मंगळवार, २५ मे, २०२१

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

तळमावले/वार्ताहर
ढेबेवाडी येथील कोविड केअर सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट देवून शिवसमर्थ ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, शिवसमर्थ सोसायटीचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, ‘प्रहार संघटनेच्या’ विद्याताई कारंडे, सेंटरमधील डाॅक्टर, नर्सेस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शिवसमर्थ ने आर्थिक सेवा देत असताना सामाजिक बांधिलकीही तळमळीने जोपासली आहे. यापूर्वी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने कोवीड-19 च्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, तसेच पत्रकार, पोलीस पाटील यांना जीवनावश्यक वस्तू असलेले कीट दिले आहेत. या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न गेली 10 वर्षे संस्था करत आहेत.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील संस्थेने तळमावले येथून गेली 3 वर्षे एटीएम सेवा देवून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे. कोविड केअर सेंटर ला वाॅटर प्युरिफायर भेट दिल्याबद्दल मान्यवरांनी शिवसमर्थचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...