मंगळवार, ४ मे, २०२१

काळगाव : कोवीड ला ‘बोल्ड’ करुन पंजाबराव देसाई ‘विजयी’

काळगाव : कोवीड ला ‘बोल्ड’ करुन पंजाबराव देसाई ‘विजयी’

तळमावले/डाॅ.संदीप डाकवे
पाटण तालुका पंचायत समितीचे सदस्य, शिवसेना विरोधी गटनेते पंजाबराव देसाई (तात्या) हे नुकतेच कोवीड या आजारातून यशस्वीरीत्या बरे होवून बाहर पडले.
काळगांव (ता.पाटण) या गणात विकासाच्या माध्यमांतून जनतेशी असलेला जनसंपर्क यामुळेच तात्यांना कोरोनाने गाठले. परंतू डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखालील योग्य उपचारामुळे, शासनाच्या नियमांचे पालन करत, प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास, लोकांच्या आशिर्वादामुळे पंजाबराव देसाई कोरोनामुक्त झाले.
प्राथमिक आरोग्य ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी उपचार घेत असताना तात्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या रुग्णांना सुध्दा मोठा दिलासा व मनोबल वाढविण्यासाठी आधार दिला.
पंजाबराव देसाई (तात्या) यांनी कोरोनाला हरवून कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतल्यामुळे ‘कोरोना योध्दा’ म्हणून तसेच सद्यस्थितीत तात्या समाजोपयोगी अत्यंत महत्त्वाची कामे करीत आहात असे कौतुक त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय मराठा संघ प्रदेशाध्यक्ष अविनाश पवार, पाटण तालुका शिवसेना संघटक सुनील पवार, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहूल लोहार व रमेश काळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...