सोमवार, १२ एप्रिल, २०२१

*खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद ते आदर्की फाटा मार्गासाठी निधी मंजूर*

*खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद ते आदर्की फाटा मार्गासाठी निधी मंजूर*

सातारा: साप्ताहिक कुमजाई पर्व वृत्तसेवा 
 सातारा : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी 12.89 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे काम अपूर्ण अवस्थतेत राहिल्याने  त्याची मोठी दुरावस्था झाली होती. निधी मंजूर झाल्याने नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकर मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. 
    सातारा लोकसभा मतदार संघातून जाणा-या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरूस्ती होणेबाबत व हा मार्ग वाहतुकीस योग्य करण्यात यावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रा.म.क्र. 965 डी वरील आदर्की फाटा ते वाढे फाटा 17/145 ते 44/00 किमी. मध्ये रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम सध्या प्रगतीत आहे. मात्र याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंद पर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आलेले नव्हते. परिणामी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतूकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनात वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे लोणंद परिसराच्या अनेक गावातील ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरूस्तीच्या कामाची मागणी केली होती.
     खा. श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबधित अधिका-यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती. तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांना देखील पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडून लोणंद ते आदर्की फाटा एकूण 0.00 ते 17/ 145 किमी. लांबीच्या रस्ता मजबुतीकरण कामासाठी 12.89 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार सदर निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहीती कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी खा. पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे. हा निधी मंजूर झाल्याने या खराब झालेल्या महामार्गाच्या मजबूतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळणासाठी सोयीचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...