जिंतीमध्ये कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद २२५ नागरिकांनी घेतली लस
जिंती ता.पाटण : केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार ४५ वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेला जिंती उपकेंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जिंती उपकेंद्र ता.पाटण या ठिकाणी कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या उपकेंद्रांत वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना कोविड ची लस देण्यात आली यावेळी . उपकेंद्राला पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मिनाताई साळुंखे यांनी भेट दिली व लसीकरणाची पाहणी केली.हे सर्व शिबीर चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. बी पाटील , सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले. यावेळी २२५ लोकांनी कोविड ची लस देण्यात आली यावेळी जिंती गावचे सरपंच श्री.दामाजी कदम ,उपसरपंच श्री.उमेश चव्हाण, उपकेंद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.बंडु गोडेकर , डॉ.कोमल लोहकरे ,रावसाहेब ,सिद्धार्थ गवई, मेघा म्हात्रे , करवटे आरोग्य सेवक वर्ग उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा