक प्रशांत नाईक, अशोक खवले, होमगार्ड तसेच आरोग्य विभागाकडून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. एस.डी.जाधव, आरोग्य सेवक दत्तात्रय शिंदे, टेक्निशियन एस एस चोपडे, NPW, संदीप साळुंखे, CHO डॉ कोमल लोकरे, नर्स मेघा शिंदे, करवते बी एस, असिस्टंट कांता बर्डे, शंतनू पाटील, गटप्रवर्तक अदिती थोरात आदींनी या कॅम्प मध्ये सहभाग घेतला.           

1 टिप्पणी:

  1. लोकांमध्ये सध्या कोरोनाची भीती राहिली नाही,त्यामुळे लोक बेफिकीर वागत आहेत,त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...