सोमवार, १२ एप्रिल, २०२१

कराड : आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड नगरपालिकेला मिळणार नविन रुग्णवाहिका

कराड : आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड नगरपालिकेला मिळणार नवीन रुग्णवाहिका

कराड : माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून येणाऱ्या दोन दिवसांत नवीन रूग्णवाहिका कराड नगरपालिकेत उपलब्ध होणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी कराड नगरपालिकेकडे निधी वर्ग केला आहे, अखेर आज त्यासंबधी काॅंग्रेसच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले असते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी येत्या दोन दिवसांत रूग्णवाहिका घेतील जाणार असल्याचे सांगितले.
कराड नगरपालिकेमध्ये कराड शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षी नवीन रूग्णवाहिका घेण्यासाठी दिलेला निधी त्वरित चेक देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, कराड शहर उपाध्यक्ष भास्करराव देवकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय* *जि.प. शाळेत पहिलीत प्रवेश घ्या, 1 वर्ष घरफळा व पाणीपट्टी माफ*

 "कुंभारगांव ग्रामपंचायत". ता, पाटण येथे ८० वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय ...