सोमवार, ३ मे, २०२१

तळमावले :ग्रामपंचायत करपेवाडीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर

तळमावले :ग्रामपंचायत करपेवाडीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर

प्रतिनिधी l मनोज सावंत

तळमावले : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत करपेवाडी आणि यशवंतराव चव्हाण ब्लडबँक कराड यांच्या संयुक्तविद्यामानाने गावातील ग्रामदैवत मसनाईमाता मंदिर करपेवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होता. या शिबीरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

राज्यात सध्या १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात झाली आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यावर काही दिवस रक्तदान करता येणार नाही. आत्ताच रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. १८ वर्षांवरील तरूण व तरूणींनी लस घेतली खूप मोठी लोकसंख्या इच्छा असून रक्तदान करू शकणार नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेवून करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत करपेवाडी आणि यशवंतराव चव्हाण ब्लडबँक कराड यांच्या संयुक्तविद्यामानाने गावातील ग्रामदैवत मसनाईमाता मंदिर करपेवाडी येथे काल दि.२ मे  रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान  रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले.या शिबीरात ३५ जणांनी रक्तदान केले.

रक्त संकलनासाठी  यशवंतराव चव्हाण ब्लडबँक कराड ह्यांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर ,राजेश करपे,महेश करपे,अर्जुन करपे,रुपेश साळुंखे,सचिन साळुंखे,सागर साळुंखे,अमरदीप करपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

  📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६ तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चि...