तळमावले/वार्ताहर
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटीचे कार्य वैभव आणि स्नेहपूर्ण तसेच सुधार्मिक रीतीने संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही चालू आहे असे गौरवोद्गार आदिमठ संस्थान धारेश्वर चे मठाधिपती श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी काढले ते शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, संचालक/सल्लागार शिवाजी सुर्वे, हणमंत माने, देवबा वायचळ सर, प्रा.पी.आर. सावंत, सुदाम फिरंगे सर, नानासाहेब सावंत, बळवंत पाटील, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
धारेश्वर महाराज पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे एकत्रित नाव घेवून शिवसमर्थ या नावाने असलेली संस्था प्रयत्नपूर्वक आणि पतपूर्वक चालवलेली असल्याने ती 49 शाखांमधून कार्यरत आहे. शिवसमर्थ संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारी आहे. अत्यंत गुणी अशा प्रकारचा असा सेवक वर्ग आहे. असल्याने ही संस्था अत्यंत चांगल्या पध्दतीने पुढे जात आहे.’’
‘‘ठेवीदारांच्या माध्यमातून उन्नती होत असते. आपण कधीही घेतलेली देणी देणं जमलं नाही तरी घेतलेले कर्ज राखू नाये. ऋणको होवून मरु नये. आपले काम काटेकोरपणे करा, कर्ज वेळेवर फेडा. याची काळजी प्रत्येकाने घेतली तर खÚया अर्थाने सर्व जगात संपत्ती आणि षांती लाभेल. असा महत्त्वाचा आशीर्वाद सहकार क्षेत्रास व सामान्य जनतेस महाराजांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसमर्थ च्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नुतन ठेवीदारांचा सत्कार धारेश्वर महाराज यांच्या करण्यात आला. सदर वेळी श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली त्याचा मान उभयता नितीन शहा यांना देण्यात आला तसेच सर्व उपस्थितांना चहा, नाष्टा याची सोय आणि मान्यवरांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव पवार, इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, उमेश लोखंडे, महेश्वर पाटील, अजय खडके, सुरेश काळुगडे, विजय सवादकर, विक्रम संकपाळ, सुप्रिया देसाई, शैला पाटील व अन्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा